अमेरिका ७ -आराम का व्यायाम
भारतात फार कमी लोक स्वतःच्या तब्येतीची-आरोग्याची काळजी घेतात आणि नगण्य लोक मनापासून व्यायाम करतात. अस्मादिकही त्यास अपवाद नाहीत. 'केला पाहिजे' म्हणून, डॉक्टरनी विचारलं तर होकार भरता यावा म्हणून किंवा स्वतःला फसवणं थोडं सोपं जावं म्हणून जितका व्यायाम करणं आवश्यक असेल तेवढाच मी करते. याबाबत थोडा अवमान गिळून कबूल करते की 'कळतंय पण वळत नाही' च्या धर्तीवर 'पटतंय पण उठवत नाही.' अशी पहाटे साखरझोपेत अवस्था असते. व्यायाम हा केवळ प्रातःसमयी करण्याचा असल्याचा पूर्वजांचा योग्य सल्ला आणि आमचा सोयीस्कर गैरसमज आम्ही मोफत पाळल्याने 'भल्या पहाटे ते सकाळी लवकर' इतकाच वेळ व्यायाम करणे आम्ही योग्य मानले आहे.