नमस्कार मंडळी
कर्नलकाकांनी विनंती केल्यावरुन हा आजच्या कट्ट्याचा छोटासा वृत्तांत
एक सदस्य अमेरिकेतुन आल्याने कट्टा करावा असे ठरत होते, त्यामुळे ८-१० जणांचा कायप्पा ग्रुप तयार करुन चर्चा सुरु झाली आणि हो-ना करता करता डेक्कन,संभाजी पार्क ला भेटु असे ठरले. मी थोडासा उशिरा १०.४० पर्यंत पोचलो तोवर कर्नल तपस्वी,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा असे आले होते.
पावसाळी वातावरण असल्याने उन्हाचा त्रास नव्हता. श्री गणेशा हे हैद्राबादहुन आले होते त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. गप्पा मिपावरुन चालु होउन छंद्,नोकरी, तांदुळ्,टेक्नॉलॉजी अशा वाट्टेल त्या विषयांवरुन धावत होत्या. श्री गणेशा हे "माझा गणेशा झालाय" वाले नव्हेत हे समजल्याने आनंद झाला.
डावीकडून -रामचंद्र ,कर्नल तपस्वी ,राजेंद्र मेहेंदळे ,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा
थोडा वेळ गप्पा झाल्यावर बागेत फेरी मारु असे म्हणेस्तोवर बाग बंद झाली. मग मोर्चा समोरच्या शिवसागर कडे वळला. तेथे चहा, नाश्ता, गप्पा वगैरे चालु होत्याच तोवर अजुन एक सदस्य रामचंद्र आले.
ग्राहक वाढायला लागल्याने मालकाने हाकलायच्या आत बाहेर आलो, आणि गप्पांचा फड चालु ठेवला.
वाचलेली चांगली पुस्तके, आलेले अनुभव, ईतिहास्,भूगोल्,नागरीक शास्त्र एक ना दोन विषय. असे एकातुन दुसरे विषय उलगडत जात होते. शेवटी वेळेचे भान ठेवुन गप्पा आवरत्या घेतल्या. अखेर प्रचेतस यांना वन डे गायडेड टूर काढण्याची विनंती करुन आणि तूनळी चॅनल सुरु करायचा आग्रह करुन कट्टा समाप्त झाला.
कळावे लोभ असावा.
प्रतिक्रिया
7 May 2023 - 5:28 pm | कर्नलतपस्वी
प्रचेतस व माझी ओळख मागील कट्ट्यावर झाली होती त्यामुळे एकमेकांना ओळखण्यास वेळ लागला नाही. आम्ही दोघे बागेच्या प्रवेश द्वारावर गप्पा मारत आणखीन कोणी येतयं का म्हणून वाट बघत होतो. तेवढ्यात काळा टि शर्ट, निळी पॅन्ट, पाठीवर बॅग, हसमुख वामनमुर्ती आणी बरोबरच 'छरहरे बदन का,फुर्तीला युवक' आमच्या जवळ येवून हलक्या आवाजात परवलीचा शब्द म्हणाला,'मिसळपाव का?'. क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली. ओळख पटली व गप्पांची देवाण घेवाण सुरू झाली.
मिसळपाव ऐनवेळेस सुरू झाले व ते पाहून श्रीगणेशा यांनी प्रतिसाद दिला या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
श्रीगणेशा यांनी कॅमेर्यात(बहुतेक निकाॅन असावा) कट्ट्यचे क्षण कैद केले.
बाहुबली यांना अचानक बाहेरगावी जावे लागले व योगेश यांना घरेलू व्यस्तते मुळे येता आले नाही.
कुमारएक सर,प्रशांत यांनी जमल्यास येण्याची तयारी कळवली होती पण पुर्वनिर्धारित व्यस्तते मुळे कदाचित येऊ शकले नाहीत.
या सर्वांची आवर्जून आठवण झाली. सर्वांचे आभार. पुढच्या वेळेस नक्की भेटूयात.
मिसळपाव सुरू असते तर नक्कीच उदंड प्रतिसाद मिळाला असता यात शंकाच नाही.
पुणे कट्टा या लेखावर मिपाकरांचे प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील कट्टा पिंची मधे करवा आशी इच्छा रामचंद्र यांनी दर्शवली. त्यावेळेस आयोजन,नियोजन करण्यात कुठलीच कसर राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल.
राजेद्रभौनीं आढेवेढे न घेता त्वरीत, थोडक्यात, सुटसुटीत वृतांत डकवला याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
शिवसागर हे दक्षिण पंथीय उपहारगृह, (हायला, किती दिवसांनी हा मराठी शब्द डोक्यात आलायं ), मिसळपाव ऐवजी मसाला डोसा व वडा सांबार वर भुक भागवावी लागली.
रविवार सकाळ मस्त गेली.
