अमेरिका ५ - व्हिजिट Nvidia
21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ! आमचा योग आला याच दिवशी आमच्या मुलीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा येण्याचा! तीचं कॅली मधील, बे तील Nvidia कंपनीचे हे एचक्यू! हे झालं शॉर्ट फॉर्म उत्तर.. समजेल असे उत्तर म्हणजे कॅलिफोर्नियातील बे एरिया भागातील Nvidia कंपनीचं एचक्यू म्हणजे हेडक्वार्टर. आवश्यक सिक्युरिटी चेक करून आम्ही आत आलो. अबब ! भली मोठी 4 मजली छतापर्यंत ओपन दिसणारी बिल्डिंग. पूर्ण छतावर सोलर पॅनल आणि उजेडासाठी ठिकठिकाणी ग्लास पॅनल्स् ! प्रत्येक मजल्यावर चहा-कॉफी-गरम पाणी देणारी पॅन्ट्री एरिया. तळमजल्यावर कॅफे वेगळा. त्यात वेगवेगळ्या देशाचे खाद्यपदार्थ मेन्यू रोज बदलणारे असतात.