शशक-फ्रिज

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Feb 2023 - 11:44 am

ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही?
मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना?
ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात.
मी- मला धमकी देतेस? ठिक आहे, बघुन घेईन.
----------------------------------------------------------
संध्याकाळीच बाजारातुन एक फ्रिज घेउन येतो.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

भागो's picture

24 Feb 2023 - 12:56 pm | भागो

कुछ भी लिखा है.
फ्रिज घेताना साईझ बघून घ्या. पाहिजे तर सेल्समन ला विश्वासात घेऊन विचार, " ह्या साईझ मध्ये काम होऊन जाईल ना?"
तिच्या आवडीचाच घ्या. मागाहून तिची तक्रार नको.
करवत घ्यायला पण विसरू नका.
जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा लोक काय करत होते?

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Feb 2023 - 1:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

छोटे छोटे तुकडेच तर ठेवायचे आहेत. साईझ डजन्ट मॅटर.

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2023 - 3:33 pm | प्रसाद गोडबोले

अशा कथा...किंव्वा फ्रीज ह्या विषयावर आलेले अनेक विनोद ऐकले .
समाज एकुणच किती संवेदनहीन झालेला आहे ह्याची जाणीव झाली.
शिवाय तथाकथित पुरोगामी लोकांचा आक्रोश किती खोटारडा आपमतलबी असतो हेही जाणवले ह्या फ्रीज प्रकरणानंतर . निर्भया प्रकरणानंतर जसा जनक्षोभ उसळलेला किंव्वा कोपर्डी प्रकरणानंतर जसे मोर्चे निघालेले त्या सारखे काडीमात्र काहीही झाले नाही. शेवटी जात महत्वाची अन धर्मही. इथे तर गुन्हेगाराचा धर्मच असा आहे कि पुरोगामींचे डेरिंगच होणार नाही ह्यावर टूलकिट काढायचे .

जाऊ दे , आपलं काय जातंय ?

तुका म्हणे उगी रहावे | जेजे होईल ते ते पहावे ||

कर्नलतपस्वी's picture

24 Feb 2023 - 6:47 pm | कर्नलतपस्वी

मर्यादित सहमत.

इश्कने निक्कमा कर दिया गालिब
वरना हम भी सौ साल जी जाते.

अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय, परजातीय मुलांच्या प्रेमात पडून स्वतःच स्वतःचा घात करून घेतात.

समाज संवेदनाशीलच आहे पण हतबल आहे. आईबाप नातेवाईकांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नसेल ? आसपास होणाऱ्या घटना बघून काहीच बोध घेत नाहीत!

खुप चर्चा होऊ शकेल पण संवेदनाशील विषय असल्याने फार लिहीत नाही.

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय, परजातीय मुलांच्या प्रेमात पडून स्वतःच स्वतःचा घात करून घेतात>>>
एकूण काय तर स्वधर्मीय स्वजातीय ह्यांनी तुकडे तुकडे करून फ्रिज मध्ये टाकले तर काय प्रोब्लेम नाय . हा नवरा बायकोचा मामला आहे. रोज अश्या घटना घडत आहेत.
ह्यावर मी सुचवतो उपाय. पहा पटतंय काय.
-- मुलीचे शिक्षण देणे बंद करा.
-- मुलींनी मोबाईल वापरू नये असा फतवा काढावा.
-- मुलींनी पडदा करावा.
-- त्यांना हिंदी सिनेमे गाघायाला देऊ नये.
-- मुलींनी नोकरी करू नये.

त्यांना हिंदी सिनेमे बघायला देऊ नये.

कर्नलतपस्वी's picture

24 Feb 2023 - 7:01 pm | कर्नलतपस्वी

एकाने आपल्या बायकोचे डोके कापून हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. आख्खं पुणे हादरले होते.

अशा अनेक अमानवीय घटना घडतात पण त्यात जर अंतर धर्माचा संबध जुडला तर पुरोगामी,प्रतिगामी सर्वच आपली पोळी शेकतात. वस्तुतः घटनेशी,त्यातील पात्रांशी यांना काही घेणे देणे नसते.

नुकसान मात्र आईबाप नातेवाईक व संबधित व्यक्तीचे होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Feb 2023 - 8:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला त्या प्रकरणाची जेव्हढी माहिती आहे त्यावरुन असे दिसते की
१. मुलीचे आईवडील वेगळे झाले होते व ती आईकडे रहात होती. आई गेल्यावर वडीलांबरोबरही फारसे संबंध नव्हते.
२. लहानपणीपासुन घरातले वादविवाद किवा तत्सम गढूळ वातावरण यामुळे तिला बाहेरच्या आधाराची गरज पडली असावी. धर्माचा संबंध नाही.
३. दोघांची ओळख बम्बल् बी डेटिंग अ‍ॅप् वर झाली होती. त्या मुलाने त्याच अ‍ॅप वरुन ईतरही अनेक मुलींना पटवले होते, त्यातली एक तर सायकिअ‍ॅट्रिस्ट होती आणि पहीलीचा मृतदेह फ्रिजमधे असताना त्याच्या फ्लॅटवर येउन राहुन गेली होती. अर्थात तिला खुनाची माहीती नसणार असे गृहित धरतो.
४.मुलाचा कमाईचा मार्ग नक्की काय होता माहित नाही पण तो शेफ होता. डेक्स्टर वेब सीरीज वरुन प्रभावित होउन त्याला ही कल्पना सुचली. त्याने थंड डोक्याने खून केला आणि पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो कूल होता व त्याना मस्त घुमवत होता.

यात कुठेही मी लव जिहाद वगैरे बद्दल बोलत नाहीये. घडलेला प्रकार भयंकरच आहे आणि त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही. इत्यलम

आलो आलो's picture

27 Feb 2023 - 12:07 pm | आलो आलो

XXX ***@@XXX $$$XXX

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Feb 2023 - 2:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

सहमत!!