मरण...
मरण...
रिपोर्ट वाचून झाल्यावर,
यमधर्म दिसे दारावर,
मग आली भानावर,
केलीच पाहिजे आवराआवर...
तशी होती ती गोलमटोल,
हळूहळू होत गेली अबोल,
चेहऱ्यावर दिसे हसरा भाव,
मनात सलत असे घाव...
कोणी म्हणत नव्हते सरक,
पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक,
मावळली गालीची हसरी खळी,
आता आळीमिळी गुपचिळी...
आयुष्यभराच्या आठवणींचा,
कसा सोडवायचा गुंता,
सतावत सारखे हेच विचार,
अन् मनात दाटे चिंता...
कळलं नाही तिला शेवटी,
काय झाली चूक,
बदल दिसे शरीरावर,
मन झालं मूक...