न मावळणाऱ्या सूर्याची गोष्ट

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
9 Jul 2021 - 5:47 pm

संजय गोरे कान कान दुखतोय म्हणून इ.एन.टी स्पेशालिस्ट डॉ सुधीर भालेराव यांच्या पुढ्यात बसलेले आहेत.
गोरें बरोबर त्यांची मीरा पत्नी आणि मुलगा सचिन देखील आहेत.

डॉ सुधीर भालेराव “गोरे, तुमच्या कानाला इन्फेक्शन झालंय. इ तुम्हाला इअर ड्रॉप्स आणि काही औषधाचे डोस लिहून देतो, ते घ्या.
बरं होऊन जाईल चार पाच दिवसात ”
NMS001

त्यांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन घेत संजय गोरे डॉक्टरांना विचारतात "डॉक्टरसाहेब, बाहेर रिसेप्शन मध्ये एक पुस्तक पाहिलं, ध्रुवभ्रमंती, काय नक्की ते ?
मग डॉक्टर सांगतात, ते आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी डॉ माया भालेराव यांनी उत्तर आणि दक्षिण दोन्ही ध्रुवांना भेट दिली होती त्या अनुभवावर डॉ माया भालेराव यांनी हे पुस्तक लिहिलंय !

मुलगा सचिन ती माहिती उत्सुकतेने ऐकतोय. त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नाही !
सचिन डॉक्टरांना प्रश्न करतो "मी ऐकलंय कि तिथं उत्तर ध्रुवावर सूर्यास्त होतच नाही, अंधार कधी पडतच नाही हे खरंय का ?

NMS002

त्याची ही उत्सुकता पाहून डॉ भालेराव खुप इम्प्रेस होतात डॉक्टर दाम्पत्य त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारतात. आणि डॉक्टर त्याला गिफ्ट द्यायचं ठरवतात !
पण .... त्याला गिफ्ट मिळतं का ?
गिफ्टमुळे सचिन का अस्वस्थ होतो ?
गिफ्टचं पुढं काय होतं ?
न मावळणाऱ्या सूर्याचं काय होतं ?
हा सूर्य खरंच त्याला बघायचं भाग्य मिळतं का ?

NMS003

या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर “न मावळणारा सूर्य” ही शॉर्टफिल्म बघायलाच हवी !
कुठलाही आव ना आणता साध्या-सुंदर पद्धतीने उलगडत जाणारी ही हृदयस्पर्शी आणि प्रेरक कहाणी आपलं मन जिंकून घेते !
शॉर्टफिल्मची पथकथा, दिग्दर्शन, संगीत, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग अतिशय समर्पक आहे !

युट्युब वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “ न मावळणारा सूर्य ” या शॉर्ट फिल्मला प्रेक्षकांचीही चांगलीच पसंती मिळत आहे. आठ एक दिवसात १४०० च्या वर लाईक्स आणि १६ हजार व्हिव्यूज आहेत ! सत्य घटनेवर आधारित ही शॉर्टफिल्म आपल्याला एक वेगळी प्रेरणा देऊन जाते !

"न मावळणारा सूर्य" आवर्जून बघायलाच हवी अशी ही शॉर्टफिल्म आहे, नक्की बघा !

लिंक : https://www.youtube.com/watch?v=aCDuHMNpvoM&t=2s

कलाविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

9 Jul 2021 - 5:48 pm | कुमार१

चांगली ओळख

गुल्लू दादा's picture

9 Jul 2021 - 6:20 pm | गुल्लू दादा

आपले खूप खूप धन्यवाद. लहान मुलाचा अभिनय आवडला. इतरांचे पण छानच.

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 7:40 pm | टर्मीनेटर

Concept खूप आवडला 👍
पण नाटकी अभिनय करण्याची (मराठीतल्या) कलाकारांची किंवा त्यांच्याकडून तो तसा करवून घेणाऱ्या दिग्दर्शकांची घाणेरडी सवय कधी बदलणार आहे की नाही हा विचार नेहमीच अस्वस्थ करतो. मराठी चित्रपट आणि मालिकांकडून कुठल्याच अपेक्षा राहिलेल्या नाहीत, किमान शॉर्टफिल्म्स बनवणाऱ्यांनी तरी त्या दुष्टचक्रातून बाहेर पडावे असे मनोमन वाटते.
डॉक्टरांची भूमिका करणारा कलाकार डॉक्टर कमी आणि विदुषक जास्ती वाटला 😀

पाषाणभेद's picture

10 Jul 2021 - 2:38 pm | पाषाणभेद

वा! छान ओळख करून दिली लघूपटाची. बाकी टर्मीनेटररावांशी सहमत.

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 4:56 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 4:56 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 4:58 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, टर्मीनेटर आणि पाषाणभेद !

((डॉक्टरांची भूमिका करणारा कलाकार डॉक्टर कमी आणि विदुषक जास्ती वाटला ))

विदुषक म्हणण्यापेक्षा गमंतीदार स्वभावाचा वाटला मला. असे डॉक्टर पाहिले आहेत मी.
असो, अंदाज अपना अपना, खयाल अपना, अपना !

