जिलब्या

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Jun 2019 - 2:56 pm

का म्हणून दिवसेंदिवस जिलब्या टाकत राहावे ?

का म्हणून आपणच समूहा पाकमय करावे ?

थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी कढई नि झारा दिसेल

तो हातात घेऊन बसलेला एक साधा खादाड दिसेल

एक दिवस तरी बुभुक्षित बनून बघावे

भुभुकार करून पाहावे

न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे

रुसेल त्याचे फुगवे निपटावे

शांत निवांत राहून जिलब्या धागे वाचावे

वाचता वाचता वाचकाने लेखकाचे पेन घेऊ नये

साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे

खदखदून खदखदून हसावे

विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे

इतके साऱ्या धाग्यावर मौनावे

रमत गमत इन बॉक्स वर राहावे

हम, तुम झुम करत टिचक्या मारावे

एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे

का फक्त आत्मप्रौढी ने स्वधाग्यातच रमावे

साधा वाचक बनावे अन खुशाल मोकळेढाकळे रहा

कविता

प्रतिक्रिया

अक्कू काका आपने मेरे अंदरवाले शैतान को जगाया हय

अब वो शैतान किसी कि भी नाही करेगा गय

अब वो ऐसी कविता लिखेगा

कि तुम बस्स देखते रय

ह्ही ह्ही ह्ही, ह्ही ह्ही ह्ही ,ह्ही ह्ही ह्ही

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 11:03 pm | जालिम लोशन

++1