आधार कार्ड

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
11 Feb 2021 - 9:11 am

मे भी एक बाप हूँ........

वो था तो कोई गम न था।
नही है तो आँखे नम होती है।
उसकी यादोमे अक्सर राते
गमगीन होती है।

नसीहत जो कभी
मुसीबत लगती थी।
आज वही मुसीबत मे
नसीहत लगती है।

रोकता था टोकता था।
अक्सर मन सोचता था
ये ऐसा क्युं है।
आज नही है तो दिल
उसीको खोजता क्युं है।

बरगद का साया था।
हर राझ सिखाया था।
परवरीश मे जिसने
अपना तन मन धन गवांया था।

था वो तो
हर मुकाम मुक्कमल हुआ।
जिंदगी के हर पादान पर
पहाड सा खडा हुआ।

कविता

कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
11 Feb 2021 - 7:39 am

कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया

मराठी मध्ये गेली काही वर्षे आशयघन चित्रपट निघतात हे सर्वश्रुतच आहे ...
आणि हिंदू धर्मातील वाईट चालीरीती या विषावर मोकळेपणाने लिहिले जाते ( नाटकेही आली त्यात ) / निर्माण केले जाते हे हि सुधृढ समाजाचे आणि पुरोगामी समाजचे लक्षण आहे ( मराठी समाज घाशीराम आणि नथुराम दोन्ही नाटके पैसे देऊन बघतो यात हि परिपकवता दिसून येते )

पुनवेचं चांदणं

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
10 Feb 2021 - 7:17 pm

पुनवेचं चांदणं उतरलं अंगणी
अंधार गेला शुभ्र रंगात न्हाऊनी
हरवून गेलं झाडांचं हिरवं रूप
पाखरांच्या डोळ्यात भरली झोप
गगनाच्या भूमीत तारे पेरले
रातराणीचे हृदय हळूच फुलले
वाऱ्याचे पाऊल देई चाहूल
उजळले रानात काजव्याचे फूल
नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश
धरती सजली काळोखाचे तोडून पाश

निसर्गकविता

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?

Shantanu Abhyankar's picture
Shantanu Abhyankar in जनातलं, मनातलं
10 Feb 2021 - 3:53 pm

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?
एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

समाजविचार

आमचा Valentine Week - आँखोंकी गहराइयाँ |

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
10 Feb 2021 - 3:08 pm

इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने |
.
.
.
म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्‍या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की.

क्रीडासद्भावनाआस्वादविरंगुळा

आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
9 Feb 2021 - 12:24 pm

C - R - U - S - H - CRUSH

क्रीडासद्भावनाआस्वादलेखविरंगुळा

उभा मी वाटेवरती

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 Feb 2021 - 9:17 am

तुझ्या डोळ्यांचे
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती

फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती

मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती

तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती

काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती

- संदीप चांदणे

कविता माझीप्रेम कवितामाझी कविताकविता

मरण...

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
8 Feb 2021 - 5:45 pm

मरण...

रिपोर्ट वाचून झाल्यावर,
यमधर्म दिसे दारावर,
मग आली भानावर,
केलीच पाहिजे आवराआवर...

तशी होती ती गोलमटोल,
हळूहळू होत गेली अबोल,
चेहऱ्यावर दिसे हसरा भाव,
मनात सलत असे घाव...

कोणी म्हणत नव्हते सरक,
पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक,
मावळली गालीची हसरी खळी,
आता आळीमिळी गुपचिळी...

आयुष्यभराच्या आठवणींचा,
कसा सोडवायचा गुंता,
सतावत सारखे हेच विचार,
अन् मनात दाटे चिंता...

कळलं नाही तिला शेवटी,
काय झाली चूक,
बदल दिसे शरीरावर,
मन झालं मूक...

shabdchitreकविता