शब्द
बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.
बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.
एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.