गोष्ट एका लग्नाची ... भाग - ३

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
18 Nov 2016 - 4:18 pm

गोष्ट एका लग्नाची ... भाग २
गोष्ट एका लग्नाची ...

लहानपणी बा च्या पाठडावर बसून घोडा घोडा खेळणं येगळं , न प्रत्येक्षात जित्या जागत्या घोड्यावर बसणं येगळं. नाय नाय बॉ आपल्याला काय झेपणार नव्हतं काही झालं तरी मूक जनावर ते इतक्या गोंधळात बिथरल म्हंजी झाला का खेळ ? तस म्या आदुगरच सांगितलं होत म्हणून एका भारी सजवलेल्या जीप मधी येवस्था केली होती नवरदेवाची
आदल्या रातीच हळदीचा कारेक्रम पार पडला हुता , पाच पाच बोट लावा म्हणूस्तवर दिसला का फासला चालू झालं होत , माझया मित्र मंडळीला न अन गणागोताला कसलाच सूंभार नसतो कधीच. नाही म्हणलं का अजून करत्यात चेव आल्यागत म्हणून मुकाट गपचीप हळद फासून घेतली हुती म्या त्ये नाय का गोईंदाच गाणं " मेरी टोपी भी पिवळी, मेरी बनियान भी पिवळी , मेरा थोबडा भी पिवळा ,मेरे दात भी पिवळ हे sssss चड्डी बी लिलं असत पण पिवळी चड्डी वंगाळ वाटतय उगा पराचा कावळा खी खी खी .......
एव्हड्या हिवात आंघुळ केल्यानी चांगलीच थुडथुडी भरली हुती अंगात. असं वाटत होत ४ गोधड्या घेऊन मुटकून झोपून जावा पण कसलं काय सावळ्या गोंधळात कसली आली झोप? गडी मानस जिथं जागा दिसलं तिथं अजगरावाणी लोळत पडलेले , म्हातार्या कोताऱ्या पोर टोर कवाच ढाराढूर , बायांचं काय चालू होत त्यांनाच ठावूक आपुन डोकं नाय लावत तिकडं .डोळे पेंगुळलेले डोकं जाम झालं व्हतं. काय बाय चालूच होत. बबन्या म्हण" तू झोपला नई व्हय अजून ? आर झोप बाबा सकाळी कसा ताजातवाना दिसला पायजेल नवरदेव."आजच्या दिस घे झोपून लेका मंग कसली झोप न कसलं काय काय इथून पुढं ;)
इतर येळेला मला आस चीडीवल असत तर म्या थोडा लाजलो असतो दिवस ढवळ्या २-३ सपान पण पायली असती पण आत्ता हि काय येळ हुती का ? माझा जीव आधीच शिनलेला,डोळे ताठारलेले बबन्यानी चिडवलं तवा त्येच्या बुडावर एक लाथ का घालू नाय? असं वाटत होत मला पण आपुन पडलो नवदेव !कुणाचा कितीबी राग आला तरी नरमाई ला धरून राहावा लागत भाऊ :)

***************************************

आमच्या वर्हाडाचा टेम्पो खच्चखाच भरला व्हता . मुंगी शिरायला बी जागा नव्हती चाकाखाली लिंबू नारळ बिरळ फोडून सगळ्या देवांच नाव घेऊन आमचं वर्हाड निघालं .बा च्या न आज्याच्या सतराशेसाठ सूचना चालूच होत्या टेम्पोतल्या गड्याना "पोरा बाळांकडे लक्ष ठिवा ,बाया बापड्याना जपून न्ह्येवा , हळूहळू जाऊ द्यावा काय घाई न्हाई”
गावाच्या वेशीवरच मारुतीचं देऊळ आधी नवरेदेवाला तीथ पाया पडायला न्येत्यात , इतक्या वाढूळ म्या निवांत बसलो हुतो. जीप थांबली तसा माझा मामा म्हण थांब थांब उतरू नग तुला उचलून न्हेणारं , रीत हाय , येकदा मी मामाकडे पायल एकदा सोताकडं ! जीवच थरथरला माह्यावाला. " मी अंगांनी रूपाया तर मामा चारानं माह्यापुढ" म्हणलं मामा राहुंदे बाबा नको इषाची परीक्षा.त बाकीची मंडळी लगे ओरडाया लागली " गप जरा तू , कुठं बी डोस्क नको लावू" म्हणल चालू द्या.
मामानी सगळा पांगलेला जीव कन्हुनकुथुन येकत्र करून उचिलला मला. कसाबसा ४ ढांगात देऊळ गाठलं. सगळं सोपस्कार करून परत गाडीत पोचिवल खर सांगतु मामाला मामा झाल्याचं लय "फील " झालं असं तव्हा :P

