अज्ञाताच्या काठावर

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Jun 2019 - 11:11 am

अज्ञाताच्या काठावर
शब्द होताना धूसर
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून झाले शांत

अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या आलो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्‍याशी थबकलो

अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

खिलजि's picture

11 Jun 2019 - 11:45 am | खिलजि

सुंदर, नितांत सुंदर कडवं झालेलं आहे

"" अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग ""

सारेच नश्वर इथे

ईश्वर शोधू पाहे

अस्तिकाला द्वैताचे वेड

नास्तिक ते मोडू पाहे

जॉनविक्क's picture

11 Jun 2019 - 12:20 pm | जॉनविक्क

मस्त मस्त मस्त

नंदू's picture

11 Jun 2019 - 4:53 pm | नंदू

नितांत सुंदर कविता!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2019 - 4:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Jun 2019 - 5:27 pm | हणमंतअण्णा शंकर...

या कवीच्या कविता उत्तम आहेत. हा कवी शब्दांशी खूप खेळतो. गरजेचे स्कील.
तरीही...
(तीन डॉट्स बद्दल जाहीर माफी)
या कवितांना अनुभवाचा स्पर्श जाणवत नाही. अशी बौद्धिक कविता वाचणार्‍याच्या मनात खोलवर रुजत नाही कारण -
१. त्यातलं बुद्धिगम्य आणि चमत्कृति संपली की शब्दांच्या करामतीचा सांगाडा दिसू लागतो.
२. त्यातलं अगम्याला अनुभवाचा पदरच नसतो त्यामुळे ती 'या हृदयीचे त्या हृदयी' होत नाही.

अशा कवितेला चंप्र देशपांडे विचार कविता म्हणायचे. तुमची कविता- भावकवितेच्या आणि विचारकवितेच्या मध्येच कुठेतरी रेंगाळत राहते. शब्दनिवडीचं सामर्थ्य इथवरच तुमची कविता मर्यादित राहते.

अनन्त्_यात्री's picture

15 Jun 2019 - 7:04 pm | अनन्त्_यात्री

देणार्‍या सर्व कविता रसिकांना धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jun 2019 - 11:59 am | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख, आवडली
पैजारबुवा,