उरलो आता भिंतीवरल्या ...  

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
25 Nov 2019 - 5:11 am

तुका म्हणाला 
उरलो आता 
उपकारापुरता ... 

मी म्हणालो
उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.

नुरली शक्ती
विरली काया 
शिथिली गात्रे 
आटली माया ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.

खपलो झिजलो 
कोड चोचले 
देहाचे पुरवाया ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.

वाटले -
जिंकेन जग. 
लोळेन - 
सुखात मग. 
धडपडलो - कडमडलो 
नको तिथे अन गेलो वाया ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.  

हताश फिरलो 
उदासवाणा 
शोधत फिरलो 
विगतदिनांच्या 
पुसलेल्या त्या पादखुणा ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता. 

हताश फिरलो 
उदासवाणा 
शोधत फिरलो 
विगतदिनांच्या -
पुसलेल्या त्या पादखुणा ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.  

एके दिवशी आणि अचानक 
उन्मळला चैतन्य-झरा 
विस्मयलो गहिंवरलो आणिक -
अनुभवाला आनंद- सोहळा 

उचलला-
कुंचला - 
रंग झराले झरा झरा 
सूख दाटले -
दुःख आटले -
चित्र रंगले भरा भरा 

उरलो आता 
भिंतीवरल्या -
..
..
रित्या चौकटी 
भरण्याला 
चित्रानंदी  लावुनि टाळी 
गीत सृजेचे गाण्याला... 

 

कालगंगाकैच्याकैकविताप्रेरणात्मकभावकवितामनमेघमाझी कवितामुक्त कविताअद्भुतरससंस्कृतीकलाकविताप्रेमकाव्यमुक्तकजीवनमानव्यक्तिचित्रणरेखाटन

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

25 Nov 2019 - 5:16 am | जॉनविक्क

काका छान लिहलंय .. माणसाचं आयुष्य हे शोधण्यातच जातं .. इथे जन्माला येणार प्रत्येक जीव , एका अश्या कलेत पारंगत असतो कि तो त्या कलेच्या साहाय्याने लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो .. पण दुर्दैवाने तीच कला , नव्यान्नव टक्के लोकांना उभी हयात समजत नाही .. ज्यांना संमजते ते राज्य करतात आणि नाही ते फोटोमध्ये जागा मिळवतात ..
नैपुण्य फार इथे , पण तो जीव वेगळा ,,, पुण्य करा हो मायबाप , जेणे होईल संततीचे मोजमाप .. घडावा पुन्हा ते शिवराय घरोघरी ... हेचि मागणे त्या ईश्वरादारी ..

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2019 - 3:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली कविता
पैजारबुवा,

आवडली, कैच्या कै काही नाही, निश्चित.

पाषाणभेद's picture

25 Nov 2019 - 8:50 pm | पाषाणभेद

तेच म्हणतो. छान आहे.

तुझे गीत गाण्यासाठी... आपण केलेल्या कित्येक कलाकृतीतून आनंद वनभुवनी अवस्था झळकते.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2019 - 4:09 pm | मुक्त विहारि

आवडली

कर्नलतपस्वी's picture

26 Oct 2022 - 6:31 pm | कर्नलतपस्वी

भिंतीवरची जागा नक्की
आज नाही तर उद्या,परवा
केंव्हातरी नक्कीच पक्की

जन्मा आलो तेव्हांच ठरले
म्हणून काय कुणी जगणे सोडले
आजचा दिवस माझा आहे
आज तर जगून घेऊ
चिंता कशाला उद्याची
उद्याचे उद्या बघुन घेऊ

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2022 - 8:02 am | चौथा कोनाडा

सुरुवातीच्या ओळी वाचून उदासायला झालं.... भिवविती संध्या छाया... चे सावट बघून कातर होणे साहजिकच
पण..

कुंचला -
रंग झराले झरा झरा
सूख दाटले -
दुःख आटले -

हे वाचलं आणि उमलायला झालं.

चिगु साहेब आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली.
येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती !

आणि ही रचना अर्थातच आवडली.

श्वेता व्यास's picture

28 Oct 2022 - 10:10 am | श्वेता व्यास

सकारात्मक कविता आवडली.

कर्नल तपस्वी, चौथा कोनाडा आणि श्वेता व्यास, कविता आवडली हे वाचून समाधान वाटले. अनेक आभार.
गेले संपूर्ण वर्ष विविध व्यापात व्यतीत झाले, त्यातून चित्रकला आणि लेखन झाले नाही. आपले व्याप कमी करणे, हाच एक मोठा व्याप (उपद्व्याप) असतो याची प्रचिती या एका वर्षात आली. आधी (दिल्लीजवळील) घराची दुरुस्ती आणि नंतर ते विकून 'आपुल्या गावी' स्थानांतरित होणे यात वर्ष गेले. मात्र आता पुन्हा नवीन उत्साहाने जीवनाला सामोरे जाण्याची सुरुवात दहा दिवस एकट्याने 'रोम' परिसरात भटकंती करण्यातून झालेली आहे. आणखी स्थळे हुडकतो आहे, चित्रकलेचीही सुरुवात केली आहे.

आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती !

असे प्रतिसाद खूपच प्रेरणादायी असतात. आता नक्की करतो.