फाटयापासूनच वाजंत्री चालू झाली , ब्यांड बाजा ! अय ढिच्यांक ढिच्यांक तुत्तर तुर्रर्र ....ढिच्यांक ढिच्यांक तुत्तर तुर्रर्र ....आपली पोर काय कमी नाय नाचाया , त्यात आमच्या आबा न त्यांच्या "इंधनाची" सोय आदुगरच करून ठेवली होती म्हणून धुमशान जोरात सुरु होत.
ह्यात बी एक मजा असती , न मेंन म्हंजी आपल्याला कुदायच नसत निस्त लांबून मज्जा बघायचची असती आपुन पडलो नवरदेव.
नाचणारे बी काय नाचत्यात , पोरटोर, तरणीताठी, म्हातारे कोतारे सगळे सामील नाचाया ,कुणी रुमाल फिरवू फिरवू बी नाचताय कुणी रस्त्यावर उताणा पडू पडू , कुणी नुसताच टनाटना उड्या मारताय , तर कुणी उगाच वाकड तिकडं बूड हलवतय ठेका कुढं न सोंग कुढं आमचा भावकीतल येक म्हातार. अगागा..... कोंबड कस दान टीपतय आक्षी तशीच मान पुढं माग करू करू "खबुतर" ड्यान्स चालल्ला . येड्याला शॉक दिल्यावर कस झटके देतोय तसे बॉडीला झटके देऊ देऊ नाचणारे , अंगात वार आल्यागत घुमत घुमत नाचणारे , फकस्त बूड हलवून , फकस्त हात हालवून नाचणारे चिखल तुडवल्यागत नाचणारे , डेंगाळे शॅमबाळे धोतर कुणीकडे त सदरा कुणीकड :) टाकी फुल असली की गाडी बी बुंगाट पळती नाय का ? मला तर हसूच कंट्रोल व्हयांनाएवढ्या उन्हा कहारात नाचन म्हणजी खायचं काम नाय निस्त्या घामाच्या धारा जीवाची लाही लाही पाणी पाणी होतय पण लगीन आपलं असल म्हणून काय झालं त्यात समदे सामिल होत्यात अगदी आनंदानं :)
********************************************************************************
मांडावं पावन्या रावळ्यांनी खाचाखच भरलेला , येकीकडे रुखवत येकीकडे भांड्याची रास लावलेली. नवरदेवाची ववाळणी न अजून काय काय पार पडलं नटलेले थटलेले समस्त वर्हाडी मंडळी ,भिरभिरणाऱ्या मैना ;) न टक लावून पाहाणारे राघु .
ष्ठेजवर दोन लाल मऊ खुडच्या त्यावर बसल्या बिगर आपुन नवरदेव हाय असं वाटतच नाय बघा माझी नजर माझया मैनेला शोधीत व्हती ;)
भटजी बुवा आल माईक घ्येताला हातात म्हणलं आली घटका जवळ , म्हणू उठून हुभा राहणार तंवर
या ठिकाणी
आपलया गावाचे माननीय सरपंच . श्री ...... अमके ढमके यांचा टोपी टोवेल देऊन सत्कार करण्यात येत आहे त्यांनी विनंती हाय का त्यांनी स्टेज वर येऊन स्वीकार करावा
आपल्या गावचे........ फलाने बिस्ताने
आपलया गावचे ...... टरमाळे खरमाळे ....
आपल्या गावचे ...... चिमणे कावळे ......
अश्या ५ - २५ जणांचे सत्कार होऊ पर्यंत सगळे ताटकळत बसले होते
"वळख ना पाळख बरे खुशाल का मामा "अशी गत !
