संभ्रम-ध्वनी (कथा)
मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.
कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली.