पुरते फसले.... -

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
5 Apr 2023 - 12:41 pm

सावरकर हा विषय का काढला असेल राहुलने आणि तमाम तथाकथित सेक्युलर, ढोंगी पुरोगामी, हुशार विचारवंतांनी का बरे तो उगाळायचा ठरवला असेल ? 2024 मध्ये काहीही करून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत याची यांना कुणी सुपारी दिलीय की काय ही शंका यावी !!

भारतीय समाजात एक अजस्त्र ध्रुवीकरण झाले आहे. याचा थांगपत्ता मोदी विरोधकांना नाही हे अशक्य आहे. काँग्रेस पक्षाचा नेता तपस्या, रामायण, मंदिरांमध्ये पूजा, जानवे परिधान करून फोटोग्राफी असले उद्योग अन्यथा का करेल ? सगळे राजकीय प्रयत्न करून झाल्यावर ज्या कारणामुळे मतदान मोठयाप्रमाणात विभागले जात आहे ती दृश्य वाटणारी कारणे निष्प्रभ करण्याचे हे प्रयत्न होते. मी ही त्यातलाच, तुमचाच हे सांगण्याचा प्रयत्न. आपल्या ढोंगी पुरोगाम्यांची देखील भाषा गेल्या पाचसात वर्षात बदलल्याचे जाणवले आहे काय ? आम्ही देखील हिंदूच आहोत अशी बऱ्याचदा ते सुरुवात करतात...

ध्रुवीकरण धार्मिक नाहीय. अनेक दशके पसरविलेला खोटा इतिहास, खोटी समाजरचना, खोटा जातीयवाद, खोटे अर्थकारण कळायला लागल्यामुळे जागृत झालेल्या समाजाच्या मोठ्या भागाने - 38 टक्के - मोदीना उचलून धरले आहे. ध्रुवीकरण भ्रमित करणारी व्यवस्था आणि आपली ओळख कळलेला, जागा झालेला समाज यांच्यामध्ये झाले आहे. हिंदुत्व हे निव्वळ वरवरले दर्शन आहे, किंवा चतुर लोकांना तितकेच बघायचे आहे आणि दाखवायचे आहे. त्यामुळे हे बिनडोक लोक मुसलमान भयभीत आहेत वगैरे अत्यंत बकवास आणि पोकळ प्रचार करत असतात. यांना आज ही वाटते की हा केवळ राजकीय विषय आहे. त्यामुळे समस्त विशेषतः ढोंगी विचारवंत, सोंगाडे पुरोगामी इत्यादींच्या लिखाणात बोलण्यात 'काहीही करा - म्हंजे तत्वांना कितीही बगल द्या - पण मोदीला खाली खेचा' इतकाच प्रचार वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये झळकताना दिसेल. समाजाची नस न ओळखणाऱ्या या सगळ्यांची ही स्थिती अतिशय केविलवाणी आहे.

अन्य क्रांतिकारकांच्या का नाही सावरकरांचीच गौरव यात्रा का काढताय या प्रश्नाच्या उत्तरात समाजमनाचे दर्शन आहे. गांधीजींपासून, भगतसिंग, बोस, पटेल, मौलाना आझाद, आझाद, अश्फाक उल्लाह.... इत्यादी सगळ्यांच्या ऋणात भारतीय समाज आहेच. या सर्वांच्या - सहस्त्रावधी ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या - योगदानामुळे आमच्या स्वतंत्र, मुक्त जगण्याचा बेसिक अधिकार मिळाला आहे याची प्रत्येक भारतीयाला जाणीव आहे. पण या पलीकडे अनेक दशके आपली फसवणूक होत होती, इंग्रज गेल्यावर देखील आपलेच स्वार्थी लोक आपल्यात भेद निर्माण करत आपल्यावर राज्य करत राहिले. आपल्याच शहाणे समजले जाणाऱ्या आजुबाजुच्या विचारवंतांनी त्या स्वार्थी लोकांची सुपारी घेऊन आपल्याला फसविले हे आता भारतीय लोकांना समजायला लागले आहे. असा जागृत समाज मोदींच्या पाठीमागे आहे. हे न ओळखता बावळट लोक पुन्हा तोच तो घोळ घालत बसताहेत.

