मामाच्या गावाला
मामाच्या गावाला...
मामाच्या गावाला...
थोडासा रुह-ओमानी हो जाय...
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला हे ही समजत नाही. मात्र चुलते धोंडोपंत आणि काकू लक्ष्मीबाई यानीच बापुना सांभाळले असावे. बापूंना महादेव (आप्पा) नावाचा एक मोठा भाऊही होता. धोंडोपंत हे विजयदुर्ग सुभ्यास गंगाधर पंत भानू याच्या कडे कामास होते. त्यावेळी विजयदुर्ग परिसरात रामोशी टोळ्या लुटा
प्रवास
भाग 8
पोलीस स्टेशनमध्ये शिरताच राठींनी भिकुला लॉक अप मध्ये टाकले आणि अनघा-मनाली-मंदार-नवीन यांना घेऊन ते त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी एका हवालदाराला या मुलांसाठी पाणी आणायला संगितले आणि त्यांना समोर बसवत म्हणाले;"तुम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगा आता."
नवीन बोलायला सुरवात करणार होता; इतक्यात अनघाने इन्स्पेक्टर राठींना विचारलं;"इन्स्पेक्टर, आनंद कुठे आहे? मला एकदा त्याला बघायचं आहे."
राठी शांतपणे म्हणाले;"तुम्ही अनघा न? आनंद...."
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २
जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते
अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून साक्षी उरते
दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते
अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो
निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत
आम्हा मुलांचे दहावीचे वर्ष असते .... आम्हा सगळ्यांना प्रिलिम चे आणि नंतर च्या SSC परीक्षेचे वेध लागलेले असतात ... शाळेय जीवन अगदी काही आठवड्यांचे राहिले असते... अभ्यास करूच , पण उरलेल्या दिवसात खूप मजा करून घेऊ अशी भावना असते सगळ्यांची ....
पण शालेय जीवन निरागस असते अशी एक फसणूक करणारी समजूत आहे ...
वर्गात एक मुलगा असतो ....
गोरा ...
घाऱ्या डोळ्यांचा ...
काटकुळा ...
संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोलणारा ...
त्याची ती "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
नमस्कार,
दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत.
24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का?
सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही.
कळावे,
लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....
खतपाणी घातलं
निगा राखली झाडाची
बिज होत चागंल तरी
फळे मीळाली विषाची
वाटल झाड आहे दुबळं
त्याला द्यावी साथ
देणार्याचा अदांज चुकला
तुटायला आले हाथ
जरी ऋणानुबंधाच्या गाठी
तरी प्रारब्धाचा खेळ
कर्मच नाही चांगल
तर जुळणार कसा मेळ
आपल घर आपणच बाधांयचे
पेरललं तेच उगवायचे
क्षणभराची विश्रांती घेऊन
पुन्हा इथेच यायचे
कोण कुणाला पुरायचं
म्हणूनच आतल्या देवाला
निरंतर जागवायचं
आयुष्याच गाठोडे
आपण आपलच पेलायचं
१६-२-२१