मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे.
'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे.
वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते.
१. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १)
२. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
३. विचित्रवीर्याची विचित्र कहाणी (महाभारत भाग ३)
-----------------------------------------------------------------------
४. सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
५. सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)
६. सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३:)
७. नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा (भाग ४)
-------------------------------------------------------------------------
८. महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
-------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
30 Aug 2015 - 1:09 am | जव्हेरगंज
व्वा....!!
निवांत वेळ काढावा लागेल आता.
30 Aug 2015 - 5:48 am | dadadarekar
त्या सत्यवतीच्या लेखातील ही वाक्ये पहा...
आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे,
....
वा ! काय हे सद्गुण !
30 Aug 2015 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे
हे मानवी (अव)गुण त्याअगोदर आणि त्यानंतरही अनेक मानवी समुहांनी जगभर अभिमानाने उधळत ठेवलेले आहेत... अर्थात सत्याला सामोरे जाण्याची कुवत नसल्याने सगळ्यांनाच ते कबूल करण्याची शरम वाटते हे अलाहिदा... मग सत्य झाकण्यासाठी वेगवेगळी काल्पनिक कथाकाव्ये रचून त्यांचे शतकानुशतके समर्थन केले जाते !
... त्यामानाने सर्व सत्य निर्भिडपणे लिहून ठेवणारे आर्य किमान प्रामाणिक तरी होते* :)
======
* : "प्रामाणिक = बरोबर" असे असेलच असे नाही पण "अप्रामाणिक सारवासारव" यापेक्षा ते नक्की जास्त उजवे असते... कारण, सत्य कबूल केल्यावर निदान भविष्यात तरी सुधारण्याची शक्यता असते.
======
30 Aug 2015 - 12:25 pm | मांत्रिक
डॉ.साहेब अतिशय समर्पक उत्तर दिलेत. पण 'स्वपार्श्वलाल' वृत्तीने पछाडलेल्या असल्या मंडळींना ते कितपत पटेल हे सांगणे अवघड आहे.
30 Aug 2015 - 1:43 pm | dadadarekar
... हे वाक्य वाचून हसून हसून लोळत आहे.
30 Aug 2015 - 1:45 pm | मांत्रिक
हसून हसून लोळत आहात की रविवारची जास्त झाली आहे? ;)
30 Aug 2015 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यांनी लिहून ठेवले नसते तर तुमच्या प्रतिसादात...
आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे,
हे कुठून आले ? ते खोटे होते असे तुम्हाला म्हणायचे आहे की ते सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत ? काय ते नक्की ठरवा. (आता तुम्हाला तसे भास होतात असे सांगू नका, त्याचा अर्थ फार गंभीर होतो, दादासाहेब ! =)) )
पुराणपूर्व भारतीय लेखनात "चांगले ते १००% चांगले आणि वाईट ते १००% वाईट" दाखविण्याचा येडबंबू अट्टाहास दिसत नाही. हा प्रामाणिकपणाचाच भाग समजायला हवा. हा लेखनातला प्रामाणिक मोकळेपणा त्यानंतर भारतात आणि इतरत्र बहुतेक सर्वच धर्मग्रंथांत अभावानेच आढळतो.
अर्थात, इतरांची कुरापत काढतानाच आपल्या आवडीच्या पुस्तकात लिहीले आहे ते सर्व खरेच्च आहे असे आंधळे मत असलेल्यांना जगभरचे सारासारविवेकी लोक हसतात हे दिसते आणि त्याचा रागही येतो... हे काय कमी हास्यास्पद आहे ?! =))
26 Oct 2015 - 8:05 pm | विवेकपटाईत
वाल्मिकी आणि वेदव्यासांनी - निष्पक्ष भावाने पात्र रंगविले. बहुतेक ते त्या घडलेल्या घटनांचे साक्षी असावे. त्यापासून प्रेरणा घेऊन कवींनी/लेखकांनी त्या नंतर हजारोंच्या संख्येने कथा, कादंबरी, महाकाव्य, इत्यादी रचले. आपापल्या काळानुसार कवींनी त्यात आपली कल्पना मिसळली. काहींनी त्यांच्या काळाच्या परिस्थितीचे वर्णन या पात्रांचा आधार घेऊन केले. चित्रगुप्त यांनी आपला दृष्टीकोन मांडला. असो.
