समाजमाध्यमांवरील निरागसता
साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकाळी तब्बल तीन हजार खर्च करून आणि रोज किमान ९ तास श्रवणभक्ती करणं हे तसे नविनच होते. या शिबिरात शिकलेल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे जे शब्द आपण सहजंच वापरतो त्यांची नेमकी व्याख्या करण्याची एक सवयच लागली आहे.