हांगचौमध्ये आपलं स्वागत!

हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक

हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक
इथल्या वास्तव्यात 'प्लीज, इफ यू डोन्ट माईंड..कॅन आय आस्क यु ए क्वेश्चन?' अशी प्रांजळ आवाजात विनंती करून काही जणांना/जणींना मी काही प्रश्न विचारले. माझा हेतू हा होता की, मानसतज्ञ म्हणून काम करताना अन्य देशांत आणि प्रामुख्याने भारतात वयाची 18 ते 21 वर्षे घालवलेली मुलं/मुली इथे येतात. त्यांना किती आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? भारतात असणाऱ्या पालकांचा रोल काय असावा..काय नसावा? त्यांच्याकडे पाहणाऱ्या शालेय मित्र-मैत्रिणींपासून, नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलतो का? हा बदल त्यांना कसा सलतो? इ..इ..
अमेरिकेत अनोळखी माणसे एकमेकांना सुहास्य वदनाने हाय-हॅलो म्हणतात पण ते हवाई सुंदर्यांसारखं नाटकी किंवा बेगडी वाटतं. प्रत्येक अनोळखी व्यक्ती इथे सहजपणे 'कसे आहात' असे विचारते आणि उत्तर देणाराही 'छान..मस्त' असे वापरून गुळगुळीत झालेले खोटे उत्तर चिकटवतो. इथे कामाला किंवा घरकामाला माणसं सहज मिळत नाहीत आणि मिळाली तर ती परवडतीलच असेही नाही. घरातली रोजची भांडी-कपडे अथवा साप्ताहिक कामात घर - गाडीची स्वच्छता स्वतःच करावी लागते. इथल्या लोकांना घरकाम - छंद - नोकरी यातून पुरेसा वेळ मिळत नाही अशी तक्रार ऐकू येते आणि त्याचवेळी इथे वेळ घालवायला आणि एकटेपणावर मात करायला कुत्रं पाळायचा सल्लाही दिला जातो.
शितावरून भाताची परीक्षा करता येते, पण सुगरणीची करता येईलच असं नाही. त्याच धर्तीवर इथं एका भूभागावरून देशाची परीक्षा होऊच शकत नाही. प्रत्यक्ष भारतात ज्याप्रमाणे एका राज्यावरून सार्वत्रिक मत भारताबद्दल करताच येणार नाही. काहीसे तसेच इथेही आहे. अमेरिकेतल्या लोकांनी उत्सुकतेपोटी 'भारतात कुठे राहता?' या प्रश्नाला आम्ही 'सांगली-महाराष्ट्र..10 अवर्स फ्रोॅम मुंबई..बाॅम्बे!' असं सांगितल्यावर 'तुमच्याकडे बर्फ पडतो का?' असा प्रश्न विचारून गार केलं. हिमाचल-काश्मीर-लेह लडाख आणि महाराष्ट्र शेजारीच असल्यासारखे जसं त्यांना वाटू शकतं, तसंच काहीसं आपलेही होते.
इथल्या वास्तव्यात काही एटिकेट्स कानाला खडा लावून पाळायचे असतात...नव्हे ते तुम्हांला पाळावेच लागतात. इथे कुणाकडेही टक लावून पाहता येत नाही. आपल्याकडे काहीजण याला सौंदर्याला दाद देणे म्हणतील, तारुण्याचा सन्मान समजतील पण इथे मात्र देखणं ते कुरूप कुणाकडेही पाहणे त्यांना अवमानकारक वाटते. आपल्याकडे ट्रकच्या मागे सुद्धा 'पहा.. पण प्रेमाने' अशी सूचना मुद्दाम लिहिलेली असते. इथे गाड्यांकडे फार काळ प्रेमाने पाहताच येणार नाही अशा सुसाट स्पीडनं त्या जात असतात. बालिका - ललना - कुमारी - तरुणी - काकू - ताई - माई - आक्का - आजी कुणाकुणाकडेही अन्य स्त्री वर्गानेही पाहणे प्रशस्त नाही.
आम्ही मुलीकडे ज्या भागात राहतोय तिथं खरोखरच केवळ अठरापगड जातीच्या नाही तर अनेक विविध देशांमधून लोक रहायला येतात. इथल्या काही राज्यात तर मूळ अमेरिकन फारच कमी आणि बाहेर देशातून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे आणि आता इथेच स्थायिक होऊन इथलेच झालेले रहिवासी नागरिक जास्त आहेत. मेक्सिको - एशिया मधून हे प्रमाण अधिक आहे. त्यातही कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, न्यू जर्सी ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की भारतातून येणाऱ्यांचे प्रमाण 6% आहे, तर मेक्सिकन लोकांचे 24% आहे.
भारतात फार कमी लोक स्वतःच्या तब्येतीची-आरोग्याची काळजी घेतात आणि नगण्य लोक मनापासून व्यायाम करतात. अस्मादिकही त्यास अपवाद नाहीत. 'केला पाहिजे' म्हणून, डॉक्टरनी विचारलं तर होकार भरता यावा म्हणून किंवा स्वतःला फसवणं थोडं सोपं जावं म्हणून जितका व्यायाम करणं आवश्यक असेल तेवढाच मी करते. याबाबत थोडा अवमान गिळून कबूल करते की 'कळतंय पण वळत नाही' च्या धर्तीवर 'पटतंय पण उठवत नाही.' अशी पहाटे साखरझोपेत अवस्था असते. व्यायाम हा केवळ प्रातःसमयी करण्याचा असल्याचा पूर्वजांचा योग्य सल्ला आणि आमचा सोयीस्कर गैरसमज आम्ही मोफत पाळल्याने 'भल्या पहाटे ते सकाळी लवकर' इतकाच वेळ व्यायाम करणे आम्ही योग्य मानले आहे.
मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.
रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो.
आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.
जन्माला येण्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा 'क्यू' काही संपत नाही. एकांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. ओळीत ठेवलेले अनेकांचे मृतदेह पाहून 'क्यू' ची कल्पना सुचली.
जन्म होण्यासाठी कारणीभूत असलेली गुणसूत्रे मोठ्या प्रमाणात एकमेकांशी स्पर्धा करत मिलनासाठी येतात. योग्य मिलन झाल्यावरच जन्म होतो. इथपासून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 'क्यू' काही सुटलेला नाही. तुमचा जन्म झाल्यावर तुमच्या आधी/नंतर बाळे जन्म घेतात, दवाखान्यात अंघोळ घालण्यासाठी सुद्धा दाई किंवा नर्स एका नंतर एक असे करून बाळांच्या अंघोळीसाठी नेतात.
*रस्ते आणि गाड्या*