संत मीराबाईची विराणी

आयुर्हित's picture
आयुर्हित in जे न देखे रवी...
3 Feb 2014 - 9:21 pm

नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही||

पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग|
चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग||

पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला |
कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला||

जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको|
विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको||

अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा|
बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा||

राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो|
विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||

उदास मन माझे मंदिरात, उभी मी खिन्न अंगणात|
घायाळ फिरते हरिणीवानी, व्यथा कोणी जाणेनात||

काळजाचा तुकडा माझा, कावळ्या मी दिला जरी|
दिसल्याविन प्रिय माझा, खाऊ नकोस तोवरी||

नाते माझे असे नामाशी, दुसरे नाते नसे जरी|
मीरा झाली व्याकूळ विरहणी, करण्या दर्शन श्रीहरी||

मीराबाईची विराणी, असे मुळात मारवाडी|
अर्थ वदतो आयुर्हित हा, जमे न बाराखडी||

मुळातली विरहणी, मारवाडीत अशी आहे:

नातो नामको जी म्हांसूं तनक न तोड्यो जाय।।

पानां ज्यूं पीली पडी रे लोग कहैं पिंड रोग।
छाने लांघण म्हैं किया रे राम मिलण के जोग।।

बाबल बैद बुलाया रे पकड दिखाई म्हांरी बांह।
मूरख बैद मरम नहिं जाणे कसक कलेजे मांह।।

जा बैदां घर आपणे रे म्हांरो नांव न लेय।
मैं तो दाझी बिरहकी रे तू काहेकूं दारू देय।।

मांस गल गल छीजिया रे करक रह्या गल आहि।
आंगलिया री मूदडी म्हारे आवण लागी बांहि।।

रह रह पापी पपीहडा रेपिवको नाम न लेय।
जै को बिरहण साम्हले तो पिव कारण जिव देय।।

खिण मंदिर खिण आंगणे रे खिण खिण ठाडी होय।
घायल ज्यूं घूमूं खडी म्हारी बिथा न बूझै कोय।।

काढ कलेजो मैं धरू रे कागा तू ले जाय।
ज्यां देसां म्हारो पिव बसै रे वे देखै तू खाय।।

म्हांरे नातो नांवको रे और न नातो कोय।
मीरा ब्याकुल बिरहणी रे हरि दरसण दीजो मोय।।९।।

संदर्भ : पांडुरंग (आतिवास)
धन्यवाद आतिवास, आपल्या मुळेच तयार झाला हा उन्मुक्त अनुवाद!

करुणसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकविराणी

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

4 Feb 2014 - 12:09 am | कवितानागेश

चाम्गला प्रयत्न. :)

आतिवास's picture

4 Feb 2014 - 7:48 am | आतिवास

चांगला प्रयत्न. आभार.

मदनबाण's picture

4 Feb 2014 - 10:07 am | मदनबाण

आवडले. :)

प्यारे१'s picture

4 Feb 2014 - 12:30 pm | प्यारे१

आवडलं.

psajid's picture

4 Feb 2014 - 2:27 pm | psajid

भावार्थ पोहोचला !

जेपी's picture

5 Feb 2014 - 2:31 pm | जेपी

आवडल .

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार!
साहित्य म्हणून कोणी जाणकार यावर चिकित्सा/टीका/मार्गदर्शन करणार काय?