सिग्नल .....!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
5 Jun 2019 - 6:13 pm

सिग्नल ......

आज लाल दिव्याने नाममात्र
थांबलेत काही गोंगाट ,
नाहीतर कोण इथे थांबतं ......
सगळेच घाईच्या लयीत !

इतक्यात .......
धुळीने माखलेल्या
चाळीस वर्षांच्या
रखरखीत पायाच्या बोटांवर
चार वर्षांच एक डोकं ठेवलं गेलं ..!
अन्
त्या कोमल गालांचा स्पर्श होताच ......
झटकन पाय मागे घेऊन
तो ओरडला " ए हट ...... "

त्याच्या डोळ्यातली लाचारी
पाहायला वेळ नसेल पण,
त्या स्पर्शाने काळीज
गलबलले असणार नक्कीच !

तरीपण ....

"कालच नवीन चप्पल घेतलीये...."
असं म्हणेपर्यंत, दिवा हिरवा झाला !

अन पोर ....... परत लाल सिग्नल ची वाट बघू लागलं !

------------- फिझा .

कविता

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

6 Jun 2019 - 9:24 am | सोन्या बागलाणकर

वाह!
हृदयस्पर्शी वास्तव. =(

या अनुभवाला कवितेची साथ , शब्दांची गुंफण नसती

तरी ऊर भरून आला असता आणि पापणी ओलावली असती

या कविता वाचनानंतर ,

मलापण ते बाळ आठवलं

ज्याच्या आईला ( ? ) मी ओरडलो होतो

एक दिवसाचा प्रपंच दान दिला खरा

पण पुढचे चार दिवस अक्षरशः रोडावलो होतो

ते बाळ अजूनही तसंच आहे आणि त्याची आईही ( ?)

मी पण तिथून ये-जा करतो नेहेमी

आणि तो सिग्नलही ......

जॉनविक्क's picture

7 Jun 2019 - 10:49 pm | जॉनविक्क

अन तितक्याच प्रभावी काव्याला.

वाईट वाटतं काही क्षण, मग मी ही पुन्हा रमतो पुढील मन गुंतवणाऱ्या मजकुराच्या शोधात...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Jun 2019 - 8:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हेलावणारी रचना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2019 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे