शशक-पिंप आणि कपाट

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
3 Apr 2023 - 10:25 am

थोड्याच महिन्यांपूर्वी आम्ही विरारहुन मामाच्या खोलीत लालबागला राहायला आलो आहोत.विरारला शांतता होती, पण ही खोली रस्त्याला लागूनच आहे. मला तर अजिबात आवडली नाही ही जागा.उजाडले की रस्त्यावरचे कर्कश आवाज चालू. पण काय करणार? मला नोकरी नाही आणि आईला पण . डोक्यावर छप्पर आहे हेच महत्वाचे. शिवाय मामाकडून दर महिन्याला खर्चासाठी दहा हजार रुपये मिळतात ते वेगळेच. त्यामुळे कसेबसे भागते.त्यात खालचा सँडविचवाला अंकल मस्त आहे. माझी उधारी ठेवतो. त्यामुळे नाश्त्याची सोय होते. तिथे काम करणारी दोन मुलेसुद्धा ओळखीची झाल्येत. मेसेज केला की काय पाहिजे ते घरी आणून देतात.पण ही आई मला त्यांच्याशी बोलूच देत नाही. कोणत्याच मुलाशी बोलू देत नाही.वाईट्ट आहे अगदी.
================================
मागच्या आठवड्यात एक मोठाच प्रॉब्लेम झाला. आई पहिल्या मजल्यावरून घसरून खाली पडली.तिला खालच्या सँडविचवाल्या दुकानातल्या पोरांनी वर आणले आणि स्वयंपाकघरात ठेवली.पण ती हालचालच करेना. सगळी जागा अडली. मग मी आरीने तिचे तुकडे करून पिंपात आणि कपाटात ठेवले.पण आता घरात एक विचित्र वास पसरायला लागलाय. भरपूर सेंटच्या बाटल्या ओतल्या, पण जातच नाहीये. डबा द्यायला बहीण आली होती तिला २ दिवस बाहेरच्या बाहेर कटवले. शेजारच्यांना सांगितले आईला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. दोन तीन दिवसातच मामासुद्धा येईल पैसे द्यायला. त्याला काय सांगू? आणि त्याने पैसे देणे बंद केले तर? मी जगायचे कसे? खालच्या सॅन्डविचवाल्याची उधारीपण द्यायची आहे. पण आज पोलीस का आल्येत दारात?

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

3 Apr 2023 - 11:46 am | कर्नलतपस्वी

पोटा साठी कायबी....

काही म्हणा गरीबी वाईट. थोडे पैसे असते तर फ्रीज घेतला असता.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Apr 2023 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

ह्या बातमीवर आधारीत

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/lalbaug-murder-case...

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2023 - 5:27 pm | चौथा कोनाडा

.

कर्नलतपस्वी's picture

3 Apr 2023 - 3:04 pm | कर्नलतपस्वी

रक्ताची नाती कुठवर सांभाळत बसायची हा विचार वारंवार मनात येतो. चर्चा दालनात एक लेख टाकावा वाटतोय.

कर्नलतपस्वी's picture

3 Apr 2023 - 3:07 pm | कर्नलतपस्वी

आई,मुलगा,मुलगी,भाऊ बहीण, मामा,मावशी,आजी,आजोबा कोण कुणाबरोबर केव्हा कसा वागेल काही सांगता येत नाही.

एक एक कथा वेगळी करुन वाचली तर विशेष अर्थ लागत नाही. त्यामुळे मी याला दोन शशक ऐवजी एक द्वि शशक म्हणेन

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2023 - 1:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

मान्य आहे

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2023 - 5:23 pm | चौथा कोनाडा

बाप रे !
वाचून काटा आला अंगावर !

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Apr 2023 - 11:27 am | राजेंद्र मेहेंदळे
चौथा कोनाडा's picture

5 Apr 2023 - 9:37 pm | चौथा कोनाडा

गुंतागुंतीचे प्रकरण दिसतेय !