कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क झालं, पण कार्यक्रम आहे कुठे? तर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह घोडबंदर रोड ठाणे, हे ठिकाण काम करत असलेल्या ऑफिसपासून दहा मिनिटावर रिक्षाने, त्यामुळे जायचं अजून पक्क झालं.