नास्तिक
असलो जरी मी नास्तिक तरी
देवालाच दोष देत मी रडतो
कुणासोबत मंदिरात जाता
विश्वास नसून पाया पडतो....
नाही विश्वास भूता-खेतावर
म्हणत मी टेम्भा मिरावतो
ऐकट पडलो की मात्र
अंधाराला खुप घाबरतो...
खर खोट सिद्ध करायला
मीही शप्पत घेतो
नजर लावली कुणी म्हणून
मीही दूषण देतो...
स्वतावर आहे भरोसा तरी
शिंक आली की थांबतो
नस्तिक्तेच व्याख्यान मात्र
अभिमानाने सांगतो...
सण संपता निरोप घेता
मीही होतो बर भाऊक
आहेच खर का मी नास्तिक
ते त्या इश्वरालाच ठाउक...