मुक्तक

पंढरीची वारी

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
29 Jun 2023 - 7:07 pm

महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.

संस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचार

और तुम्हारे कंधे का तील..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
25 Jun 2023 - 8:27 pm

तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून,
गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत,
थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा.
त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं.
कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर..
आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ.
अगदी निवांत...
जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ..
....
मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत
आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू..

भावकवितामुक्त कवितामुक्तक

आठ्या

अहिरावण's picture
अहिरावण in जे न देखे रवी...
23 Jun 2023 - 1:37 pm

प्रेरणा : ओळखा पाहू

कॉलेजात
झब्बा, जीन्स अन कोल्हापूरी
चप्पल घालून निवांत
हिरवळ पहात
गप्पा मारत
कट्ट्यावर बसायचो ते दिवस
अचानक आठवले अन
चला बरेच दिवसांत
कोल्हापूरी चप्पल आणली नाही
म्हणुन आणावी असे ठरवतो तोच...
बाबा, मला नवे बुट आणायचे आहेत पैसे द्या जरा
म्हणून पोराने हुकुम सोडला

मुक्तक

(पाट्या) :/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
23 Jun 2023 - 9:52 am

सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं.
आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या

बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे
गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या

पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी
उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या.

अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या
वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या

लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल
नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या

संस्कृतीमुक्तकविडंबनसमाजजीवनमान

बरणी..

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
22 Jun 2023 - 1:18 pm

गुढ वाट्याहून प्रेरित होऊन..

मोठ्या हौशीने
बरणी आणली
आधी पत्र्याचं
झाकण होतं
लोणचं घातलं
सतत तेलं खारं
संपर्कामुळे ते
झाकण गंजल...

मग खुप
शोधा शोध केली
बोरं आळी,गंज बाजार
त्याच मापाचं
प्लास्टिक झाकण
शोधून मिळवलं ..

आता लोणचं
नाही टाकलं
मुरांबा केलाय
आंबट गोड
वेलदोडे ,लवंग
स्वादाने भरलेला

बरणीत मुरांबा
आता चांगला
मुरलाय

मुक्तकविडंबनसाहित्यिकजीवनमान

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
15 Jun 2023 - 1:07 pm

सख्या रे...

प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला.

काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली. बघा केलेला शब्दच्छल आवडतो का?
-
-
जाऊ नको सखये,तशी तू
स्पर्शाने माखलेली..
म्हणतील कुठूनं आली
ही कोर डागाळलेली

धग तापल्या तनूची
जाळेल साऱ्या जगाला
म्हणतील लोक सारे
श्रावणात ग्रीष्म कोठुनी आला

उकळीजिलबीदुसरी बाजूदृष्टीकोनकवितामुक्तकशब्दक्रीडा

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
15 Jun 2023 - 12:03 am

pune

मांडणीइतिहासमुक्तकसमाजप्रवासप्रकटनसमीक्षालेखबातमीअनुभवविरंगुळा

चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण .......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
9 Jun 2023 - 4:02 pm

दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

वा रा कांत

चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण होते म्हणून विचारले तर पुष्कळ लोकांना माहीती नसेल. एखादा वात्रट पोरगा म्हणेल चव्हाणांचा चंद्या.

११७ वर्षापुर्वी ठाण्याच्या वसई तालुक्यात अर्नाळा गावी चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचा जन्म ९ जुन १९०६ साली झाला.(आज ९जुन आहे)

मुक्तकसद्भावनालेखविरंगुळा