ता.क. शेखर मोघे यांनी संध्याकाळी फोनवरून माहीती घेतली व न येऊ शकल्या बद्दलही बोलणे झाले.
7 May 2023 - 7:16 pm | गवि
??? तो गणेशा देखील चांगलाय हो.. ;-). ह घ्या.
कट्टा वृत्तान्त छान आहे. प्रशांतने नेहमीप्रमाणे टांग दिलेली ऐनवेळी येणे रद्द केलेले दिसते.
7 May 2023 - 7:16 pm | कंजूस
१)फोटो खाली नावे टाकावीत.
२)लोणावळ्यात कट्टा करावा. ठाणे,कल्याणकरांनाही सोपे जाते. पावसाळा येतोच आहे,लोणावळा उत्तम. खंडाळा त्याहूनही उत्तम. पावसाळी हवेत खंडाळ्यातील चहा भजीच्या पुढे सर्व मिसळी फिक्या पडतात. पण . . . .
३)(कोरोनाकाळात रेल्वेवाल्यांनी खंडाळा स्टॉप काढल्याने फारच गैरसोय होते. )
8 May 2023 - 10:49 am | राजेंद्र मेहेंदळे
पावसाळ्यात विकांताला लोणावळा/खंडाळा कट्ट्याला माझे सहर्ष अनुमोदन :) होऊ दे खर्च
7 May 2023 - 8:18 pm | श्रीगणेशा
माझ्यासाठी हा पहिलाच कट्टा!
अगदी अविस्मरणीय, वाचन, लिखाण, संवाद, भेटीचा उत्साह द्विगुणित करणारा!
कोणीतरी म्हटलेलं आहेच:
पुस्तकं जर मनाच्या खिडक्या असतील, तर माणसं हृदयाचे दरवाजे आहेत!
7 May 2023 - 9:59 pm | सिरुसेरि
खुप मस्त फोटो व कट्टा वर्णन .
8 May 2023 - 7:06 am | कुमार१
छान झाला आहे.
अचानक परगावी जावे लागल्याने येता आले नाही.
8 May 2023 - 7:31 am | तुषार काळभोर
आधी आलेचि पाहिजे!
मिपा आता सुरू झाले आहे, तर पुढच्या रविवारी कदाचित आणखी काही सदस्य येऊ शकले असते.
कट्टे सुरू राहावेत.
पुण्याच्या चहू दिशांना कट्टे व्हावेत.
पिंपवडमध्ये व्हावेत.
लोणावळा खंडाळा मध्ये व्हावेत.
अधिकाधिक सदस्यांच्या गाठी भेटी व्हाव्यात या शुभेच्छा!!
8 May 2023 - 12:28 pm | चांदणे संदीप
पिंपरी चिंचवडला पिंपवड हे म्हणजे डायरेक्ट बाबुभैय्या से बाबूराव? ;)
सं - दी - प
8 May 2023 - 8:59 am | प्रचेतस
कट्टा एकदम मस्त झाला. सर्वात पहिल्यांदा संभाजी उद्यानाच्या इथे पोहोचलो. शिवसागरपाशीच बाईक लावली आणि तेव्हढ्यातच कर्नलसाहेब येतांना दिसले. त्यांच्यासोबत त्यांच्या सैन्यातील काही आठवणींविषयी गप्पाटप्पा सुरु झाल्या. तितक्यातच श्रीगणेशा व त्यांचा भाचा दोघेजण आले. मिपाकरांना मिपाकर लगेच ओळखतात हेही प्रत्ययाला आले. त्यांच्या पाठोपाठच राजेंद्र मेहेंदळे आले. मग तर काय गप्पांना बाहेर. शिवसागरमध्ये चहापाणी सुरु असतानाच मेहेंदळे आपले ब्लॉकचेनविषयक अनुभव सांगत होते. तिथेच रामचंद्र अवतरले. मग काय ट्रेक, परिक्रमा, मंदिरे, अतिंद्रिय अनुभव अशा विविध विषयांवर चर्चा झाल्या. एकंदरीत खूपच मजा आली. पुढचा कट्टा एका दिवसीय भटकंतीचा करावा असे ठरवून कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.
8 May 2023 - 10:16 am | Bhakti
बेस्ट!
8 May 2023 - 10:44 am | टर्मीनेटर
अरे वाह! कट्टा एकदम मस्त झालेला दिसतोय.
सचित्र कट्टावृत्तांत आवडला 👍
8 May 2023 - 12:29 pm | चांदणे संदीप
पुण्याचे कट्टे माझ्या नशीबात नाहीत बहुतेक! :(
नदीच्या अल्याड जमेल. :प
सं - दी - प
8 May 2023 - 12:54 pm | तुषार काळभोर
तुमच्या अल्याड की आमच्या अल्याड?
मुळा, मुठा, पवना की इंद्रायणी?
