धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर
काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर
शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर
लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर
ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर
आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर
…………………………. अज्ञात
प्रतिक्रिया
1 Jan 2014 - 3:23 am | इन्दुसुता
कविता अतिशय अस्वस्थ करून गेली.
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावरकाळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर
आणि
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतरविशेष आवडले