जाप करा हो !

Primary tabs

डॅनी ओशन's picture
डॅनी ओशन in जे न देखे रवी...
21 Sep 2020 - 11:11 am

जाप करा हो जाप करा
या मंत्राचा जाप करा !

डिप्रेशन ? हात्तिच्या मारी !
अंधश्रद्धा ? हात्तिच्या मारी !
फोबियाज ? हात्तिच्या मारी !
कर्करोग ? हात्तिच्या मारी !
व्यसनाधिनता ? हात्तिच्या मारी !
कोरोना ? हात्तिच्या मारी !

रोग मुळातच भ्रम असे,
उपचारांची का भ्रांत असे ?
जादू आपल्यात सुप्त असे
गुरूंनी ती जागविली असे !

मंत्र असे हा साधा सोप्पा
घोका, न मारता फुकाच्या गप्पा
तर तर तर तर तर ......?

मंत्र असे हा sssssssssss क्काsssss य ? (कोरस.)

आपल्या विचारात भिनलय विष,
काळ -शरीराच्या कल्पना नीच
हो कल्पना नीच
हो कल्पना नीच, ह्हो !

हा मंत्र मिळाला गुरुकृपेने
[नसतो बरका दिला देवतेने]
मंत्र असे हा असा जादुई
सर्व व्याधींची होत असे-
पळता sss भुई sss थोडी , ह्हो ! (कोरस.)

मंत्र जाणावा, मंत्र बाणावा,
भ्रम पाडावा, भ्रम मारावा ।

मंत्र असे तो sssssss अ sssss सा ! (कोरस.)

"नसते शरीर आणि नसतो काळ
पहिला जाणून घे रे बाळ ।
नसते मन हो नसते बुद्धी
असतात स्मृती पण नसते भीती ।
नसतात मिती हो नसतात तिथी ।
कसला फोबिया, कसलं काय,
कसली अंधश्रद्धा, कसलं काय ।"

-डॅनी.

करोनाकैच्याकैकविताहे ठिकाणवावरसंस्कृतीवाङ्मयबालगीतविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

डॅनी ओशन's picture

21 Sep 2020 - 11:20 am | डॅनी ओशन

परिकथेतल्या जगात राहणाऱ्या सर्व तर्कतीर्थ विज्ञाननिष्ठ जादूगारांना अर्पण :-))

डॅनी ओशन's picture

21 Sep 2020 - 7:13 pm | डॅनी ओशन

सर्व आजारांचा रामबाण उपाय