चंदन सा बदन

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
24 Feb 2021 - 3:33 am

मी सरळ नाकासमोर पहात चालणारा सज्जन कुटूंबवत्सल भोळा वगैरे गृहस्थ आहे.

इकडेतिकडे बघणं नाही

आँखे किसीसे
ना उलझ जाये
मै डर ता हूँ,
यारो हसिनोंके गली से
मै गुजरता हूँ !!

morning walk साठी beach वर गेलो.
फूटपाथ च्या टर्निंग वर दिसली, शेजारणीशी काही बोलत होती.

सहजच माझी नजर समोर गेली,
सकाळची कोवळी किरणं चेह-यावर पडून नितळ कांती complexion glow होत होती.

कालच केलेल्या eye-brows चे धनूष्य ताणले होते.

नाट्यसद्भावना

झांझरीया उसकी छनक गयी,मेरी नजर उससे मिली तो...

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
24 Feb 2021 - 2:41 am

ही मुंबई नवा airport होण्याआधीची आठवण आहे.

मी hand-baggage screening करण्याच्या रांगेत उभा होतो.....रांग पुढे सरकत होती,
सहज माझी नजर समोर आपली पर्स व बॅग्ज screening belt वर ठेवणा-या स्री वर पडली.
आणि तिचे assets पाहून जरा खिळली,
त्याचवेळी बॅग belt वर ठेवून तिने वर पाहिले, आणि दूर्दैवाने माझी 'चोरी' पकडी गई,

नाट्यप्रकटन

हे घे ते घे

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
23 Feb 2021 - 9:01 am

हे घे, ते घे

हे घे,ते घे
हे जमव, ते जमव.
अरे लागेल कधी तरी म्हणत,
घरात मोठ्ठं भांडार वसव.

भिंतीवर घड्याळे, हँगिंग्ज, चित्रे,
लटकलेली आहेत जागोजागी.
तरीही आणखी म्युरल्स हवीत,
जुनी फोटोफ्रेमही थोडी जागा मागी.
इंच नि इंच जागा लढवतो
तरी आम्ही नवीन वस्तू खरीदतो.

मुक्तकजीवनमानप्रकटनविचार

१ अप ४ डाऊन

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
22 Feb 2021 - 9:50 pm

२००,३०० किमी BRM झाल्यावर पुढच्या स्पर्धेचा किडा वळवळला. आमच्या वेळापत्रकात बसेल अशी स्पर्धा शोध चालू होता. सगळे पर्याय विचारात घेता १९ फेब्रुवारीला औरंगाबादला असणारी ६०० किमीच्या BRM ची निवड झाली. बरोबर स्वप्नील दाभोळकरआणि तेजानंद होतेच. अचानक ३ दिवस आधी रोशनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.आता आम्ही एकूण ५ जण झालो. आताशा BRM ला ग्रुप ने जायचं कि बोलेरोमध्ये सायकल टाकायच्या आणि बाकीच्यांनी कारने जायचं हे जवळपास समीकरण ठरूनच गेलाय. ३०० नंतर ४०० न करता डायरेक्ट ६०० ची झेप घेणं आव्हानात्मक होत. पण प्रयत्न करून बघू, आपल्याला जमेल असा विश्वास होता.

मुक्तकअनुभव

वेळासबद्द्ल माहिती हवी आहे.

सॅनफ्लॉवर्स's picture
सॅनफ्लॉवर्स in भटकंती
22 Feb 2021 - 12:51 pm

मी बर्याच दिवसांपासुन (खर तर वर्षांपासुन ) वेळास कासव महोत्सव बघण्यासाठी जायचा विचार करतोय पण दरवेळेस काही कारणाने नाही जाता आलं. मागच्याच महिन्यात आम्ही कार घेतली तेव्हा ठरवल कि यावर्षी नक्कि जायच. मी मिपावर यासंबंधित लेख शोधले पण मला नाही सापडले. तरी कुणाला काही माहिती असल्यास सांगणे. आम्ही २ कपल जाणार आहोत.

घर..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
22 Feb 2021 - 12:49 pm

माझे वडील डॉक्टर होते. सरकारी नोकरी होती. त्यांच्या दर दोन,तीन वर्षांनी बदल्या होत. प्रत्येक गावात राहायला सरकारी क्वार्टर्स असत. त्यामुळं वेगवेगळ्या खूप घरांतून राहायचा मला अनुभव मिळाला. घरे मोठी,ऐसपैस. वडील रिटायर झाले. तेव्हा मी पाचवीत होते. मी माझ्या आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी आहे. माझ्या भावंडांच्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर आहे.

साहित्यिकप्रकटनविचार

(आतल्या आत)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
22 Feb 2021 - 11:52 am
अदभूतअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडलाल कानशीलबालगीतइंदुरीकृष्णमुर्ती

आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
22 Feb 2021 - 10:19 am

आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे!

"Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!"

जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती.

समाजतंत्रविज्ञानविचारसद्भावनाप्रतिक्रियाबातमी

आतल्या आत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 8:33 pm

संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा
मी अधांतराचा धरला अलगद हात
मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ
अन् ओसंडून सांडलो आतल्या आत

धगधगून निखारे विझून गेले तेव्हा
मी हिमपातावर कसून केली मात
मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो
अन् लखलख तेजाळलो आतल्या आत

भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा
मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात
जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो
उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत

कविता माझीकवितामुक्तक

तोरण मरणाचे

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 7:55 pm

नोट :मूर्ख या कर्नलतपस्वी यांच्या कवितेला रिप्लाय देताना हि कविता लिहिली गेली.. या कवितेचे श्रेय त्यांना आणि त्या मुळ कवितेलाच..
---
.

आयुष्याच्या क्षितिजापाशी
भावनांचा उडतो कल्लोळ..
मागे जीवनाचे सैल धागेदोरे
अन पुढे असते तोरण मरणाचे

पक्षी उडून जातात घरट्यात
अन स्तब्धता उरते मागे...
हसत दिवस जातो खोटाच अन
मग रात्र सावरण्यास येते..

प्रकाश शोधण्या जीवन संपते
अन क्षितिजावरती कळते शेवटी
अंधार असतो खरा सोबती
तोच सुरुवात..अन तोच शेवट..

आयुष्यकविता