मळभ..!
कुठेतरि बरच दाटलेलं असतं
आणि खरच हमसुन बरसायचं असतं
उगाच नाहि , तर अगदि मनापासुन
डोळ्यातलं पाणि न लपवता
जमेल तितकं सांडायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं
किती विचार करुन प्रत्येकवेळी
आलच जरी भरुन भलत्यावेळी
सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं
परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत
हळुवार डोक खुपसायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचं असतं ..
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं ...