म्हणूनच तर मी घोरत होते
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला
पण तेव्हातर मी झोपेत होते
मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते
माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते
मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती
म्हणूनच तर मी घोरत होते
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला
पण तेव्हातर मी झोपेत होते
मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते
माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते
मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती
म्हणूनच तर मी घोरत होते
तरूस लगडली सुवासिक आम्रफळे
परी कोयी अन बीया मोजतो हा बळे
पाण्यात मासे उसळतात
रेतीच्या खोप्यास हसतात
तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे
जळात उतरू कसा प्रश्न हा पडे
आर्जवी पाणिते अवीट
परी कृष्णास दिसे का मीठ
खेळती कधी लहर कधी लाट
प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ
तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे
पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन
माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो.
(मुलिंनी धरु नये अबोला)
मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर
तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर
नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर
लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल
विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा
वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा
विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;)
गेले.. द्यायचे राहुनी
तुमचे 500 शें चे ते ऒझे
माझ्या माळ्यावरी.. आ.. त,
करं-कचून बांधलेले..!
आलो होतो देवळात मी
काहि अभिषेकांसाठी फक्त
वर्षाचे "झाले किती???"
पाचशे पाचशे शोषिती रक्त
अडिच लाखा चा दगड
लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला
बाकीच्यांचे निर्माल्य
काहि.. शे-कोटिंचा पाचोळा!
================
मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु
प्रत्येकाला सकाळी जायची घाई असते,
घुसायचीही मधे भलतीच तयारी असते,
जो मधे घुसला, तो धन्य होतो,
जो तसाच्च राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!
पण घुसणाय्राच्या मनी कुठलाही खेद नाही,
आज, उद्या, पर्वा, नेहमीच!, असा भेद नाही,
पोटात कळ आणि गच्चीत नळ असेल तर,
तिकडे पहाटे बसणेही अशक्य नाही !!
आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!
क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!
डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!
तांब्याधिपतींना अर्पण..
*|| फक्त तू खचू नकोस ||*
रडू नकोस चिडू नकोस
टमरेल घेऊन फिरु नकोस
गुर्जीनं सांगितलंय म्हणून...
बाकी खर्च करु नकोस
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...
रोज नव्याने लागते (रांग)
रोज नव्या तेजाने
रांगेतच ऊभा राहा
रोज नव्या जोमाने
येणे जाणे रितच इथली,
हे तू विसरु नकोस ...
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...
तुझ्या टमरेलकडे वळणारे
कितीतरी हात आहेत
अरे तेही तुझ्यासारखेच
पाणी त्यांना देऊ नकोस