परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)
सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते.
आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता.
तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते. त्याने अंतराळात कमी खर्चात आणि अतिशय वेगात भ्रमण करता येत होते.