कविता

भरारी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
3 Jan 2014 - 11:13 am

घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी

गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??

………………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

मटका भरके सूरज उल्टा

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
1 Jan 2014 - 7:00 am

नानबाच्या स्वाक्षरीत गुलजार च्या ओळी वाचलेल्या-

तुम बोल रही थीं
होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे !
मैं हैरां...
हैरां हैरां ...

वाचल्या क्षणापासून मनात रुंजी घालत होत्या. जरा गुगलून पाहिलं तर समजलं की गुलजारच्या 'पंधरह पाँच पचहत्तर' या पुस्तकात एक नज्म आहे- 'मटका भरके सूरज उल्टा' , त्यातल्या या ओळी आहेत. अहाहा....कय सुंदर नज्म -

कविता

अंथर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
29 Dec 2013 - 11:49 am

धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर
काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर
शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर

लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर
ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर
आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर

…………………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

बिंब आणि प्रतिबिंब

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
29 Dec 2013 - 10:45 am

सहज वाटलं जीवनाची वाट चालताना
एक प्रसन्न, सुंदर, सुगंधित फूल द्यावं तुला
आणि तुझ्याकडे पहातच राहावं, तू ते फूल पहात असताना
आणि मनातल्या मनात सांगत रहावं काळ पुरुषाला
थांब, जरा थांब, अरे थोडासा तरी थांब
का रे सतत घड्याळाचे काटे पुढे ढकलत रहाण्याची घाई तुला?
असेच सतत राहू दे ना पहात मला
बिंब आणि प्रतिबिंब, बिंब आणि प्रतिबिंब

कविता

टिकले तुफान काही

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Dec 2013 - 12:47 am

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयशेतीवाङ्मयकवितागझल

तेंव्हा

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
27 Dec 2013 - 2:58 pm

तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती
ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती !

जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला
कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती !

वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी
घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती !

भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला
बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती !

दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना
पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती !

करुणकविता

अनुप्रीती

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
25 Dec 2013 - 6:19 pm

विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती
चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती
काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती
हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती

ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती
खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती
तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती
काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती

…………………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 Dec 2013 - 6:57 am

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||

गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||

गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||

चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||

शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||

पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||

- पाभे

अभंगकविता

अशाच एका सांज वेळी

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture
पंडित मयुरेश ना... in जे न देखे रवी...
24 Dec 2013 - 8:24 pm

अशाच एका सांजवेळी
भेट व्हावी आपुली अवेळी

एकांत असावा तेव्हा तेथे
नसावे कोणी अवतीभवती
परतणार्या पक्षांचीही
दाटी नसावी अवतीभवती

काळोखातही लख्ख दिसावा
चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा
पापण्यांची उघड-झाप असावी
जणु चमचमणार्या तारका

गार वार्याची झुळुक येईल
उब घ्यावीशी तुला वाटेल
हातांचा ऊबदार स्पर्श अन्
उश्वासांची साथ भेटेल

मुकी जरी तु उभी असलीस
पैंजण सारे बोलुन जातात
चांदण्यात फिरावयास मग
पाऊले अलगद चालु लागतात

कविता