कविता

मन अंतर्मन

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
17 Jan 2014 - 9:56 am

उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे
मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे
दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे
दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे

कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते
क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते

……………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Jan 2014 - 10:25 pm

विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.

सैनिक

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in जे न देखे रवी...
13 Jan 2014 - 8:13 pm

शाळा संपल्यावरही केबिनमध्ये 
दिवा जळता ठेवून 
योजना आखत राहणारे मुख्याध्यापक 

कलत्या दिवसावेळी दमून येऊनही
'पुस्तक हवे' म्हणल्यावर 
उत्साहाने सायकल काढणारे बाबा 

तापाने फणफणत असूनही 
थंडीत चार वाजता उठून 
अभ्यासाआधी चहा देणारी आई

स्वत:ची दिवाळी मनाआड टाकून 
माझ्यासारख्या अनेकांना 
उत्सवासाठी घरी नेणारा एसटीचालक

महायुद्धाच्या पटावरचे लक्षावधी छोटे सैनिक 
कदाचित असेच असतील नाही?… 
जीव विझू आला तरीही 
शेवटच्या श्वासापर्यंत…. 
मनापासून कर्तव्य बजावणारे ! 

-- अमेय

कविता

प्रीत खुळी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
12 Jan 2014 - 1:06 pm

एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी
वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी
उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी
अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी

कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी
मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी
वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली
जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी

……………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

अपेक्षा

मि मिपाचा मित्रच's picture
मि मिपाचा मित्रच in जे न देखे रवी...
10 Jan 2014 - 1:08 pm

नमस्कार

माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न ..

काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते..
स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व.

!! अपेक्षा !!

कविता

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
10 Jan 2014 - 11:38 am

गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली.

जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!!

"एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

धोरणइतिहासकवितागझलसमाजदेशांतरराजकारणछायाचित्रणप्रकटनसद्भावनाआस्वादमाध्यमवेधमदत

काळजातली धग विझु देउ नकोस.......

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture
पंडित मयुरेश ना... in जे न देखे रवी...
9 Jan 2014 - 7:02 pm

एक प्रश्न विचारावासा
वाटतो देवा तुला
असा कसा संसाराचा
गाडा तु उभा केला

कुणी न जिंकती कुणी न हारती
कुणी न हसती कुणी न रडती
सारेच अभिमन्यु इथे
नशिबाच्या चक्रव्युहात अडकती

पैजांचा असतो डाव
तीन पत्त्यांत रंगतो खेळ
इथे कुणाचे कुणीच नसती
फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ

क्षितीजाच्या वाटेवरती
डोळे सारेच लावुन बसतात
तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त
मनातल्या मनात हसत राहतात

ठिणग्यांची कमतरता इथे
अगदीच आहे असे नाही
पण सारे रानच पेटुन उठावे
असे काही घडतच नाही

कविता

नविनच

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Jan 2014 - 12:39 pm

पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे
हे जरा नविनच होते
चिंब होऊनही मी धुंद न होणे
हे जरा नविनच होते
.
हा कुठला नवा खेळ?
.
दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो
'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो
ढग फुटून 'तो' असा काही बरसतो
त्या गंधाने मी आकंठ मोहरतो
.
नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो
सचैल भिजून भान हरपतो
कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात
हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते
मनात वसंत रुंजी घालाया लागतो
मग आजच असे का व्हावे?
.
हा वर्षाव कोरडा का वाटावा

शृंगारशांतरसकविताप्रेमकाव्य

क्षण

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
5 Jan 2014 - 8:43 pm

सोनेरी किरणं अंगावर पडली
तशी त्याची चुळबुळ सुरु झाली
किणकिण्या डोळ्याने पाहिले त्याने आजूबाजूला
आज नेहेमीपेक्षा जरा जास्त लख्ख वाटत होतं
काय की...
थोडं जास्त दिसतही होतं पण तरी
अजून काही पहावं असंही वाटत होतं त्याला
धडपडत ऊठलं ते
आपल्या चिमुकल्या पायांवर तोल सांभाळत
आजूबाजूच्या अनुभवी जीवांना कळलं आता काय होणार आहे ते
त्यांना एकीकडे आनंदही होत होता आणि थोडं दु:खही
कारण आज 'तो' दिवस होता...
कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून
झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात
त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने

कविता

माझी मिठि अद्याप खुली आहे..........

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture
पंडित मयुरेश ना... in जे न देखे रवी...
5 Jan 2014 - 2:27 pm

कानी पडला आवाज पैंजणांचा
झपकन नजर मागे गेली
मनास झाला भास पावलांचा
मला तर वाटले तुच आली

असे कित्येकदा होत असते
तुच सगळीकडे दिसत असते
वार्याची एखादी झुळुकही
तुझ्या येण्याची चाहुल भासते

तु दूर जातेस जेव्हा
परतीची मी वाट बघतो
ज्या वाटेने गेलीस तु
त्याच वाटेवर उभा राहतो

तुझे निघुन जाणे नेहमीचेच
माझेही वाट पाहणे नेहमीचेच
जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे
आपले भांडण होणे नेहमीचेच

कविता