तेंव्हा

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
27 Dec 2013 - 2:58 pm

तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती
ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती !

जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला
कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती !

वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी
घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती !

भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला
बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती !

दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना
पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती !

हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा
चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती !

- साजीद यासीन पठाण

करुणकविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

28 Dec 2013 - 2:55 am | अभ्या..

छान ओ साजिदभाई. मस्त एकदम.
आवडली. :)

जेपी's picture

28 Dec 2013 - 8:04 pm | जेपी

आवडल

सुरुवातीच्या ओळींनी अपेक्षा वाढविल्या होत्या.
पण यमक जुळवण्यासाठी आणलेले ‘खळखळ’, ‘मळमळ’, ‘भळभळ’ असे शब्द काहीसा रसभंग करून गेले. :-(

प्यारे१'s picture

28 Dec 2013 - 9:13 pm | प्यारे१

+१
ती अवतरण चिन्हं तेवढी काढा.
बहुदा बराचसा परिणाम कमी होईल.