काय पाठवू पोस्ट?
(WA ग्रुपस वर incompatible ठरलेला
हताश उत्साही)
काय पाठवू पोस्ट?
काय आठवू गोष्ट?
राजकारण, तुम्हाला सोसत नाही
कविता ...तुम्हाला पोचत नाही
स्पोर्टस् न्यूज, तुम्हाला सवडच नाही
सायंस न्यूज, तुम्हाला आवडत नाही
गाणी, तुम्हाला भावत नाही
इतिहास, तुम्हाला मावत नाही
आरोग्य dieting, पायी चुरडता
रेसीपी नवी,तुम्ही नाकं मुरडता
प्रवास व्लाॅग, तुम्ही थांबू या नेता
प्रेरणादायी कथा, तुम्ही जांभया देता
गार्डनींग, तुम्हा कंटाळा येतो
शेती,म्हणता का शाळा घेतो