सावरकर हा विषय जितक्या वेळेला छेडला जाईल तितक्या वेळेला समाजातल्या जागृत झालेल्या जनतेला डिवचले जाईल. सावरकरांनी माफी मागितली की नाही किंवा गांधीजी लहान मुलींबरोबर त्यांना कपडे न घालू देता नागडे झोपत होते का होते... याच्याशी लोकांच्या श्रद्धेला काहीही घेणे देणे नाही ! सावरकरांवर अगदी अन्य स्वातंत्र्य सैनिकांवर आहे तशीच आणि तितकीच श्रद्धा आहेच, पण या निमित्ताने व्यक्त होते आहे ती मात्र चीड- अनेक दशके फसविले गेल्याची..याच्या मध्ये केवळ हिंदुत्व, संघ, मोदी असे काहीही नाही.

राहुल आणि सावरकरांवर - म्हणे संशोधन करून - टीका करणाऱ्या समाजातल्या समस्त हुश्शार लोकांचे आभार ! तुम्ही तुमचे धंदे करत राहता त्यामुळे गौरव यात्रा जल्लोषात निघत आहेत सावरकर हा विषय घराघरात पोचतो आहे.. परिणाम हा नाहीय की हजारो नवीन सावरकर भक्त तयार होतील, तो तसा सावरकरांचे तत्वज्ञानच होऊच देणार नाही. परिणाम हा होतोय की अधिकाधिक भारतीय समाज जागृत होतो आहे. अधिकाधिक जनतेला आपण अनेक दशके आपल्याच लोकांकडून नाडले गेलो हे कळते आहे. आणि या सगळ्याचे खलनायक स्टेजवर, टीव्हीत, ट्विटरवर दिसतातच - जे अकारण - सावरकरांसारखा विषय छेडून समाजाच्या भावनांची चेष्टा करीत आहेत. शिवाय आजुबाजुला आपल्या वॉल वर गांधीजींचे फोटो चिकटवून, साने गुरुजींच्या मार्दवतेचा आव आणत, दाढीचे खुंट वाढवून, जातीअंताची भाषणे ठोकत समाजाला भ्रमित करणारे, समाजाचा बुद्धिभेद करणारे, भारतीयत्वापासून नाळ तोडू पाहणारे ...खल नायकांपेक्षाही डेंजरस शत्रु कोणकोण आहेत हे देखील समाज जवळून बघतो आहे.
-सुधीर मुतालीक

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Apr 2023 - 12:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

केहना क्या चाहते हो भाई?
मोदी चांगले म्हणावे तर अदानीसारखे लोक आपल्या पैशावर डल्ला मारताहेत, आणि यु. पी. मध्ये गोहत्या बंदीमुळे मोकाट गायी रस्त्यावर फिरत आहेत.
काँग्रेस चांगली म्हणावी तर त्यांच्याच कळात बोफोर्स, २जी घोटाळे झाले आणि वोट बँकेसठी मुस्लिम लांगुलचालन वगैरे आहेच.
केजरी चांगला म्हणावा तर लोकांना सगळे मोफत देउन भिकेला लागेल.
ममता चांगली म्हणावी तर मा/माटी/मानुष च्या अजेंड्याने उद्योग धंदे कसे बुडीत निघाले आणि राज्य मागासलेले राहिले ते दिसते. कम्युनिस्टांचे वेगळेच. एकुण सगळे एक से बढकर एक नालायक आहेत.

सुधीर मुतालीक's picture

5 Apr 2023 - 2:22 pm | सुधीर मुतालीक

....काय नाही हो. वेळ जात नव्हता म्हणून मराठी टायपिंगची आणि लिहिलेलं इथे डकवण्याची प्रॅक्टिस करत होतो. पण बरे गावले तुमी ! बरोबर आहे तुमचे. तुम्हाला विषय समजला नसल्यामुळे तुमी तर भलत्याच समस्येंची लड लावली इथे....बाय द वे : हे कुणी सांगितलं तुम्हाला की अदानी तुमच्या पैशावर डल्ला मारतोय ? हिंडेनबर्गने ? की साधना मासिकाचे वर्गणीदार आहात ? ते काहीही असो. ताबडतोब पोलीस कम्प्लेंट करा. हिरो व्हाल की राव देशात. 

