चांदणचकवा
काट्यांत हरवली वाट
संदिग्ध पावले माझी
वळणावर एका अवचित
अबोल होऊनी गेली....
वस्ती ही आता दूर
वळ्ण्याचा नाही धीर
एकाकी निर्जन रानी
हे श्वास ही होती तीर....
जगण्याचे वादळ शमले
मृत्युची ओढ न उरली
निस्तब्ध शांत या रात्री
ओझेच सावली होई....
भिरभिरतो रानी आता
दिशाहीन जणू रावा
जगण्याच्या आवर्ताला
मरणाचा चांदणचकवा...
पद्मश्री चित्रे (फुलवा)