मला येक कळत नाही ज्यांनी लागीन जमवलं लगीन घरात दिस रात राबलेत , उन्हा तान्हात पत्रिका वाटल्या , उपाशी तापाशी आपल्याबरुबर फिरलेत अश्या लोकांचा सत्कार व्हाया पायजे खरतर हम्म जाऊंद्या मी बोललो तर शिंग उपसतीन फुकटच्या फाकट !
मध्येच माईक वर आहेर फेडायचा कारकरेम झाला
ची. सौ. का सुमन हिस ...... कडून एक तांब्याचा हंडा !
ची. सौ. का सुमन हिस ...... कडून एक पितळेचा हंडा !
एक कळशी !
येक टीप !
पाच भांड !
एक मांन्नी !
त्यात बी छोटे कार्यकर्ते येता जाता माईक वर वरडायची माईक तोंडात घालायची हाऊस भागवून घेत हुते.
मुलीचे मामा , मुलीला घेऊन लवकर स्टेजवर यावे मुलीचे मामा , मुलीला घेऊन लवकर स्टेजवर यावे २-३ सांगून बी मामाचा पत्य्या न्हाय , नेमक्या येळीच मामा गायब असतु नेहमी.
चुळबुळ सुरु " आर आता इथं तर व्हता, कुढं गेला ?
अशे ५- १५ मिनिट भटजींनी घसा सुकीवल्यावर मामा आला येकदाचा. सुमीला घेऊन , हिरवा शालू , हिरवा चुडा , गजरे , मुंडावळ्यात इतकी भारी दिसत हुती सुमी नजर ढळत नवती माझी १० येळेला द्रिष्ट काढावी इतकी साजरी दिसत हुती सुमी :)
धरला बाबा एकदाचा अंतरपाट दोन्ही माम्ये लोकांबाबत चाईस चुकला व्हता द्येवाचा : मह्यावाला मामा इलुसा बारीक जीव न सुमीचा मामा चांगला ताड ताड उच्च न डेंगळा अंगाणी 
"गंगा सिंधू सरस्वतीचं यमुना गोदावरी नर्मदा" बास बास..... ह्यापुढ काय म्हणत्येत मला काई बी कळत न्हाई इतकीच ऐपत हाय आपली ;)
शुभ मंगल सावधान " हिकडं अक्षता पडल्या डोईवर तिकडे फटाके वाजले दणकुन !!!!
झालं.........
पंगती बसल्या , वाढंनारे धावले , बुंदी बुंदी बुंदी , भात भात भात भात .... भाजी .... भाजी .... भाजी !
पै पाहून येऊन आशीर्वाद देत हुते , ह्यो ह्याचा मेहुणा तो त्याचा साडू , ही आक्का , आक्का च्या जावेची नंनंद, नानाचा मामा , मामाचा आजा आज्याचा पंजा अशे सिम्पल गोतावळे कळत नसत्यात कुणालाच आपुन फक्त जोडीनं पाया पडायचं !
सगळं मनाजोगतं पार पडलं होत. स्टेज्वर दोन्हीकड २ जण मोठाले डबडे घेऊन बसले हुते. नई नई तशे रामपहांरींचे डबडे न्हाई आओ आहेराचे पाकीट ठेवायचे डबडे :)
माझी मावळण म्हण फुगली होती मान पानावरुन " बा" ला पण भावकीतले काय जण " आस असतय का ? आसच पायजे होत तसं पायजे होत म्हणून झाडावर चढवीत हुते , पण माह्या घरचे अशे लगेच डोक्याची राख नाई करू घेत हेंच मला लै कवतिक वाटत नायतर अशा कांन भरव्यामुळं लय नुस्कान होत कधी कधी.
चालायचंच पाची बोट कुढं सारखच असत्यात व्हय जळणारे बी असत्यात ना गणगोतात आपण आपलं टकुर शाबूत ठिवायचं फकस्त :)
_______________________________________________

निघायची येळ झाली थकलेले पावणे रावळे ,सामान भरायची लगबग
दुपार सरत हुती तशी सुमी जरा डीष्टबच झाली होणारच , आवो .
निघायच्या येळी फार रडणंगागन झाल. सगळ्या बाया बापड्याचा डोळ्याला पदर ! सुमीच रडून रडून डोळ लाल, काजळ पांगल, अजूनच गॉड दिसत होती . बाया मुखावरून हात ओवाळू ओवाळू नजर काढीत होत्या तिची , मुके घेत व्हत्या . नवी नवरी तिन्ही सांजाची येळ , हूर हूर वातावरणच लै डेंजर अस्तय कावर बावर येकदम ! एकतर नवरदेवानी अशा येळी काय करावा अशी पंचाइत असती , तेवढी येळ मारून नेंन लय कठीण :)
सुमी माह्या शेजारी येऊन बसली तरी पदर हायेच डोळ्याला. मंग हळूच म्हणलं कानात " तू रडायचं थांबली नाय तर मी बी लावतो शर्ट डोळ्याला तशी खुद्कन हसली सुमी :)

****** (हिच तर सुरुवात हाय ना ? खर तर... )

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

अजया's picture

18 Nov 2016 - 4:27 pm | अजया

झालं लगीन.ब्येस झालं ;)
कं लिवलंय कं लिवलंय.

निशाचर's picture

18 Nov 2016 - 4:45 pm | निशाचर

मस्त लिहिलंय!

पाटीलभाऊ's picture

18 Nov 2016 - 4:47 pm | पाटीलभाऊ

शेवटी उरकलंच म्हनाव लगीन...!
नाचायचं वर्णन भारी लिहिलंय.

बास बास, लागलं का लगीन एकदाचं ?
लै झ्याक !

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 5:23 pm | टवाळ कार्टा

"पिश्वीचे भावविश्व" ;)

पियुशा's picture

18 Nov 2016 - 7:24 pm | पियुशा

अ हं , पिशवीचे भाव विश्व नय रे "टक्याच भविष्य" अस करेक्शन करते ;)

अतिशय प्रत्ययकारी लेखन!

शलभ's picture

18 Nov 2016 - 6:20 pm | शलभ

+११११
खूपच मस्त लिहिलय. नाचायच्या तर सगळ्या स्टेप्स आल्यात. डिट्टो.

बदामची राणी's picture

18 Nov 2016 - 6:34 pm | बदामची राणी

अगदी डोळ्या^समोर ऊभ^ राहील^ सगळ^

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2016 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

@नाही म्हणलं का अजून करत्यात चेव आल्यागत म्हणून मुकाट गपचीप हळद फासून घेतली हुती म्या त्ये नाय का गोईंदाच गाणं " मेरी टोपी भी पिवळी, मेरी बनियान भी पिवळी , मेरा थोबडा भी पिवळा ,मेरे दात भी पिवळ हे sssss चड्डी बी लिलं असत पण पिवळी चड्डी वंगाळ वाटतय उगा पराचा कावळा खी खी खी .......--- वारलो हसून हसून! =))

नाचगाणं आणी टॉवेलटोपी सत्कार वर्णन बेफाट हसवून गेलं.
शेवटंही भावंपूर्ण व सुंदर.

सुबोध खरे's picture

18 Nov 2016 - 7:32 pm | सुबोध खरे

लै म्हणजे लैच छान

दिपुडी's picture

18 Nov 2016 - 8:16 pm | दिपुडी

एकदम मस्त कथा

मस्त कथा! सगळ वर्णन नेमक केलय पियुडे.
आता नविन कथा लिहि बर :)

मोहनराव's picture

18 Nov 2016 - 8:29 pm | मोहनराव

लई झकास झालं बगा लगीन!!
पुढचा भाग हायं का सपीवलं इथंच!!

यशोधरा's picture

18 Nov 2016 - 9:12 pm | यशोधरा

मस्त! सगळे भाग वाचले.
सुमीने उखाणा काहून नाय घेतला वो?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2016 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा

@सुमीने उखाणा काहून नाय घेतला वो? ››› रैट्ट.. रैट्ट! जिल्बुचा.. . आपलं.. ते हे.. सुमे.. उखाणा घे बरं आता. ;)

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2016 - 10:07 pm | टवाळ कार्टा

नै जम्ले उ खाणे तर अत्मुगुर्जी हैत मदतीला

सुमीच राहुद्या तुमीच घ्या बघू बुवा उखाणा तुमचं बी लगीन नवीनच हाय ना घिऊन टाका आता पट्टदिशी :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2016 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