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Apr 2023 - 2:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रॅक्टीस करत असाल तर चालु द्या. शुद्धलेखन सुधारेल.

हे कुणी सांगितलं तुम्हाला की अदानी तुमच्या पैशावर डल्ला मारतोय ? हिंडेनबर्गने ? की साधना मासिकाचे वर्गणीदार आहात ?

मी कोण आहे सांगण्याआधी तुम्ही कोण आहात ते सांगा. मोदीभक्त की विरोधी? मग ठरवतो.

बाकी मोदींचे नाव घातल्याने धाग्याला टी आर पी नक्की मिळणार.

सुधीर मुतालीक's picture

5 Apr 2023 - 7:31 pm | सुधीर मुतालीक

आता तर तुमचा प्रतिसाद देखील भरकटला राव ! मी कुधी विचारले तुम्ही कोण आहात म्हणुन ???

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Apr 2023 - 8:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

ते वाक्य "साधना मासिकाचे वर्गणीदार" याला उद्देशुन होते. बाकी हा माझा शेवटचा प्रतिसाद. _/\_

सुधीर मुतालीक's picture

6 Apr 2023 - 12:41 pm | सुधीर मुतालीक

अदानी कसे कुणाला लुटतो आहे हे सान्गुन मग रजा घ्या ना राव....

विवेकपटाईत's picture

5 Apr 2023 - 5:39 pm | विवेकपटाईत

अडानीचे अधिकांश प्रकल्प मोदी येण्याच्या आधीच आहे. अधिकांश गुंतवणूक ही आधीची आहे.नुकतेच राजस्थान सरकारने ५००० एकर जमीन सोलर ऊर्जेसाठी अत्यंत स्वस्तात दिली. बाकी मोदी आल्यानंतर दिवाळखोर कायदा कटिंग ८ लाख कोटीहून जास्त बुडीत रक्कम बड्या उद्योजकांकडून वसूल केली आहे.
केजरी राज्यांत शिक्षा पासून सर्वच गड्यात जात आहे RTI पहा.
गेल्या आठ वर्षांत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. २०१४ आणि २०२२ आकड्यांची तुलना करून पहा.

सुधीर मुतालीक's picture

5 Apr 2023 - 7:37 pm | सुधीर मुतालीक

राजेंद्र रावांचा संवाद कुठेतरी भलत्याच लेव्हल वर सुरु आहे, मूळ विषय सोडून. त्यांनी आपली अशीच एक कमेंट टाकून दिलेली दिसतेय. कुठेतरी ऐकून आले असतील, वो मोदी बोला तो तुम अदानी बोलने का वेग्रे....

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2023 - 1:30 pm | कर्नलतपस्वी

जोपर्यंत सर्वसामान्य जागृत होत नाही तोपर्यंत समाज निद्रिस्त पण मागील काही वर्षांपासून काहीतरी उलटफेर दिसत आहे चांगली लक्षणे आहेत.
सहमत आहे. लेख आवडला.

आखूड शिंगी बहुदुधी मिळणे मुश्कील आहे. जर समाज जागृत झाला तर आपोआपच संधीसाधूचा खेळ संपेल.

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2023 - 2:28 pm | कर्नलतपस्वी

समाजाचा बुद्धिभेद करणारे, भारतीयत्वापासून नाळ तोडू पाहणारे ...खल नायकांपेक्षाही डेंजरस शत्रु कोणकोण आहेत हे देखील समाज जवळून बघतो आहे.

देव वाटून घेतले,पुढारी वाटून घेतले.

कुसुमाग्रज यांची पाच पुतळे कविता आठवली.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2023 - 5:37 pm | चौथा कोनाडा

सावरकरांवर लिहिलेली एक कविता आठवली !

मी कागद झाले आहे

मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|”
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||

— लोककवी मनमोहन नातू.

कर्नलतपस्वी's picture

6 Apr 2023 - 7:27 pm | कर्नलतपस्वी

ही कवीता वाचली होती पण नुसतेच शिर्षक लक्षात होते.

शहरातील पाच पुतळे...

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
- कुसुमाग्रज

आता परिस्थिती आणखीनच बिकट झालीयं.