30 Aug 2015 - 10:01 am | जेपी
काका पुढचे भागपण लिहा..
31 Aug 2015 - 3:11 pm | प्रसाद गोडबोले
+१
हेच म्हणतो !!
पुढील भागांच्या प्रतिक्षेत :)
30 Aug 2015 - 8:21 pm | सामान्यनागरिक
महाभारतातल्या काही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या आहेत.
१. द्यूतामधले सगळे डाव दुर्योधनच जिंकतो.एकही डाव पांडव जिंकत नाहीत. यात पांडवांना काही गैर वाटत नाही. इतकेच काय, इतकी वर्ष आपण सगळे वाचत/ऐकत आहोत पण कोणालाही त्यात काही अयोग्य वाटत नाही .
२. द्रौपदीला पणात जिंकून जेंव्हा पांडव परत येतात,तेंव्हा कुंती तिची 'वाटणी' करायला सांगते.तिच्याकडून ते अनवधानाने घडते. पण तिने ते मान्य करूनही द्गौपदीची 'वाटणी ' केली जाते । आणि द्गौपदीही त्याला सहज तयार होते .
अजुनही अनेक गोष्टी सांगता येतील. जाणकार मिपाकर बऱ्याच गोष्टी येथे मांडु शकतील.
30 Aug 2015 - 9:02 pm | मारवा
हि ब्रोकपा नावाने ओळखली जाणारी जमात मुळ आर्यांच्या टोळी पैकी एक आहे. काही कारणांनी हि टोळी वेगळी पडली व लेह लद्दाख मध्ये इतर आर्यांपासुन हजारो वर्ष विलग राहुन गेली. हे ओरीजनल आर्यन्स मानले जातात कारण यांच्यात वेगळे पडल्याने संकर झाला नाही असे मानले जाते. या जमातीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातुन व विशेषत: जर्मनीतुन अनेक मानववंश शास्त्रज्ञ इथे भेट देत असतात. यांच्यामध्ये आर्यांच्या मुळ परंपरा शारीरीक वैशिष्ट्ये सर्व टिकुन राहीलेली आहेत असे मानले जाते. अनेक जर्मन युरोपियन स्त्रीया इथे प्युअर सीड च्या शोधात ही येतात.जर्मन्सना प्युअर आर्यन सीड च फॅसीनेशन अजुनही आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना अजुनही काहिंच्या डोक्यात घट्ट रुतलेल्या आहेत. या आर्यांची शारीरीक वैशिष्ट्ये सभोवतालच्या मंगोलियन्स पेक्षा वेगळी आहेत.
यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे एका स्त्रीने अनेक पुरुषांशी विवाह करण्याची मुळ आर्यन परंपरा पॉलिअॅन्ड्री अजुनही आढळते जी पुढे क्रमश: लोप पावली.
हे ब्रोक पा ( ब्रोक पा लद्दाखी शब्द गोरी कातडी या अर्थाने वापरला जातो अजुनही अनेक अर्थ दाखवले जातात ) वंश शुद्दी ठेवण्यासाठी बिगर आर्यन शी विवाह कटाक्षाने टाळतात. यांच्या संदर्भात बरच रोचक लिखाण उपलब्ध आहे.
काही लिंन्क्स वाचुन बघा
१-http://www.tribuneindia.com/2002/20021117/spectrum/main1.htm
२-http://www.openthemagazine.com/article/art-culture/the-last-of-the-aryans
३-http://theindianweekly.com.au/discovering-the-hidden-world-of-the-aryans...
31 Aug 2015 - 3:21 pm | द-बाहुबली
घ्या अन मी भाद्रपद यावर्षी येणार नाही असा विचार करत होतो.
26 Oct 2015 - 5:54 pm | चित्रगुप्त
आला रे आला. महाभारतावर आणखी एक धागा आला.
28 Oct 2015 - 10:26 am | दमामि
विचार करण्यास भाग पाडणारा वेगळा दृष्टिकोन .
आवडला.
24 Jun 2018 - 8:06 am | चित्रगुप्त
पुनरपि