का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||
गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||
गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||
चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||
शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||
पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||
- पाभे
प्रतिक्रिया
25 Dec 2013 - 7:02 am | चाणक्य
हीच तर गोची झालीये. 'आत' विठ्ठल आहे हेच समजेपर्यंत निम्मं आयुष्य जातय आणि समजले तरी सापडता सापडत नाही.
25 Dec 2013 - 11:47 am | मंगेश खैरनार
"सापडेना" लिहील्यावर "न" ची गरज नाही असे वाटते..
"चंद्रभागेकाठी तू सापडेना", असे असायला हवे कदाचित?
25 Dec 2013 - 11:58 am | आतिवास
सूचनेशी सहमत.
कविता आवडली.
25 Dec 2013 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा
छान.
25 Dec 2013 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर
कवितेचे व्याकरण कळत नाही (तर ते जाऊदे तेल लावत....) पण कविता फार साधी, सरळ आणि समजायला फार सोपी. त्यामुळेच फार आवडली.
25 Dec 2013 - 1:01 pm | मदनबाण
छानच... :)
25 Dec 2013 - 8:09 pm | सुहास..
मस्त !!
25 Dec 2013 - 9:44 pm | प्रचेतस
झकास हो पाभे.