कविता

निळा पक्षी (बुकोवस्कीची क्षमा मागून)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
10 Feb 2014 - 3:52 pm

लिहितांना बुकोवस्कीच्या ब्ल्यूबर्ड चा अनुवाद करायचा नाही किंवा संपुर्ण त्या कवितेवर आधारीत कविता लिहायची नाही हे नक्की होतं. नंतर लिहिलेल्या काही कडव्यांवर अर्थातच बुकोवस्कीचा प्रभाव जाणवेल, पण तरीही ती बर्‍यापैकी स्वतंत्र झाली आहे असं मला वाटतं. बुकोवस्की माहित नसतांना जी कविता मनात जाणवली होती पण शब्दात उतरली नव्हती, ती शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय...

कविता

आज आसु मझ्या.....

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture
पंडित मयुरेश ना... in जे न देखे रवी...
7 Feb 2014 - 8:34 pm

आज आसु मझ्या
डोळा आले
ते पाहुन हसु तुझ्या
ओठी आले

क्वचितच घडते
असे कधी कधी
दुखावतो जेव्हा
मीही अधी मधी

कणखर म्हणवतो
पुरुष आम्ही स्वतःस
तरी अलगद फसतो
अशाच हळव्या क्षणांस

मग येतेस तु जवळ
ठेवतेस डोक्यावर हात
नकळत सांगुन जातेस
आहेना माझी साथ

मीही मग हसतो
हलकेच श्वास सोडतो
ठेवतो अलगद डोके
ओंजळीत तुझ्या.....

- कवी म. ना. दे.

कविता

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
7 Feb 2014 - 2:57 pm

तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या
मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या
भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या
जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली
अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या
जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे
जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला
झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

तळटीप :

नमस्कार

हझलहास्यकविताविडंबनसमाजराजकारण

ऋण

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
7 Feb 2014 - 4:46 am

भांबावतो कल्लोळ.
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...

तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?

परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

करुणकविता

चिमुटभर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
6 Feb 2014 - 8:35 pm

हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची
आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची
एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी
झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची

रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी
फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी
संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची
सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी

………………अज्ञात

अद्भुतरसकविता

एक गीत

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
6 Feb 2014 - 4:19 pm

सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर,

आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे.

ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे,
परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे !

एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की,
अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे?

हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले?
तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे?

बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा,
ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे!

कविता

संत मीराबाईची विराणी

आयुर्हित's picture
आयुर्हित in जे न देखे रवी...
3 Feb 2014 - 9:21 pm

नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही||

पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग|
चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग||

पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला |
कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला||

जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको|
विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको||

अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा|
बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा||

राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो|
विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||

करुणसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकविराणी

पांडुरंग

आतिवास's picture
आतिवास in जे न देखे रवी...
3 Feb 2014 - 2:16 pm

बेल वाजली..
’आत्ता या वेळी कोण?’
चडफडत दार उघडले,
तर समोर पांडुरंग -
मला म्हणाला, “बोल".

कटेवर हात नव्हते,
पायाखाली वीट नव्हती,
चंदनाचा टिळा नव्हता,
भोवती भक्तीचा मळा नव्हता.

मी म्हटले, “या, बसा.
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर,
पण उगीच दांभिक
देवत्त्वाचा आव आणू नका.”

“हे तर लई बेस झालं"
म्हणत तो विसावला,
आरामखुर्चीत बसून
गॅलरीतून दिसणारा
आकाशाचा तुकडा
न्याहाळताना हरवून गेला.

कविता

अमेठीची शेती

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
3 Feb 2014 - 12:26 am

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी

अभय-लेखनमराठी गझलवाङ्मयशेतीकवितागझल

'अद्वैत'

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
2 Feb 2014 - 7:08 pm

'अद्वैत'

खांद्यावर रूळते कुंतल बट नादान
ओठावर हलके स्मीत : कळ्यांचे रान !

क्षण एक अडकतो मत्स्य जसा जाळ्यात
नयनातुन उसळे इंद्रधनुष्यी बाण !

जणू संगमरवरी आरस्पानी कात
वक्षात धपापे चंद्र नवा बेभान

मनी बधीर भुंगा : भरकटतो विरक्त
रात्रीस कवळते आसक्ती वैराण !

नागीण विराजे लवलवती देहात
रक्तातुन तुटती तीव्र विजेचे ताण !

श्वासातुन उसळे राग असा बेफाम
रात्रीला छळते दूर उषेचे गान

बेशीस्त र्रुतुंच्या उजाड भिंतीवरती
अस्वस्थ उगवती लवलवती हे प्राण ।

कविता