थोतांड..थोतांड..थोतांड..
थोतांड थोतांड थोतांड..
जे जे पहावे ते थोतांड..
नाझींचे थैमान? थोतांड
न्यूटन महान? थोतांड
धरतीची गोलाई? थोतांड
नभाची निळाई? थोतांड
चंद्रावर स्वारी? थोतांड
मंगळाची वारी? थोतांड
कार्बन उत्सर्ग? थोतांड
कोरोना संसर्ग? थोतांड
बोसांचे मरण? थोतांड
नर्मदा धरण? थोतांड
ग्लोबल वार्मिंग? थोतांड
त्सुनामी वार्निंग? थोतांड
वृक्षांची निकड? थोतांड
इव्हीएम निवड? थोतांड
विमान नाहीसे? थोतांड
आरोप बाईचे? थोतांड