@ तुमचं बी लगीन नवीनच हाय ना घिऊन टाका आता पट्टदिशी ›››
वर्षाचं नाव घिऊन टाकतो आता पट्टदिशी
वर्षाचं नाव घिऊन टाकतो आता पट्टदिशी
कारण सुमीच्या ऐवजी अता उखाणा घेणार पिवशी! =))

निमिष ध.'s picture

18 Nov 2016 - 9:57 pm | निमिष ध.

एक लंबर लिव्हलं पघा. अगदी गावाकडच्या लग्नात जाऊन आलोय असं वाटलं. किती तरी लग्नाला जाऊन ते सरपंच आणि आमदार यांचे सत्कार ऐकले आहेत. मग इकडे सावधान झालं की तिकडे सतरंजीवर पंगत पकडून बसून घेतलं आहे. घोडे आणि त्याच्या पुढचे नाच हा तर एक दर्दी कार्यक्रम असतो ;)

नीलमोहर's picture

18 Nov 2016 - 10:52 pm | नीलमोहर

एका लग्नाची गोष्ट भारी जमलीय, शेवट एक नंबर :)

नूतन सावंत's picture

18 Nov 2016 - 11:00 pm | नूतन सावंत

झकास पियू,लई म्हणजे लईच भारी.

ट्रेड मार्क's picture

19 Nov 2016 - 1:09 am | ट्रेड मार्क

सोत्ता हजर असल्यागत वाटलं

हहपुवा झाली

हुश्श्य! पडलं बुवा पार हे लगीन! दणक्यात झालं म्हणा की!

विशाखा राऊत's picture

19 Nov 2016 - 3:11 am | विशाखा राऊत

शुभमंगल सावधान ;)

सिरुसेरि's picture

19 Nov 2016 - 12:25 pm | सिरुसेरि

शुभेच्छा व अभिनंदन

पद्मावति's picture

19 Nov 2016 - 12:51 pm | पद्मावति

वाह, वाह मस्तं. मजा आली वाचून.

एकदम हटके स्टाईलनंं लिहिलेली ही गोष्ट फार आवडली. पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत आहे.

हासिनी's picture

19 Nov 2016 - 2:42 pm | हासिनी

एकदम खुसखुशीत लिहलयस ग, जबरा वर्णन!!
मजा आली वाचायला..लिहीत रहा ग बयो

सगळ्या वाचकांचे आभार ,इतक्या दिवसांनी लिहिलं मिपावर, तुमच्या मस्त मस्त प्रतिक्रियेने हुरूप आला अगदी ! धन्यवाद पुन्हा :)

संजय पाटिल's picture

19 Nov 2016 - 3:24 pm | संजय पाटिल

चला लागलं एकदाचं लग्न..

शित्रेउमेश's picture

21 Nov 2016 - 11:00 am | शित्रेउमेश

+१

खूप भारी लिहिलय. नाचायच्या सगळ्या स्टेप्स डोळ्यासमोर आल्या.... ;)

खुप सुंदर लिहिल आहे. सर्व प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभी केलीत.

नाखु's picture

22 Nov 2016 - 8:45 am | नाखु

नाचायला तर अगदी वरातीत असल्यासारखं वाटायला लागलं इतकं भारी निरिक्षण . एक ऊखाणा होउन जाउ दे तो पण गावाकडचा लांबलचक. हा का ना का

आमंत्रीत वर्हाडी नाखु

लहानपणी बा च्या पाठडावर बसून घोडा घोडा खेळणं येगळं , न प्रत्येक्षात जित्या जागत्या घोड्यावर बसणं येगळं. नाय नाय बॉ आपल्याला काय झेपणार नव्हतं काही झालं तरी मूक जनावर ते इतक्या गोंधळात बिथरल म्हंजी झाला का खेळ ?
100% Sahmat......mast likhaan ahe.
mjya lagnachi pn hich tarhaa hoti bhaau....,

मयुरी चवाथे-शिंदे's picture

14 Apr 2017 - 1:49 pm | मयुरी चवाथे-शिंदे

तिन्ही भाग आवडले...

अगदी अगदी असंच होतं असतं