सिग्नल .....!
सिग्नल ......
आज लाल दिव्याने नाममात्र
थांबलेत काही गोंगाट ,
नाहीतर कोण इथे थांबतं ......
सगळेच घाईच्या लयीत !
इतक्यात .......
धुळीने माखलेल्या
चाळीस वर्षांच्या
रखरखीत पायाच्या बोटांवर
चार वर्षांच एक डोकं ठेवलं गेलं ..!
अन्
त्या कोमल गालांचा स्पर्श होताच ......
झटकन पाय मागे घेऊन
तो ओरडला " ए हट ...... "
त्याच्या डोळ्यातली लाचारी
पाहायला वेळ नसेल पण,
त्या स्पर्शाने काळीज
गलबलले असणार नक्कीच !
तरीपण ....
"कालच नवीन चप्पल घेतलीये...."
असं म्हणेपर्यंत, दिवा हिरवा झाला !
अन पोर ....... परत लाल सिग्नल ची वाट बघू लागलं !
------------- फिझा .
वाह! हृदयस्पर्शी वास्तव. =(
आई गं , काय लिवलंय तुम्ही ... इथे , थेट इथे, आत जखम झाली
अत्यन्त जबरा प्रतिसाद
हेलावणारी रचना
छान