अफसोस : पाहायलाच पाहिजे.

Primary tabs

साहना's picture
साहना in मिपा कलादालन
16 Feb 2021 - 2:13 am

वेबसिरीज च्या दुनियेत हल्ली सेक्स आणि शिव्या ह्यांचा सुकाळ झाला असला तरी अनेक वेळा थक्क करून सोडणाऱ्या सिरीज सुद्धा येत असतात. अफसोस माझ्या मते खूपच उच्च दर्जाची कलाकृती आहे. अफसोस मध्ये काहींचं उणिवा नाहीत असे नाही पण माझ्या मते भविष्यांत भारतीय कलाकार काय काय जबरदस्त कथानके आणणार आहेत त्याचा एक डेमो म्हणून हि सिरीज पाहावी.

अफसोस ची कथा खूपच वेगवान आहे. नकुल ह्या युवकाची जिंदगी अगदीच खराब आहे. ह्याने ११ वेळा आत्महत्या केली पण प्रत्येक वेळी ह्याला कुणी ना कुणी वाचवले आणि वाचविण्याच्या नादांत ह्याचा जीव गेला. हा माणूस इतका दुर्दैवी आहे के ह्याने रेल्वे ट्रॅक वर झोपल्यास सुद्धा हा मरत नाही. नकुल ची मानसोपचार करते ती श्लोका.

मग हिमालयातील एका काहीही ना घडणाऱ्या गावांत १२ साधूंची अमानुष पाने हत्या होते आणि तेरावा साधू गायब होतो (फोकटिया). ह्याच्या शोधांत गावांत जे दोनच पोलीस अधिकारी असतात त्यातील एक अधिकारी मग मुंबईत येतो.

फॉकटिया, विदेशी वैज्ञानिक गोल्डफिश, श्लोका, नकुल आणि स्त्री हिटमॅन (हिटवूमन) उपाध्याय ह्यांचा एक गुंता होतो त्याच्या मध्यभागी असते एक छोटीशी कुपी जयंत म्हणे समुद्र मंथनातील अमृत ठेवलेले असते. कुणाला वाटत असेल हि कि काही फँटसी किंवा रम्यकथा आहे पण नाही. कथेचे पाय घट्टपणे मुंबई शहरांत रोवले आहेत. नकुल, फोकटिया, उपाध्याय, गोल्डफिश इत्यादींचा होणारा गुंता हा खूप नैसर्गिक वाटतो, ओढून ताणल्या प्रमाणे वाटत नाही. माझ्या मते हि त्यांची चांगली जमेची बाजू आहे.

मृत्यू ह्या विषयाला इथे गांभीर्य आणि विनोद ह्या दोन्ही बाजूनी हाताळले गेले आहे. सर्वप्रथम एका भारतीय सिरीयल ने प्रारब्ध, कर्म, जीवन मृत्यू, चिरंजीवी अश्या गहाण विषयांना इतक्या मनोरंजक पद्धतीने मांडले आहे. कदाचित सर्वप्रथम भगवे वस्त्र धारण करणाऱ्या फॉकटिया बाबाला एक साधा सोपा आणि नावाप्रमाणेच साधू दाखवला आहे. पहाडी प्रदेशांतून मुंबईत येणार पोलीस मुबई पोलीस म्हणजे स्कॉटलंड यार्ड अशी अपेक्षा घेऊन येतो आणि त्याचा अपेक्षा भंग खूपच छान दाखवला आहे. श्लोका आणि नकुल ह्यांचा संबंध डॉक्टर आणि पेशंट न राहता थोडा वेगळ्या दिशेने जातो आणि श्लोका हि थोडी बनावट वाटते. हिबा शाह हिचा हिटवूमन खूपच छान रंगलाय. आकाश दहियाचा पहाडी पोलीस अधिकारी बीर सिंग खरोखरचा प्रामाणिक पोलीस अधिकारी वाटतो.

माझ्या मते सर्वांत चांगले कथानक असे असते जिथे एक चांगली वेगवान कथा असते आणि विविध पात्रांची कॅरेक्टर डेव्हलोपमेंट केली जाते. म्हणजे दुय्यम पात्राशी सुद्धा आपण थोडे साम्राज होतो (गेम ऑफ थ्रोन्स इथे प्रचंड यशस्वी ठरली होती). इथे चांगले वाईट ह्याचा भेद नसतो त्यामुळे आपण कुणाच्याही दुर्ष्टीकोनातून कथानक पुढे सरकताना पाहू शकतो.

कथानक थोडे फारसीकल आहे ह्यांत शंका नाही पण त्यातंच तर मजा आहे. रणबीर शॉरी ह्यांचा मिथ्या नावाचा एक चित्रपट आला होता. तो सुद्धा असाच डार्क ह्युमर वर आधारित होता. आणि अफसोस सुद्धा त्याच प्रकारचे मनोरंजन घेऊन येत आहे.

afsos

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 Feb 2021 - 10:03 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

धन्यवाद. या विकांत ला पाहीन.

अनुप ढेरे's picture

16 Feb 2021 - 10:15 am | अनुप ढेरे

परवाच वॉच लिस्ट मध्ये टाकली ही सिरिज.

Vichar Manus's picture

16 Feb 2021 - 10:54 am | Vichar Manus

कुठे बघता येईल

Vichar Manus's picture

16 Feb 2021 - 10:54 am | Vichar Manus

कुठे बघता येईल

साहना's picture

16 Feb 2021 - 11:12 am | साहना

अमेझोन वर

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2021 - 1:31 pm | चौथा कोनाडा

भारी लिहिलंय !
अश्या जालमालिका म्हंजे चोखंदळ रसिकांसाठी जबरदस्त पर्वणी आहे !
"बघायचे मस्ट काही" या यादीत समाविष्ट केले आहे.

नीलस्वप्निल's picture

18 Feb 2021 - 1:36 am | नीलस्वप्निल

आत्ताच पाहुन सम्पवली... उत्तम सिरिज....

किल्लेदार's picture

21 Feb 2021 - 11:45 pm | किल्लेदार

पहिले दोन एपिसोड बघितले पण अपील झाले नाहीत. प्रसंग जरा ओढूनताणून जमवल्यासारखे वाटले. अभिनय ही जमेची बाजू आहे पण तेवढ्याने समाधान झाले नाही.