महापूर
महापूर
वरुणराजाच्या अंतरी आले |
काळे मेघ जमा केले |
अचानक बरसु लागले |
भूमीवरी ||1||
पाऊस पडला मुसळधार |
तंव नद्यांना आला पूर |
बुडाली खेडी आणि शहरं |
तयांमध्ये ||2||
सांगली आणि कोल्हापूर |
तेथे आला महापूर |
कित्येकांचे घर संसार |
वाहून गेले ||3||
पाण्याची पातळी वाढता |
लोकांची वाढली चिंता |
पुढे काय होईल आता |
कळेना काही ||4||
पुराचे पाणीजेंव्हा वाढले |
लोकं घरात अडकुन पडले |
कोणी गच्चीवरती चढले |
भिती पोटी ||5||