टूलकिट (शतशब्दकथा)
अगं.. माझं टूलकिट दिसत नाही, पाहिलंस कुठे?
अग्गोबई..तुम्ही पण तसल्या भानगडीत आहात का काय?
तरी सांगत असते राजकारण आणि कसले कसले ग्रूप तुमचे द्या सोडून..उद्या काही झालं तर आपल्या अंगाशी येईल. आणि मित्र कसले तुमचे? सगळ्यांना अॅडमिन ठेवतात मेले.
अगं पण ऐकून तर..!
काही बोलूच नका.
मी म्हणते कसलं पर्यावरण.. काय धाड भरली आहे पर्यावरणाला? इथे स्टेटस अन् फेसबुक पोस्ट करण्याने चीन थांबवणार प्रदूषण करायचा? उगा आपलं..
आपण बरे, आपले काम बरे.
काय सांगतेय? काय बघताय आ वासून!