8 May 2023 - 1:02 pm | चांदणे संदीप
आमच्या बा हा जू हू क ह ड ह च्या अल्याड. मुळेच्या अल्याड.
सं - दी - प
8 May 2023 - 12:37 pm | चौथा कोनाडा
व्वा, झकास कट्टा अन फर्मास वृतान्त !
मिपा बन्द असल्यामुळे उपस्थिती मर्यादित झाली तर !
चला, मिपा चालू झाले अन जीव भाण्ड्यात पडला. नाही तर नैराश्य येऊ लागले होते !
लवकरच महा१४ ग्रामी मिपा कट्टा व्हावा !
8 May 2023 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रचेतस यांना वन डे गायडेड टूर काढण्याची विनंती करुन आणि तूनळी चॅनल सुरु करायचा आग्रह करुन.. ->>> धन्यवाद ही विनंति केल्याबद्दल! ___/\___ तुमचं ऐकलं तर लेण्यातला एखादा कालरी शिव आणि पाच सहा सुरसुंदऱ्या# पावल्या म्हणेन ! (# - ह्या ही सगळ्या लण्यांमधल्याच बरं ! प्रत्यक्षातील येणे नाही . दुत्त दुत्त आगोबा ! ल्लुल्लुल्लुल्लु !!! :-/ )
आम्ही आगोबाला ही विणंती क्रूण क्रूण दमलो .
8 May 2023 - 7:24 pm | कर्नलतपस्वी
कट्ट्यावर रामचंद्र यांनी आपली आठवण काढली.
8 May 2023 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा
14 May 2023 - 8:12 pm | कंजूस
तुम्ही किंवा इतर मिपाकरांनी तीन तीन मिनिटांचे छोटे विडिओ काढून वल्लीला द्यायचे. त्याने वर्णन ओडिओ जोडायचा.
उदाहरणार्थ वेरूळला सर्वात उजवीकडची गुहा क्रमांक एक आहे. तसा क्रमांकही तिथे रंगवला आहे. तसेच डावीकडे जात राहिलो तर अगदी शेवटचे जैन लेणे क्र (३४) आहे. तर त्यांचे दीड/तीन मिनिटांचे विडिओ जमवा. आवाज दिल्यावर ते कुणी पाहील तिथे जाऊन तर सर्व कळत जाईल. मिपाकरांचा हा joint project होईल.
15 May 2023 - 5:58 pm | चौथा कोनाडा
खुप छान सुचवणी !
या निमित्त वल्ली प्रचेतस यांच्या व्हॉईस ओव्हरची कला समजून येईल.
चियर्स वल्ली ... बी रेडी !
8 May 2023 - 7:22 pm | अत्रुप्त आत्मा
प्रचेतस यांना -
आणि काय रे आगोबा ? जंगली महाराज रोडला होतास ना ?मग जरा ओंकारेश्वरच्या पलीकडे शनवारात सगळ्यांना रामदास मध्ये मिसळ आणि गोल भजी हाणायला न्यायचं की !
8 May 2023 - 7:25 pm | कर्नलतपस्वी
मी म्हणलो होतो पण कुणी नाय ऐकलं.
8 May 2023 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा
सगळे दुष्ट दुष्ट !
12 May 2023 - 2:53 am | पर्णिका
कट्ट्याचा वृत्तांत आवडला.
आम्हीही 'शिवसागर'मध्ये पडीक असायचो. गेल्या कित्येक वर्षांत जाणे झाले नाही, फोटो बघून छान वाटले.
क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली.
😂 😂14 May 2023 - 4:13 pm | प्रदीप
पण एक विनंती आहे. फोटो टाकतांना, त्याबरोबर एका क्रमाने (बहुधा, डावीकडून उजवीकडे) नावे कॅप्शनमधे, किंवा खाली लिहीत जावीत. अन्यथा कोण कोण आहे, ह्याचे आडाखे बांधत बसावे लागते. आणि हे क्रमवा लिहीतांना, जेव्हढी माणसे फोटोत आहेत, तेव्हढी व तेव्हढीच नावे असावीत. आता येथे पहिल्याच फोटोत पाचजण आहेत, नावे चारच आहेत. थोडी खबरदारी घेणे कठीण जाऊ नये, ना?
15 May 2023 - 11:36 am | राजेंद्र मेहेंदळे
फोटो क्र. २ ----डावीकडून -रामचंद्र ,कर्नल तपस्वी ,राजेंद्र मेहेंदळे ,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा (नाव आठवत नाही)
14 May 2023 - 11:21 pm | राघव
कट्टा होणार आहे हे माहित नव्हते.. पुढल्या वेळी नक्की!
15 May 2023 - 1:03 pm | कंजूस
राजमाची पॉईंट.
खादाडी -मिसळ उकडलेले मक्याचे दाणे. कुठेही एकच चव.