तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या
मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या
भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या
जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली
अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या
जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे
जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे
पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला
झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या
तळटीप :
नमस्कार
हे उघड्या पुन्हा जहाल्या
या उमाकांत काणेकर लिखीत गीताचे विडंबन आहे. हे विडबंन सुचण्यासाठी पळसाला पाने तीनच या मि.पा. धाग्यावर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या प्रतिसाद अंशतः कारणीभूत ठरला म्हणून प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांना धन्यवाद.
प्रत्येक निवडणूकीत कसाही असला काहीही केले तरी त्याच त्या नेत्यास इमाने इतबारे मतदान करून निवडून देणार्या माझ्या भारतीय मतदार बंधू भगिनींना हे विडंबन काव्य (त्यांच्या मतांचा आदर करूनच) समर्पित करत आहे.
- धन्यवाद