शशक- निवडणूक
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे.
मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा.
तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा.
मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले.
तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल.
मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत?