महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
26 Oct 2015 - 5:36 pm

महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.

1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

26 Oct 2015 - 5:53 pm | चित्रगुप्त

रामायण, महाभारत आणि सर्व देशातील पौराणिक कथा या थोर कवींच्या कल्पनाविलासाचा परिपाक आहेत. यात आपल्या परीने मीही काही भर घातलेली आहेत. ते सर्व लेख खालील धाग्यात एकत्र सापडतील. ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांचेसाठी दुवा देतो आहे:
अजब महाभारत
http://www.misalpav.com/node/32588

याॅर्कर's picture

26 Oct 2015 - 6:29 pm | याॅर्कर

जाता जाता.....
..
..
पांडवांचा जन्म - मंत्राने देवतेचे आवाहन केल्याने देवता येते,आणि डायरेक्ट बाळ हातात ठेऊन जाते,हे चूकीचे आहे.
त्याचे असे आहे,मंत्राने देवतेचे आवाहन केल्यास ती देवता आवाहन करणार्याच्या अधीन होते,आता अधीन होणे म्हणजे काय?
आणि कुंतीला तीन पुत्र का हवे होते?एक का नको?
तीन पुत्र हवे होते तर त्यांची वये एकसारखी हवीत ना?
मग युधिष्ठिर जेष्ठ त्यानंतर काही वर्षांनी भीम मग अर्जुन.
मला काय म्हणायचे ते कळले का?
मुलं डायरेक्ट हातात आली नाहीत,त्यांचा क्रमाने जन्म झाला गर्भधारणा होऊन.
पुढे द्रौपदीनेही तोच आपल्या सासूचा वसा पुढे चालू ठेवला.

हेमंत लाटकर's picture

26 Oct 2015 - 9:23 pm | हेमंत लाटकर

<<<पांडवांचा जन्म - मंत्राने देवतेचे आवाहन केल्याने देवता येते,आणि डायरेक्ट बाळ हातात ठेऊन जाते,हे चूकीचे आहे.>>>

हे मलाही माहित आहे. कुंतीला यमापासून युद्धिष्टर, इंद्रापासून अर्जून, वायूपासून भीम. माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव झाले. देव म्हणजे मानवच पण त्यांनी चांगले काम केले म्हणून ते देव.

द्रोपदीला मुले स्वत:च्या नवर्यापासून (पाच पांडव) पासून झाले. कुंती व माद्री सारखे नियाेग पद्धतीने नव्हे.

संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्पनाविस्तार आहे.

संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्पनाविस्तार आहे.

क्या रे कांचा बंदुक भि दिखाता है और पिछे भि हटता है.
तुमच्या प्रश्णाचे उत्तर तुम्हिच दिले :)

याॅर्कर's picture

26 Oct 2015 - 11:01 pm | याॅर्कर

द्रौपदीचं काय सांगूच नका तुम्ही,आणि ते कौमार्य टिकून राहते म्हणजे काय नेमके?
पाच पुरूषांबरोबर संबंध आले कि ही नंतरची सारवासारव कि कौमार्य टिकण्याचा वरदान होतं म्हणे जन्मतः

नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो?
गादीवर अधिकार राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा असतो(त्या काळी) आणि तो अधिकार धृतराष्ट्राचा त्यानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा म्हणजे दुर्योधनचा.पण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो केवळ कार्यकारी राजा असतो,राज्याभिषेक झालेला नसतो.भीष्मांच्या म्हणण्यानुसार त्याचा हक्क राहत नाही,कारण राजा अंध असू शकत नाही.मग पांडू गादीवर बसतो आणि भीष्म,विदूर इ.च्या मते पांडूनंतर तो हक्क युधिष्ठिराकडे जातो.पण हे पूर्ण चूकीचे आहे.खरा वारसदार धृतराष्ट्र असतो जरी अंध असला तरी, मग त्यानंतर दुर्योधन.आणि ते योग्यतेनुसार युवराजनियुक्तीसाठी रंगभूमी
वगैरे ढोंग होतं.
खरा अन्याय दुर्योधनबरोबर झालाय.
आणि कर्णाला त्याची जात दाखवून अपमान करणारी स्त्री,आणि नंतर त्याच्याकडे त्या नजरेने(?) पाहणारी स्त्री
सदाचारी,शीलवान असू शकत नाही.
(जांभूळ आख्यायन माहित आहे का?)

प्रचेतस's picture

26 Oct 2015 - 11:07 pm | प्रचेतस

यावरून आमणदेव आणि रामदेवरायाचे वैर आठवले.

गणामास्तर's picture

27 Oct 2015 - 11:38 am | गणामास्तर

जरा हमको भी तो बताओ वो कहाणी..

प्रचेतस's picture

27 Oct 2015 - 1:46 pm | प्रचेतस

कृष्णदेव यादवाचा मुलगा रामदेवराय तर कृष्णाचा धाकटा भाऊ महादेवराय.
कण्हदेवो कटकी आला संगे धाकुटा महादेव होता.

कृष्णाच्या मृत्युनंतर रामदेवराय अल्पवयीन असल्याने धाकटा महादेव देवगिरीच्या सिंहासनावर आला. महादेवाच्या मृत्युनंतर रामदेवरायाला राज्य मिळण्याचे ऐवजी महादेवाचा मुलगा आमणदेवास मिळाले. तेव्हा रामदेवरायने उठाव करुन आमणदेवास पदच्युत केले व देवगिरी राजसिंहासनावर अभिषिक्त झाला.
आमणदेवे डोळे काढीयले.

गणामास्तर's picture

28 Oct 2015 - 9:36 am | गणामास्तर

धन्स रे.

हेमंत लाटकर's picture

26 Oct 2015 - 11:55 pm | हेमंत लाटकर

नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो?

धुतराष्ट्र, पन्डू, विदुर हे अंबिका व अंबालिकाला व्यासापासून नियोग पद्धतीनेच झाले.

हिमालयात अजूनही काही आदिवासीत बहु पती पद्धत अस्तित्वात आहे.

पाच पाडवात द्रोपदीमुळे फट पडू नये म्हणूम कुंतीने पाच भावात वाटून घ्या असे सांगितले.

त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता,कारण सगळेच नियोग पद्धतीने झाले होते.पण इथे दुर्योधन हा पर्याय आहे ना?

सभ्य समाजाची आदिवासींबरोबर तुलना होऊ शकते काय?
बहु पती पद्धत त्यांच्यात आहे म्हणून काय हे पण तसेच?
द्रौपदीमुळे भावांमध्ये फूट पडण्याइतके पांडव बायले होते काय?

आणि ते व्यास पार्ट टाईम जाॅब करत होते काय?

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 8:09 am | हेमंत लाटकर

व्यास पार्ट टाईम जाॅब करत होते काय?

सत्यवतीने वंशविस्तारासाठी सुरवातीला भीष्माला विचारले पण भीष्माने नकार दिला म्हणून सत्यवतीने व्यासाला विचारले. व्यास म्हणजे सत्यवतीला लग्नाआधी पराशरापासून झालेला मुलगा.

द्रोपदीला स्वयंवरात अर्जुणाने जिंकले. द्रोपदीचे सोंदर्य बघून युद्धिष्टरचे चित्त ढळले. पांडवामध्ये फुट पाडण्यासाठी दुर्याधनाचे प्रयन्त चालत.

व्यास सत्यवतीला लग्नाआधी झालेला असुनही प्रसिद्ध झाले. कर्ण कुंतीला लग्नाआधी झाला पण त्याची सुतपुत्र म्हणून अवहेलना झाली.

याॅर्कर's picture

27 Oct 2015 - 10:40 am | याॅर्कर

आता सगळं महाभारत सांगता कि काय?
.
.
.
.
.
आपल्या विवेकबुद्धीस काही गोष्टी पटत नाहीत,

बाकि महाभारत घडलेच नाही असे मी म्हणत नाही.
कोणाच्या भावना दुखावण्याचा काहीही हेतु नाही,मी ही त्याच 'हिंदू'नामक कंपूतील एक जीव आहे.

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 12:38 pm | टवाळ कार्टा

सभ्य समाजाची आदिवासींबरोबर तुलना होऊ शकते काय?

आदिवासींना उग्गाच बदनाम करू नका

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2015 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

@मग पांडू http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif गादीवर बसतो http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 5:40 pm | द-बाहुबली

प्रतिसाद ऑफ ड दे.

बुवा, तुमच्याइतकी पांडूची अठवण मीनाक्षी देवरूखकरही काढत नसेल हो. =))

चित्रगुप्त's picture

27 Oct 2015 - 5:51 pm | चित्रगुप्त

आता ही मीनाक्षी देवरूखकर कोण बुवा ?

बॅटमॅन's picture

27 Oct 2015 - 6:11 pm | बॅटमॅन

खी खी खी, कोणी नै ओ. ;)

आपल्या महान प्राचीन हिंदु देवदेवतांची,वेदपुराणांची धागाकर्ते अतिशयोक्ती म्हणुन जी खिल्ली उडवत आहेत त्याची निर्भत्सना करावी तेवढी कमी आहे.

-जगबुडी

नाखु's picture

27 Oct 2015 - 9:20 am | नाखु

हाणुन मोदन !!!

-खरपुडी

टवाळ कार्टा's picture

26 Oct 2015 - 7:01 pm | टवाळ कार्टा

ब्वॉर्र

शान्या मनसानं कथा अयकावी.हात जुडावे अन कय मागाचं ते माघून घियावं.शिंवाशनाची मापं कशाला क्हाढावी?

विवेकपटाईत's picture

26 Oct 2015 - 8:20 pm | विवेकपटाईत

धार्मिक ग्रंथांवर प्रश्न उपस्थित करण्याआधी एकदा तरी त्यांचे वाचन करणे योग्य.

उगा काहितरीच's picture

26 Oct 2015 - 8:21 pm | उगा काहितरीच

ब्वॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र् मग ??

पुराणकथांवर विश्वास ठेवण्याआधी एकदा तरी त्या तर्कबुद्धीने वाचणे योग्य.

नाही म्हणजे त्याला देवाधर्माची जोड आहे म्हणून त्यावर काही बोलायचेच नाही कि काय?
याला "धार्मिक दहशतवाद" म्हणतात.

.
.
.
.____(एक दिव्य अलौकिक शक्ती आहे हे माननारा याॅर्कर)

नाव आडनाव's picture

26 Oct 2015 - 9:33 pm | नाव आडनाव

4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
पन, तरीबी लालू, मुलायम, अखिलेश, पप्पू ... सारे यादव जित्ते र्‍हायले. काय ऊपेग? याहिले पव्हता यत व्हतं भवतेक.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Oct 2015 - 9:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

पुराणानुसार यादव द्वारकेत नाही तर प्रभास क्षेत्री मेले बहुतेक!

सागरकदम's picture

28 Oct 2015 - 8:44 pm | सागरकदम

बाहुबली ने मारले ?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Oct 2015 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा

हर हर..आमच्या टनाटनी धर्मातल्या चूका काढता काय!?
परमेश्वर तुम्हाला उकळत्या तेलात फ्राय करो
टना टन फ्राय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Oct 2015 - 9:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पापड फ्राय!

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 5:04 pm | हेमंत लाटकर

हर हर..आमच्या टनाटनी धर्मातल्या चूका काढता काय!?

शांती, कालसर्पयोग, नारायण नागबली केल्याने आयुष्यात येणार्या अडचणी व संकटे टळतात का?

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग केल्याने काहि टळतात म्हणे.

हेमंत लाटकर's picture

31 Oct 2015 - 5:45 pm | हेमंत लाटकर

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग केल्याने काहि टळतात म्हणे.

शांती,कालसर्पयोग,नारायण नागबली,ग्रहांचा जप हे काही खर नसतं. सर्व मनाची समाधानी व पुरोहिताला लाभ.

चित्रगुप्त's picture

31 Oct 2015 - 10:50 pm | चित्रगुप्त

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग नाही, 'कालसर्प'वियोग'. अर्थात याचा ज्योतीष वगैरेंशी काहीही संबंध नसून आहारात बदल करण्याशी आहे.
याविषयी माहिती माझ्या खालील लेखात आहे:
शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?
http://www.misalpav.com/node/33321

होबासराव's picture

1 Nov 2015 - 8:41 pm | होबासराव

शांती,कालसर्पयोग,नारायण नागबली,ग्रहांचा जप हे काही खर नसतं. सर्व मनाची समाधानी व पुरोहिताला लाभ.

सर आपण एकदम योग्य बोललात, रच्याकने कोकिळ्व्रता बद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 8:44 pm | मांत्रिक

हं बरोबर राजे! प्रतिसाद मिळवण्यासाठी आपली साईड बदलू नये या मताचा मी आहे!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2015 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ टीआरपी हाच उद्द्येश असला तर मग स्वतःचे मत असायलाच पाहिजे असे नाही, वादग्रस्त होईल असा धागा/वाक्य (उर्फ काडी) पुरेशी असते. ;) :)

हेमंत लाटकर's picture

26 Oct 2015 - 10:36 pm | हेमंत लाटकर

तुम्हीच सांगा 1 ते 9 मधल्या कोणत्या गोष्टी विज्ञानाच्या आधारे खर्या वाटतात.

हेला,

३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथाच होती. १९८५ साली कोणी जर म्हंटलं असतं की आजपासून काही वर्षांनी मिसळपाव नामे संकेतस्थळावर जगभरातले मराठी भाषिक जमून लेखी चर्चा करतील, तर त्याला लोकांनी वेड्यात काढला असता. किंवा विज्ञानकथालेखक म्हणून डोक्यावर तरी घेतला असता.

तस्मात, आपल्या कक्षेबाहेरची माहिती असेल तर घाईघाईने निष्कर्ष काढू नये.

आ.न.,
-गा.पै.

ट्रेड मार्क's picture

27 Oct 2015 - 12:21 am | ट्रेड मार्क

जगात कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समोर असून आपल्याला त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देत येत नाही. तसेच अजून कितीतरी गोष्टी असतील की ज्या आपल्याला अजून माहित नसतील. त्यामुळे आपल्याला माहित नाही म्हणून ती गोष्ट जगात नव्हतीच अथवा नाहीच असं होऊ शकत नाही.

नाना स्कॉच's picture

27 Oct 2015 - 8:48 am | नाना स्कॉच

बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक स्पष्टीकरण समजत नाही म्हणून त्या बऱ्याच गोष्टींना शेंदुर फासुन भक्ति करायलाच हवी असेही नाही न बॉस! चौकसपणा हा मुळ मानवी स्वाभाव आहे, अनुत्तरित प्रश्नांना उत्तरे मागायची नाहीत अन वरतुन "ही आपल्या बुद्धीची पातळी" म्हणून स्वतःच स्वतःला थांबवणे हेच असले तर आपला महान धर्म अन एकेश्वरवादी एकपुस्तकवादी धर्मांत अंतर ते काय उरेल?

ट्रेड मार्क's picture

27 Oct 2015 - 8:03 pm | ट्रेड मार्क

माझा प्रतिसाद गा. पै. ना अनुमोदन म्हणून आहे. त्यांच्या अथवा माझ्या प्रतिसादात कुठेही शेंदूर फासून भक्ती करण्याबाबत कुठलाही उल्लेख नाही. म्हणणे फक्त एवढेच आहे कि आत्ता आपल्याला माहित नाही म्हणून एखादी गोष्ट पूर्णपणे नाकारू शकत नाही. तुमच्या मनात शेंदूर फासून भक्तीविषयीचे विचार असतील तर त्याच्या समर्थनार्थ अथवा विरोधी कुठल्याच गोष्टीवर मी भाष्य केलेलं नाही.

माणसाने चौकस असावेच, प्रश्न हे पडलेच आणी विचारलेच गेले पाहिजेत. परंतू फक्त मी करतो तोच विचार बरोबर आणि मला माहिती आहे तेवढेच सत्य हा हेका नसावा. ज्ञान मिळवण्यासाठी इतरांची मते पण स्वीकारता आली पाहिजेत.

अवांतर - कुठल्याही दगडाला शेंदूर फासून देव मानण्याला माझाही विरोधच आहे. भक्तिभाव असणे/ नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक मामला आहे. कुठल्याही गोष्टीचे अवडंबर माजू नये. (आपला महान धर्म अन एकेश्वरवादी एकपुस्तकवादी धर्माविषयी टिपण्णी करण्याचे, या धाग्याचा काश्मीर होऊ नये म्हणून, मुद्दाम टाळले आहे.)

दिवाकर कुलकर्णी's picture

27 Oct 2015 - 12:43 am | दिवाकर कुलकर्णी

बाप मुलास ,
गाढवाच्या लेका तुला हजार वेळा सांगीतलंय अतियशयोक्ति करत जाऊ नको म्हणून
आचार्य अत्रे एकदा एका सभेत
आता हे विठ्ठलराव(गाडगीळ) म्हणतात आम्ही अतियशयोक्ति करतो,
हे विठ्ठलराव काका साहेबांचे चिरंजीव,
क्षणभर थांबून ,ही अतिशयोक्ति नव्हे ना
१,३,५ हे प्रत्यक्षात घडू शकते
रामायण ,महाभारत म्हणजे चांदो बातल्या गोष्टी न्हवेत याच भान ठेवावं
कुसपटं काढणं हे सगळ्यात सोपं काम
महाभारतातलया सारखा एखादाश्लोक अतियशयोक्ति असू दे त्यात रचून दाखवावा
या धाग्यतून काय सिद्ध करायचे आहे

ज्योति अळवणी's picture

27 Oct 2015 - 1:51 am | ज्योति अळवणी

सर्वच प्रतिसाद वाचले. काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीने मला असेच काहीसे प्रश्न विचारले होते... महाभारता मधील अतिशायोक्तीवर. त्यावर मी तिला जे सांगितले ते इथे नमूद करते.

आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराज खरेच होते. त्यांनी लहान वयापासून हिंदू राष्ट्राचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे लढाया करून यश मिळवले. या इतिहासाला तशी फार वर्ष झाली नाहीत. तरीही त्यांच्या भोवती काही चमत्कार जोडले गेलेच की. जसे भवानी तलवार शिवाजी महाराजांना भवानी मातेने दिली. महाराजांचा मृत्यू देखील आता थोडा वादात आणि गुढतेत अडकला आहे.

त्याचप्रमाणे कदाचित महाभारत लाखो करोडो वर्षांपूर्वी घडले ही असेल. आणि हळू हळू त्याबाबतीत देखील अतिशयोक्तीची जोड मिळाली असेल. कदाचित तो आपला इतिहास असेलही. त्याकाळातील मानव निसर्गाच्या जास्त जवळ असल्याने काही वेगळ्या शक्ती असतीलही त्याकाळच्या मानवात. आणि त्या शक्तीना जास्त भव्य दिव्य रूप पुढे दिल गेल असेल.

कदाचित अजून लाख वर्षानंतर शिवाजी महाराज देखील महाभारताप्रमाणे दंत कथा होतील. आणि मग त्यावेळच्या अशाच कोणत्या तरी व्यनीवर त्यांच्या बद्दल काही खिल्ली उडवली जाईल आणि चर्चा होऊन विषय संपेल.

कदाचित................................................

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 8:51 am | हेमंत लाटकर

हा धागा लिहून मला महाभारत व रामायण या ग्रंथाची खिल्ली उडवायची नाही तर त्यातील काही गोष्टीतील अतिशयोक्ती सांगायची. उदा. कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला.

का आय्डी हॅक झाला होता?

असले पांचट धागे इतर धर्मांविरूद्ध काढण्याचे धाडस आहे काय तुमच्यात? उत्तर माहिती आहे.

संपादक मंडळ असल्या टिआरपीछाप धाग्यांवर कारवाई का करत नाही?

माझ्यालेखी हे धार्मिक भावना दुअखावणारे धागे आहेत. बरेच दिवसांपासून बघतोय दर २-३ दिवसांनी एक असला धागा येतोच येतो. नाहीतर काहीतरी करून असले विषय इतर धाग्यंवर जाणूनबुजून काढले जातात. आशा आहे की मिपाला धार्मिक भावना दुखवणारे संस्थळ अशी मान्यता मिळू नये वा अशी मिपा संमची इछापण नसावी. स्पष्ट लिहितोय पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असावी. बरेच धागे दुर्लक्षित केले पण आता नाही.

नया है वह's picture

27 Oct 2015 - 11:46 am | नया है वह

.

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 6:02 pm | हेमंत लाटकर

असे धागे इतर धर्मांविरूद्ध काढण्याचे धाडस आहे काय तुमच्यात?

इतर धर्माचे काय करायचे. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा व गोष्टी विषयी आपण बोलायचे.

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 6:06 pm | द-बाहुबली

इतर धर्माचे काय करायचे. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा व गोष्टी विषयी आपण बोलायचे.

आँ म्हणजे आपला तो धर्म आणी इतरांचा तो अधर्म वगैरे मानता की काय ? तसेही अनिश्ट गोष्टी धर्म-जात भेदभाव बघत नसतात.

असो मला अंडे आधी निर्माण झाले हे पटत नाही तुम्हाला काय वाटते प्रथम कोंबडे निर्माण झाले असावे की अंडे ?

नाना स्कॉच's picture

27 Oct 2015 - 9:36 am | नाना स्कॉच

चला!! कोणीतरी परशु उचलला म्हणायचे एकदाचा! म्हणले फाउल होतोय का काय ह्या धाग्याचा!! मुळात धागाकर्त्याने कुठल्या विषयावर/धर्मावर धागा काढवा हा त्याच्स prerogative (मराठीत सांगा) आहे, तुमच्या भावना दुखावतात तर तुम्ही न वाचण्याचे ऑप्शन आहेच की तुमच्या हातात, शिवाय आमच्या वैयक्तिक मतानुसार "त्यांना सांगा की अगोदर" वाली वृत्तीच हिंदुत्वासाठी सर्वात विघातक आहे असे प्रांजलपणे वाटते.

दत्ता जोशी's picture

27 Oct 2015 - 10:11 am | दत्ता जोशी

आख्या महाभारत आणि रामायणातून फक्त नऊच मुद्दे मिळाले! आम्हाला विचारला असतं तर बसल्या बसल्या ३-४ डझन मुद्दे दिले असते की.

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 12:14 pm | हेमंत लाटकर

आख्या महाभारत आणि रामायणातून फक्त नऊच मुद्दे मिळाले!

अजून बरेच काढता येतील. उदा. दाखल 9 च टाकले.

पांडव शुर होते यात वाद नाही. महाभारत युद्ध जिंकण्यासाठी कृष्ण नीतीचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. उदा. भीष्माला मारण्यासाठी शिखंडीला पुढे करणे.
येथे भावना दुखवण्याचा काय प्रश्न आहे ही एक चर्चा आहे.

नाखु's picture

27 Oct 2015 - 10:12 am | नाखु

धागा पिसाट
गर्दभ सुसाट
खेळ नव्याने जुना जुना
=======================

मूळ स्तोत्र संदर्भ

टीआर्पीसाठी काही विषयः

पुण्याला दुगाण्या..
अनिवांशींना देशप्रेमाचा काढा स्वतः सतत ख्वाडा
आयटीवाल्यांना उगाच फायटी
राजकारणातील गजकरण अर्थात खाजवून खरूज
व्याकरणाचे शिकरण आणि बोलीभाषेचा ठेचा
आध्यात्माची उशी आणि विज्ञानाची काशी

प्यारे१'s picture

27 Oct 2015 - 10:18 am | प्यारे१

घुमून फिरून त्याच चौकात आले ना बे.... कोणाला काय बोलनार आपन तरी गरीब बापडे लोकं? इथल्ला माहौल च कै ठीक वाटू नाय ऱ्हायला.
काय करावं गरीबांन् काय उमगत नाय.

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 12:27 pm | हेमंत लाटकर

धागा पिसाट
गर्दभ सुसाट

तुमचा झाडपन हा धागा कोणत्या प्रकारात मोडतो.

धागा पिसाट
गर्दभ सुसाट
खेळ नव्याने जुना जुना

लाटकर, तुमचे को़किळ व्रत झाले का पुर्ण ?

नाखु's picture

27 Oct 2015 - 4:34 pm | नाखु

प्रतीसादातील संदर्भावर क्लीक करा बराच खजीना मिळेल.

अवांतर : मध्यंतरी गायब होतात काय? दादुच्या एका धाग्यावर लै याद काढली आता दादू नाही आणि त्यो धागाबी न्हायी.

मोगा's picture

27 Oct 2015 - 8:21 pm | मोगा

... मोगाखान पठाण

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 11:00 pm | टवाळ कार्टा

welcome back

प्यारे१'s picture

28 Oct 2015 - 12:47 am | प्यारे१

Really? Before we could miss, he came back.
Daduji, please allow us to miss you. We will call you...... for sure.

सुबोध खरे's picture

28 Oct 2015 - 10:41 am | सुबोध खरे

प्यारे मिया
तुम्ही पटकन कोणाच्या चड्डीलाच त्यांना न कळत हात घालता बुवा.

प्रभाकर पेठकर's picture

28 Oct 2015 - 11:58 am | प्रभाकर पेठकर

अश्लिल....अश्लिल.....

असलं काही आम्ही करत नाही, असं नाही, करतो, असंही नाही. खुलासा संपला. ;)

याॅर्कर's picture

27 Oct 2015 - 11:00 am | याॅर्कर

इतर सदस्यांच्या भावना दुखवू नयेत म्हणून
.
.
मी याॅर्कर

"चारो दिशाओ,धरती,आकाश को साक्षी मानकर
यह प्रतिज्ञा करता हूँ कि,आज से कोई भी
धार्मिक टिप्पणी नही करूंगा,जिससे किसी कि
भावना को ठेच पहुंचे,ना ही मेरा कोई ड्युआयडी था,
ना है,ना आगे जाकर बनेगा|
यह मेरी अखंड प्रतिज्ञा है|
(विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा)

नाव आडनाव's picture

27 Oct 2015 - 11:17 am | नाव आडनाव

(आणि मंदिरांच्या घंटा वाजल्या)

मार्मिक गोडसे's picture

27 Oct 2015 - 12:35 pm | मार्मिक गोडसे

7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.

शाळेत असताना साबणाचा वापर करुन पाण्याचे 'सरफेस टेंशन' कमी करणारा प्रयोग केला होता. त्यामुळे अशक्य वाटत नाही.

9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.

हनूमानात अख्खा पर्वत उचलून उडाण्याची शक्ती होती, तर राम सेतू बांधायच्या भानगडीत कशाला पडला, बसवायचे होते सगळे सैन्य एखाद्या पर्वतावर, तो पर्वत उचलून केले असते उड्डान हनूमानाने लंकेकडे. कदाचीत रामाला ते कमीपणाचे वाटले असेल. मग बसला पाण्याची पातळी कमी करून ,दगड टाकून सेतू बांधायला.

राम व त्याचे सैन्य सेतू बांधत असताना तिकडे रावणाला ह्याचा सुगावा कसा लागला नाही. आणि लागला असेल तर लंकेच्या किनार्‍यापर्यंत सेतू बांधेपर्यंत रावण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून का बसला होता. किनार्‍यावर आपले सैनिक जमा करून रामाच्या सैन्यावर हल्ला का केला नाही.

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 12:36 pm | द-बाहुबली

1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.

आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे प्रकरण सामाविश्ट आहे. तुम्हीही तुमेच कौमार्य यापध्दतीने टिकवु शकाल, द्रौपदी नसलात तरी. अथवा पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल. या सर्व यौगीक क्रिया होत अगदी विपश्यनेप्रमाणेच प्रॅक्टीकल अन निव्वळ शारीराच्या अभ्यासाने साध्य. यात इश्वर-नामस्मरण यांची तशी आवश्यक्ता आहेच असे नाही. पण त्यामुळे अभ्यास चालु ठेवण्यास मानसीक बळ मिळते हे खरे आहे. बट नॉट मेंडेटॉरी अ‍ॅटोल.

2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
होय. कसे ? यासाठी आपणास काही विद्यांचा भ्यास करावा लागेल पण तुम्हला भ्यास नको तर फंक्त शंकासमाधान हवयं तेवडीच आपली तुश्णा/ कुवत असल्याने वादासाठी वाद म्हणून इतर कोणीही त्यांचे पित्रूत्त्व कधीही स्विकारलेले नाही. अथवा कोणाधोब्याने तिच्या चारीत्र्यावर साँशयही घेतला नाही हे वाक्य आपली मती संतुष्ट करेल अशी अपेक्षा आहे.

3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
मग दुसरे काय घडले असावे असे आपले मत आहे ?

4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
याबाबत माझा विषेश अभ्यास्/वाचन्/अनुभव नाही त्यामुले पास.

5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
खरे आहे. तुम्ही परशु राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.

6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
तुम्ही श्रीकृष्णावतार असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य, नकारात्मकता अजिबात बाळगुन जगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.

7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
खरे आहे. तुम्ही राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.

8. रावणाला दहा तोंडे होती.
खरे आहे. तुम्ही रावण असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.


9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.

१००% सत्य. आपणही हनुमान असता तर हे तुम्ही सुध्दा ते केले असते... तुम्ही हनुमान नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. हनुमान चालीसा वाचत रहा अनुभवही येइल.

नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो?
गादीवर अधिकार राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा असतो(त्या काळी) आणि तो अधिकार धृतराष्ट्राचा त्यानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा म्हणजे दुर्योधनचा.पण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो केवळ कार्यकारी राजा असतो,राज्याभिषेक झालेला नसतो.भीष्मांच्या म्हणण्यानुसार त्याचा हक्क राहत नाही,कारण राजा अंध असू शकत नाही.मग पांडू गादीवर बसतो आणि भीष्म,विदूर इ.च्या मते पांडूनंतर तो हक्क युधिष्ठिराकडे जातो.पण हे पूर्ण चूकीचे आहे.खरा वारसदार धृतराष्ट्र असतो जरी अंध असला तरी, मग त्यानंतर दुर्योधन.आणि ते योग्यतेनुसार युवराजनियुक्तीसाठी रंगभूमी
वगैरे ढोंग होतं.
खरा अन्याय दुर्योधनबरोबर झालाय.
आणि कर्णाला त्याची जात दाखवून अपमान करणारी स्त्री,आणि नंतर त्याच्याकडे त्या नजरेने(?) पाहणारी स्त्री
सदाचारी,शीलवान असू शकत नाही.
(जांभूळ आख्यायन माहित आहे का?)

हे असले विचार होते म्हणूनच कौरवांना रट्टे पडले पांडवांकडुन. पण तुम्हाला आम्हला मात्र तेच वाचुन अथवा लिहुन फरक पडनार नाही कारण ना तुम्ही कौरव ना आम्ही पांडव.. त्यामुळे जे प्रत्यक्षात घडून गेले व कौरवांना रट्टे बसले त्याचे कदापी वैशम्य मनाशी बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.

प्रतिक्रिया देवून वेळ दवडू नका,
तठस्थ मनाने आयुष्य एंजाॅय करा.

.
.
.
.
.बाकि, भारत-चीन युद्धात भारताने रट्टे खाल्ले म्हणायचे?

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 1:39 pm | द-बाहुबली

तठस्थ अजुन मुरली नाहीये तुमच्यात.. अजुन प्रयत्न करा अवश्य जमेल.

कपिलमुनी's picture

27 Oct 2015 - 2:40 pm | कपिलमुनी

यावर समस्त डॉक्तर लोकांनी आपापल्या डीग्र्या परत करून हटयोग अभ्यासावा आणि अखिल भारतवर्ष रोगमुक्त करावे.

विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन

कुटूंब नियोजनाचा असला उपाय फारिनच्या टेक्नॉलॉजीकडे पण नाय हां

पगला गजोधर's picture

27 Oct 2015 - 3:09 pm | पगला गजोधर

विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन

मानवी शरीराचा ऐक अवयव, हा पेट्रोल-डीस्पेन्सर नॉझल सारखा फक्त डिस्चार्ज करणारा नसून,
योगाद्वारे सक्शनपंप प्रमाणे सुद्धा काम करू शकतो, अश्या अर्थाचे लेखन वाचून, थक्क झालो.
_/\_

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 5:23 pm | द-बाहुबली

यावर समस्त डॉक्तर लोकांनी आपापल्या डीग्र्या परत करून हटयोग अभ्यासावा आणि अखिल भारतवर्ष रोगमुक्त करावे.

अत्यंत बालीश विधान. हा असला गाढवपणा डॉक्टरांना करायला सांगण्यापेक्षा शक्य आहे त्याने हटयोग अवश्य स्विकारावा. जितका जमेल तितका चांगलाच आहे व इश्वर मानायचे त्यात बंधनही नाही.

कपिलमुनी's picture

27 Oct 2015 - 5:48 pm | कपिलमुनी

विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन

असल्या तर्कटहीन मूर्ख विधानापेक्षा बरेच आहे. हटयोगाला विरोध नाही पण हे असे पंप वापरण्याचे सल्ले मूर्खपणाचे आहेत

हटयोगात सदरील क्रिया विषद आहे त्याबाबत आपण योग्य माहिती घेतली आहे की फक्त डोक्टर म्हणतात हे शक्य नाही म्हणून ते विधान आपल्याला तर्कटहीन मूर्खपणाचे वाटते ? पाश्चात्य डॉक्टरांच्या कंपुत येउन योगाभ्यासाचे उघड प्रदर्शन करुन त्यांना हैराण करुन सोडलेल्या योग्यांची माहीती आपणास ठावुक नाही काय ?

हा पंप (अजुन एक बालीश शब्दप्रयोग) सोडा आख्खे हार्ट तासभर थांबवुन पुन्हा सुरु केल्याची उदाहरणे डॉक्टरांच्या रेकॉर्डी आहेत. ते सुध्दा शास्त्रशुध्द चाचण्या करुन.

कपिलमुनी's picture

27 Oct 2015 - 6:11 pm | कपिलमुनी

माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा डॉक्टरवरच अधिक विश्वास आहे.

पाश्चात्य डॉक्टरांच्या कंपुत येउन योगाभ्यासाचे उघड प्रदर्शन करुन त्यांना हैराण करुन सोडलेल्या योग्यांची माहीती

इथे दिल्यास आनंद होइल ! त्याचाही आस्वाद आणी अभ्यास होइल

माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा डॉक्टरवरच अधिक विश्वास आहे.

आँ हे काय नवी प्रकरण ? मी तरी डॉक्टरांची आवश्यक्ता नाही असे कुठेही विधान केलेले नाही फक्त काही व्यक्तींना अचंबीत करणार्‍या शारीरीक क्षमता काही व्यक्तींना कशा प्राप्त होतात या विषयी रेफरंस दिलेले आहे म्हणून या चर्चेत हटयोगी विरुध्द डॉक्टर असा सामना आपण जो भरवु पहात आहात ते सपशेल विषयांतर ठरत आहे.

इथे दिल्यास आनंद होइल ! त्याचाही आस्वाद आणी अभ्यास होइल

हे मदतीला आहेच वापरता न आले तर मी आहे. पण हे मदतीला असताना आपणाला माझी गरज पडावी हे नक्किच विषयाचा अस्वाद , आनंद, आणी अभ्यास करण्यास आपण तयार्/योग्य आहात काय यावर प्रश्नचीन्ह उपस्थीत करते. बोले तो नो स्पुन फिडींग. तरीही अडचण येतेय असे वाटत असेल तर सुरुवात Paramahans Yoganand पासुन करा. आम्ही मग (गरजेनुसार चमचा घेउन) सोबत आहोतच.

कपिलमुनी's picture

27 Oct 2015 - 6:30 pm | कपिलमुनी

हटयोगी विरुध्द डॉक्टर असा सामना भरवण्यात इम्तरेस्ट नाहीये .
मुद्दा संबंधानंतरही कौमार्य टिकून राहण्यापासून सुरू झाला होता . आणि त्या " उलट शोषून घेण्याच्या क्रियेबद्दल किंवा सत्यवतीच्या कौमार्य हटयोग पद्धतीने टिकवणंयाबद्दल " होता .
आधुनिक शास्त्रानुसार असे कौमार्य टिकवणे अशक्य आहे. हटयोगा बद्दल बरीच माहिती नेटवर आहे पण या क्रियेबद्दल काही सापडले नाही.

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 6:43 pm | द-बाहुबली

मुनी आपल्याबद्दल आदर आहे म्हणून आपणास अभ्यास वाढवा असे नक्किच म्हणनार नाही.. असो.

प्रभाकर पेठकर's picture

27 Oct 2015 - 7:13 pm | प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 'उर्ध्वरेता' नांवाच्या प्रक्रिये संबंधी इथेच मिसळपाव वर एक धागा होता.

कपिलमुनी's picture

27 Oct 2015 - 10:41 pm | कपिलमुनी

http://www.misalpav.com/node/19802

धागा सापडला

सुबोध खरे's picture

28 Oct 2015 - 11:20 am | सुबोध खरे

हे ऊर्ध्वरेता नावाचं प्रकरण वाचलं पण हे तुम्हाला स्वतः जाणतेपणी (CONCIOUSLY) करता येणं शक्य असावं असं वाटत नाही. उलटपक्षी वंध्यत्व या शाखेत काम करत असताना वीर्यात शुक्रजंतू नाहीत(AZOOSPERMIA) अशा पुरुषांची तपासणी करताना त्यांचे वीर्य लिंगातून बाहेर जायच्या ऐवजी ते मुत्राशायात जात असे आणी नंतर केलेले मुत्र गढूळ येत असे. पहा Retrograde ejaculation- https://en.wikipedia.org/wiki/Retrograde_ejaculation
दुर्दैवाने अशा पुरुषांना वीर्यस्खलनाचे वेळेसअत्युच्च सुखाचा भास फार कमी होतो( DRY ORGASM) आणी दोन रुग्ण तर वीर्यस्खलनाचे वेळेस वेदना होतात म्हणून स्त्रीसंबंध टाळताना आढळले.
स्खलन झालेले वीर्य परत लिन्गाद्वारे शोषून घेणे हि जास्त करून कविकल्पना वाटते.
राहिली गोष्ट कौमार्याची-- चित्रे साहेबांनी लिहिलं आहे तसं सुईने वीर्य दान करून नंतर सिझेरीयनने प्रसूती केल्यास कौमार्य टिकवता येईल. इतका अव्यापारेषु व्यापार करण्यापेक्षा आधुनिक शास्त्राला कौमार्य पडदा परत शिवणे किंवा नवीन पडदा टाकणे हे फारच सोपे काम आहे.
पहा -- Hymenorrhaphy--https://en.wikipedia.org/wiki/Hymenorrhaphy
असे रुग्ण आता सर्रास सर्व स्त्रीरोग तज्ञा कडे आणी प्लास्टिक सर्जनकडे येताना दिसतात.
लग्न होऊनही "कौमार्य" तसेच राहिल्यामुळे मूल न होणारी जोडपी या वर्षी दोन आणी मागच्या वर्षी तीन अशी मी नियमितपणे पाहत आलो आहे.
यात कौमार्य पडदा अतिशय जाड असल्याने फाटत नाही आणी त्यातील छिद्र फार लहान असल्याने वीर्य आतपर्यंत जाऊ शकत नाही. शिवाय संभोग सुद्धा दोघांना वेदनादायक झाल्याने ते टाळण्याकडे कल जातो. हि पाचही जोडपी शल्यक्रिया करून सुधारलेली आहेत.
अजून एक प्रकार म्हणजे कौमार्य पटल याला छीद्रच नसणे यामुळे मुलीला आतून रजोदर्शन झाले तरीही बाहेर काहीही दिसत नाही आणी हे रक्त योनीत साठून राहते आणी मुत्र्मार्गाला अटकाव निर्माण होतो. Cryptomenorrhea--https://en.wikipedia.org/wiki/Cryptomenorrhea
कौमार्य हि गोष्ट सर्व संस्कृतींमध्ये जरा जास्तच ताणली गेली आहे. यामुळे बर्याच वेश्या गृहांमध्ये वर्योशितेच्या योनीत जळू ठेवली जाते. आणी साम्भोग्चे वेळेस ती फुटून रक्तस्त्राव होतो म्हणजे ती स्त्री कुमारिका आहे असे समजून ग्राहक वाटेल तितके पैसे देण्यास तयार होतात. याचे कारण कुमारिके बरोबरसंभोग केल्यास गुप्तरोग किंवा एड्स बरा होतो असा गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. लहान बालिकेवर बलात्काराचे काही वेळेस हेही एक कारण असल्याचे आढळून आलेले आहे.
रामायण महाभारत किंवा हठयोग याबद्दल माझे वाचन तुरळक/ जेमतेम आहे त्यामुळे त्यात सांगितलेल्या गोष्टी चूक कि बरोबर हे सांगण्याचा मला कोणताही अधिकार किंवा ज्ञान नाही तेंव्हा त्याबद्दल पास.
मूळ धाग्यापासून फार विचलित झालो असल्याने येथे थांबतो.

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 8:19 pm | हेमंत लाटकर

@ बाहुबली.

येथे हटयोग कशासाठी.

लग्नाआधी सत्यवतीचा पराशर ऋषी बरोबर संबध येऊन व्यासाचा जन्म झाला. तरीही कोमार्य पटल पुर्ववत झाले. तसेच....

द्रोपदीचे पांडवा बरोबर लग्न झाले तेव्हा व्यासाने सांगितले एका पांडवा बरोबर एक वर्ष राहिल्यावर दुसर्या पांडवाकडे जाताना कोमार्य पहिल्यासारखे होईल.

यात द्रोपदीला पाचही पांडवापैकी एकाचेही प्रेम लाभले नाही. अर्जुनाने स्वयंवरात द्रोपदीला जिंकले पण द्रोपदीला अर्जुनाचे प्रेम कधीही मिळाले नाही. कुंतीच्या कौरवांचा नाश करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे द्रोपदीवर अन्याय झाला.

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 8:40 pm | द-बाहुबली

कुंतीच्या कौरवांचा नाश करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे द्रोपदीवर अन्याय झाला

<माई मोड ऑन> आज काय हसवुन हसवुन मारयचे ठरवले आहेस काय रे हेमंता ? </माई मोड ऑफ>

पण,

कुटूंब नियोजनाचा असला उपाय फारिनच्या टेक्नॉलॉजीकडे पण नाय हां

यात तुमचा थोडुकला गैस झालेला आहे.

हे "योगिक" प्रकरण कुटुंबनियोजनासाठी नसून वीर्यनाश हाच मृत्यू, ब्रह्मचर्य हेच जीवन या लायनीवरचे आहे हे कृपया ध्यानी घ्या. सर्व निर्बुद्ध धार्मिक प्रथा/कल्पनांपाठी स्त्री ही पुरुषाला 'स्खलित' करण्यासाठी जबाबदार असते, (उदा. पॅराडाईज लॉस्ट) तस्मात, मी स्खलित होऊनही (पक्षी मज्जा करून्बी ;) ) "उर्ध्वरेता" बनेन, जेणेकरून वीर्य रीटर्न प्रोस्टेटमधे आणीन इ. बिनडोक कल्पना उदयास आलेल्या आहेत.

असो. बोलण्यासारखे बरेच आहे. पण, की फर्क पैंदा?

- (डॉ. असल्यामुळे आनंदी) गोपाळ.

अस्वस्थामा's picture

27 Oct 2015 - 5:17 pm | अस्वस्थामा

आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे प्रकरण सामाविश्ट आहे. तुम्हीही तुमेच कौमार्य यापध्दतीने टिकवु शकाल, द्रौपदी नसलात तरी. अथवा पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल. या सर्व यौगीक क्रिया होत अगदी विपश्यनेप्रमाणेच प्रॅक्टीकल अन निव्वळ शारीराच्या अभ्यासाने साध्य.

हे असलं लोक लिहायला लागले की यकूची आठवण होते .. :/

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 5:21 pm | द-बाहुबली

यकुची आठवण पुन्हा पुन्हा आवर्जुन यावी असे बरेच लिखाण मिपावर आहे ते ही वाचावे. आणि हटयोगात वर मेंशन केलेल्या गोष्टी त्याही आधिच्या आहेत. ज्याचा रेफरंन्स भारतीय कामशास्त्राच्या पुस्तकातही घेतल्या जातो. तेंव्हा प्रयोग करायला हरकत नाही.

अस्वस्थामा's picture

27 Oct 2015 - 6:26 pm | अस्वस्थामा

ज्याचा रेफरंन्स भारतीय कामशास्त्राच्या पुस्तकातही घेतल्या जातो. तेंव्हा प्रयोग करायला हरकत नाही.

भारतीय कामशास्त्र म्हणजे "कामसूत्र" का? तुम्ही प्रयोग केले आहेत का ? तुमचा अनुभव अथवा/आणि इतर पुरेशा समुदायाच्या प्रयोगांचा अनुभव याचा पुराव्यासहित संदर्भ मिळेल काय ? तुमची हरकत नाही म्हणजे तुमची हरकत असेल तर कोणी हे प्रयोग करु शकत नाही काय ? तुमची हरकत नसेल म्हणून कोणी प्रयोग केले आणि ते चुकले तर त्याचे होणारे साईड-इफेक्ट वगैरेची जबाबदारी तुमची असणार काय ?

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 6:36 pm | द-बाहुबली

मी हटयोग आचरावा हे नक्किच सांगत आहे पण तो मी रचला आहे अथवा मी त्याचा गुरु आहे असा माझा दुरुनही दावा नाही. ति एक शारीरीक क्रिया आहे हे मला मान्य असलेले मत आहे. ज्याचा लाभ प्रत्येकाला होतो इश्वरावर विश्वास नसला तरी.

इथे चर्चा काही व्यक्तींना अचाट शारीरीक क्षमता कशा प्राप्त होत्या त्यविषयी विवेचन म्हणून मी ह्टयोगातील क्रियांचे उदाहरण दिलेले आहे. हटयोगातील तज्ञ गुरुच्या मार्गदर्शनाखालीच त्या करायच्या असतात हे नमुद करायचे लक्षात आणून दिल्याबद्दल एकवार धन्यवाद.

अस्वस्थामा's picture

27 Oct 2015 - 6:27 pm | अस्वस्थामा

यकुची आठवण पुन्हा पुन्हा आवर्जुन यावी असे बरेच लिखाण मिपावर आहे ते ही वाचावे.

बादवे, सहा महिने वयाच्या आयडीने आम्हाला हा प्रेमळ सल्ला द्यावा हे पाहून अंमळ मौज वाटली.. :)

असो.