असलो जरी मी नास्तिक तरी
देवालाच दोष देत मी रडतो
कुणासोबत मंदिरात जाता
विश्वास नसून पाया पडतो....
नाही विश्वास भूता-खेतावर
म्हणत मी टेम्भा मिरावतो
ऐकट पडलो की मात्र
अंधाराला खुप घाबरतो...
खर खोट सिद्ध करायला
मीही शप्पत घेतो
नजर लावली कुणी म्हणून
मीही दूषण देतो...
स्वतावर आहे भरोसा तरी
शिंक आली की थांबतो
नस्तिक्तेच व्याख्यान मात्र
अभिमानाने सांगतो...
सण संपता निरोप घेता
मीही होतो बर भाऊक
आहेच खर का मी नास्तिक
ते त्या इश्वरालाच ठाउक...
प्रतिक्रिया
10 Dec 2015 - 5:47 pm | निनाव
:)
10 Dec 2015 - 6:20 pm | प्रचेतस
आवडली कविता.
10 Dec 2015 - 6:24 pm | प्रसाद गोडबोले
छाण !
अवांतर : नास्तिक ह्या शब्दाचा खरा अर्थ काय हे एकदा जरा नीट तपासुन पहायला पाहिजे सर्व्वांनी असे वाटले :)
10 Dec 2015 - 9:57 pm | मांत्रिक
धन्स प्रगो!!! स्वयंघोषित विज्ञानवादी विवेकवादी यांनी ही कविता लक्षात ठेवण्यासारखी आहे...
11 Dec 2015 - 4:00 pm | एस
'नास्तिक' या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणे आवडेल.
10 Dec 2015 - 8:56 pm | एक एकटा एकटाच
मस्त कविता आहे
आवडली
10 Dec 2015 - 10:44 pm | जातवेद
आवडली
10 Dec 2015 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा
सदर अवस्था म्हणजे नास्तिकतेची बालवाडी पास आणि पहिलीत प्रवेश अशी असते. पण तिथुन पुढेच जावे हे खरे.
11 Dec 2015 - 12:38 pm | तुडतुडी
खूप छान . नास्तिकतेच ढोंग करणार्यांना मारलेली चपराक आवडली .
11 Dec 2015 - 3:46 pm | सुमित_सौन्देकर
धन्यवाद
11 Dec 2015 - 6:31 pm | तिमा
मी नास्तिक आहे यांत अभिमानाने मिरवण्यासारखं काहीच नाही. आस्तिकांसाठीही तेच लागू पडते. पण इतरांना उपदेश न करता जर कोणी सत्याचा शोध घेऊ लागला तर, त्यावर एवढे टोमणे कशासाठी ?
देव आहे वा देव नाही या दोन्ही गोष्टी पुराव्याने सिद्ध झालेल्या नाहीत, असे एखाद्याला वाटू शकते.
11 Dec 2015 - 8:53 pm | सुमित_सौन्देकर
माझ मत इतकच आहे की... निदान घेतल्या भुमिकेशी प्रमाणिक नक्की रहायला हव:)
11 Dec 2015 - 7:00 pm | पैसा
कविता आवडली.
11 Dec 2015 - 8:00 pm | चौकटराजा
आस्तिक आहे मी तरीही
देव पाप देतो यावर नाही विश्वास
बिनदिक्कत बोलतो खोटे
चिकित्सेचा मज नाही ध्यास
11 Dec 2015 - 8:01 pm | चौकटराजा
आस्तिक आहे मी तरीही
देव पाप देतो यावर नाही विश्वास
बिनदिक्कत बोलतो खोटे
चिकित्सेचा मज नाही ध्यास
11 Dec 2015 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान कविता !
नास्तिकता प्रामाणिकपणे निभावून न्यायला "वाघाचे काळीज" लागते... आणि त्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचे म्हणजे नास्तिकतेच्या दंभात वाहून जाणे टाळण्यासाठी "शास्त्रिय प्रामाणिकपणा व सारासारविवेक बाळगणारा मेंदू" जरूर असतो.