आधीचे भाग
निवडणूक
साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात?
अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार?
पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा.
अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात. मतेच नाही मिळाली तर काय फायदा?
एक युक्ती आहे. एकगठ्ठा मते मिळु शकतील आपल्याला. पण त्यांची एक मोठी मागणी पूर्ण करावी लागेल.(काही कानगोष्टी होतात)
करु की. तेही करू आपला ऊमेदवार निवडुन येणार असेल तर.
---------------------------------------------------
नाना निवडुन आले, आणि आजकाल आजुबाजुच्या लोकांची पहाट जवळच्या नवीन मशिदीतुन बांग ऐकुन व्हायला लागलेय.
प्रतिक्रिया
2 Mar 2023 - 5:29 pm | कर्नलतपस्वी
खुर्ची साठी काय पन...
3 Mar 2023 - 2:26 pm | सौंदाळा
अगदी वास्तवाच्या जवळ जाणारी.
मते किंवा पैशाचा पाठिंबा घेऊन मिंधेपणा पत्करला की पुढे ५ वर्षे त्यांच्याच तालावर नाचायचं
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.