ऋण

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
7 Feb 2014 - 4:46 am

भांबावतो कल्लोळ.
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...

तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?

परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

करुणकविता

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

7 Feb 2014 - 6:51 am | सुहास..

:)

आवडली

आतिवास's picture

7 Feb 2014 - 7:47 am | आतिवास

आवडली.

अजया's picture

7 Feb 2014 - 8:21 am | अजया

आवडली.

प्रचेतस's picture

7 Feb 2014 - 8:54 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.

मृत्युन्जय's picture

7 Feb 2014 - 6:05 pm | मृत्युन्जय

आवडली.

भावना कल्लोळ's picture

7 Feb 2014 - 6:07 pm | भावना कल्लोळ

सुंदर लिहिले आहेस.

>>>ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

हे बेटं सगळीकडंच घोळ करतं.

आवडलं मुक्तक

सखी's picture

7 Feb 2014 - 7:32 pm | सखी

सुरेख जमलयं आणि बिटविन द लाईन्स खूप काही सांगतात असे वाटते.

आदूबाळ's picture

7 Feb 2014 - 7:44 pm | आदूबाळ

कविता छान!

त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.

आवडलं

इन्दुसुता's picture

7 Feb 2014 - 9:07 pm | इन्दुसुता

आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...
कोण सुटलय यातून? तरीही ठाव सुटायचा राहत नाही.

गुंतून राहिलेलं हे मन... आणि हे तरी कुणाला सुटलय?

रचना आतपर्यंत पोचली... आवडली.

पाषाणभेद's picture

8 Feb 2014 - 3:58 am | पाषाणभेद

+१ रचना आतपर्यंत पोचली... आवडली.

उपास's picture

7 Feb 2014 - 9:22 pm | उपास

तरल.. सुंदर मांडलेयस!
>>परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...>>
आणि 'गुंत्यात गुंतूनिया, पाय माझा मोकळा..' म्हणणारा (स्वच्छंद) तो...

सस्नेह's picture

7 Feb 2014 - 9:55 pm | सस्नेह

सगळंच काही समजलं नाही. पण तरीही शब्द आवडले

पैसा's picture

7 Feb 2014 - 9:56 pm | पैसा

सुंदर कविता!

यशोधरा's picture

7 Feb 2014 - 11:26 pm | यशोधरा

धन्यवाद!

इशा१२३'s picture

8 Feb 2014 - 12:26 pm | इशा१२३

सुरेख!

तिमा's picture

8 Feb 2014 - 12:29 pm | तिमा

कविता आवडली असे म्हणण्यापेक्षा भिडली असे म्हणेन. अशा कवितांतूनच माणूस स्वतःचे अनुभव चाचपून पहातो.

पद्मश्री चित्रे's picture

9 Feb 2014 - 5:29 pm | पद्मश्री चित्रे

छान लिहिल आहेस.
>>त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हे आवडलं . (खूप कठीण आहे हे जमणं.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2014 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. और भी आने दो...!!!

-दिलीप बिरुटे

राघव's picture

10 Feb 2014 - 2:14 pm | राघव

हे कसे? -

ऋण कोणाचे कोण स्तवे अन् प्रेम कुणाचे श्रेष्ठ ठरे?
सतजन्माचे नाते अपुले, तुझ्या[च] व्रताचे बंध खरे..
या जन्मातिल साथ तुझी मज मिळती कैसी सांग बरे..
तूच मनांतिल अमृतधारा.. तव प्रेमाने विश्व तरे!

राघव

यशोधरा's picture

10 Feb 2014 - 4:10 pm | यशोधरा

मस्त :)

मज मिळती कैसी? - मिळती?
की मज मिळेल कैसी - असे चालेल?

प्रतिसाद द्यायचा राहून गेला..

नाही इथं मिळती हाच शब्द बरोबर आहे. कारण साथ आत्ता मिळालेली आहे.

स्पंदना's picture

10 Feb 2014 - 5:48 pm | स्पंदना

खासच यशो!
अगदी खास.

इन्दुसुता's picture

10 Feb 2014 - 6:48 pm | इन्दुसुता

@राघव, तुमची रचनाही आवडली. मूळ रचनेपेक्षा तुमच्या रचनेचा आशय काहीसा वेगळा वाटला.

@यशो, मला येथे " मिळती'च योग्य वाटते आहे ( तुझ्या व्रतबंधाशिवाय आपल्याला सातजन्मीचे नाते / या जन्मीची साथ कशी मिळाली असती, असे बहुतेक राघव यांना म्हणायचे आहे)

यशोधरा's picture

10 Feb 2014 - 7:55 pm | यशोधरा

ओह, आले लक्षात! :) बरोबर. धन्यवाद इन्दुसुता.
> मूळ रचनेपेक्षा तुमच्या रचनेचा आशय काहीसा वेगळा>> सहमत.

छान लिहीलंय!! राघव यांची रचनाही आवडली.

इन्दुसुता's picture

10 Feb 2014 - 11:50 pm | इन्दुसुता

ओह, आले लक्षात! Smile बरोबर. धन्यवाद अतिवास.

आतिवास ?

सॉरी, गोंधळ झाला इन्दुसुता. :)

समीरसूर's picture

11 Feb 2014 - 12:13 am | समीरसूर

कविता खूपच छान आहे. अजून येऊ द्या...

अज्ञातकुल's picture

19 Feb 2014 - 4:04 pm | अज्ञातकुल

सुंदर .... प्रथमच वाचली असेल मी तुमची कविता आज... छानच लिहिलंय ... :)

सटक's picture

21 Jan 2016 - 8:39 pm | सटक

छान!

माहितगार's picture

22 Jan 2016 - 9:05 pm | माहितगार

+१

पद्मावति's picture

22 Jan 2016 - 11:21 pm | पद्मावति

सुरेख!
कविता आवडली.