पाषाणभेद's picture

12 Jul 2021 - 7:18 pm | पाषाणभेद

मला डॉक्टरांच्या भुमिकेत असणार्‍या कलाकारांविषयी नव्हते बोलायचे. त्यांचा अभिनय आहे चांगला अन असे गमती करणारे, मनमोकळे, हसरे डॉक्टर मी देखील अनुभवले आहेत. ते कदाचित त्यांचे दु:ख विसरण्यासाठी तसे वागत असावेत.
असो.

मराठीतील जे सध्या नवे चित्रपट येत आहेत त्यात लहान मुलांची भुमिका करणारे बालकलाकार निरागस वाटतच नाहीत. अन ते शहरातले गोबर्या गालाचे, अंगाने छान छान, गोड्ड गोड्ड बालकलाकार ग्रामीण भागातले दाखवतात, ग्रामीण बोलीभाषेचा मारुन मुटकून वापर नैसर्गिक वाटतच नाही. मला ते बोलणे अपेक्षित होते.

कंजूस's picture

9 Jul 2021 - 8:24 pm | कंजूस

आवडला.
------------
किती पुस्तकं ब्रेलमध्ये प्रकाशित होत असतील?

ब्रेलमध्ये मराठी आहे का?

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2021 - 1:25 pm | चौथा कोनाडा

हे आहे मराठीत.

ब्रेलमध्ये मोजकी पुस्तकं तत्कालीन गरजे नुसार प्रकाशित होतात.
माझ्या माहितीनुसार ब्रेल पुस्तक तयार करणं खर्चिक असतं, कोणत्या तरी प्रायोजकाच्या माध्यमातून हा खर्च उचलला जातो.

गॉडजिला's picture

9 Jul 2021 - 10:41 pm | गॉडजिला

ऑडिओ बुक सुध्दा सुटसुटीत पर्याय आहे...

चौथा कोनाडा's picture

14 Jul 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा

हो, ऑडिओ बुक्स बेस्ट पर्याय आहे !
पण जिथे त्यासाठीच्या सोयी नसतील त्यांना मात्र ब्रेल-पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
आणि आपल्याला जसा छापील पुस्तक आणि ऑनलाईन वाचन यात फरक वाटतो तसा ऑडिओ बुक्स ऐकणे आणि ब्रेल-पुस्तक वाचन असा फरक जाणवत असणार !
त्या लोकांना विचारून बघायला हवे !

धन्यवाद, गॉडजिला !

गॉडजिला's picture

14 Jul 2021 - 7:41 pm | गॉडजिला

आपल्याला जसा छापील पुस्तक आणि ऑनलाईन वाचन यात फरक वाटतो तसा

खरंय मी इपुस्तक अजूनही तसे पुस्तक असे मानत नाही फक्त माहिती असेच मानतो...
कारण ?

सामान्य पुस्तक डिजिटल स्क्रीन प्रमाणे प्रकाश फेकत नाही तर फक्त परावर्तित करते ज्याचा त्रास फारच कमी असतो. वाचन करणे अतिसुलभ होते.

व्यक्ती म्हणून पंचेंद्रिये हीच आपली ज्ञानेंद्रिये आहेत म्हणून इपुस्तक दृष्टी/रंग हा भाग सोडला तर पुस्तकाचा गधं, चव, स्पर्श, ध्वनी याचा व्यक्तीला अनुभव देत नाही. (आपण इपुस्तकाला न्हवे स्क्रीनला स्पर्श करतो) त्यामुळे पुस्तकाची फुलफिलमेन्ट/फील इपुस्तक देत नाही.

तर ऑडिओबुक फक्त ध्वनी देऊ शकतो त्यामुळे आपलीय पंचेंद्रिये पूर्णपणे अशा इपुस्तकाच्या स्वरूपात वापरली जात नसल्याने व आपल्याला पुस्तकाच्या बाबत पाचही इंद्रिये वापरायची सवय बालपणापासून असल्याने हार्डकॉपी सोडून इतर कुठंलाही पुस्तक प्रकार काहीतरी मिसिंग असल्याचं फील निर्माण करतोच

पाचही इंद्रिये वापरायची सवय बालपणापासून असल्याने हार्डकॉपी सोडून इतर कुठंलाही पुस्तक प्रकार काहीतरी मिसिंग असल्याचं फील निर्माण करतोच

विशेषत: आपली पंचेंद्रिये ही पुस्तकाचे नेविगेशनच्या कामी कमालीची साहाय्यभूत असतात...

हार्डकॉपी सोडून इतर पुस्तक प्रकारात ही पंचेंद्रिये पूर्ण वापरली जात नसल्याने नेविगेशन ही बाबाही अडचण वाटते

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2021 - 8:09 pm | चौथा कोनाडा

खरं आहे. आपल्यासाठी छापील पुस्तकाची मजा काही औरच ! डिजीटल स्कीन म्हणजे आपल्यासाठी तात्पुरती सोय, आणि काही बाबतीत सोयिस्कर.

पण नविन पिढी मात्र डिजीटल स्कीनला दिवसेंदिवस जास्त सरावत चालली आहे असे निरिक्षण आहे !

नगरी's picture

18 Apr 2022 - 2:51 pm | नगरी

मला आधी पराग सारखे वाटले,पण हे तर वेगळेच निघाले! पण विचार करायला लावणारे.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 5:14 pm | चौथा कोनाडा

लेखाचे शीर्षक मला आधी पराग सारखे वाटले

पराग ?