समीक्षा

फार्गो सीजन टू

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
27 Dec 2015 - 4:09 pm

फार्गो सीजन टू

FARGO

फार्गो नावाचा एक इंग्रजी चित्रपट येऊन गेलाय, त्या चित्रपटावरच आधारित एक मालिकाही सुरु झाली, एक सर्वसाधारण माणूस परिस्थिती मुळे कसा अपराधी होतो ह्याची उत्तम मांडणी केली आहे, ब्लॅक कॉमेडी अप्रतिम!

चित्रपटसमीक्षा

बाजीराव-मस्तानी

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
21 Dec 2015 - 11:19 pm

बाजीराव-मस्तानी

बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो.

चित्रपटसमीक्षा

धारदार 'कट्यार'

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
21 Dec 2015 - 2:15 pm

'कट्यार काळजात घुसली' चित्रपट प्रदर्शित होऊन दीड दोन महिने झाले असतील, फेसबुक आणि वर्तमानपत्रात खूप वाहवा मिळवली, मुख्य नाटक बद्दल काही विशेष माहिती नव्हती आणि हा चित्रपट पाहायचाय ह्यावर दुमत नसल्यानी मी चित्रपट समीक्षा वाचायचे टाळले, आणि आज तो दिवस आला...संगीत-चित्रपट पहायचा आनंद मिळाला, अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत!

तुलनात्मक सांगायचं झालं तर संगीतनाट्या/संगीतनात्या वर आधारित असलेला 'बालगंधर्व' पेक्षा 'कट्यार' जास्त आवडला!सुरुवातीलाच 'कट्यार' आणि 'संगीत' ह्या दोन विभिन्न गोष्टींचा मिलाफ का ह्याचे स्पष्टीकरण असलेला प्रसंग आहे, तिथेच अर्धी बाजी मारली आहे कथानकानी.

चित्रपटसमीक्षा

देवाचं अज्ञान, कुतुहल आणि विज्ञान

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
12 Dec 2015 - 11:41 am

शीर्षक वाचून देव आणि वि़ज्ञान ह्यावर दंगा करून पॉपकॉर्न उधळायला मिळतील असा गोड गैरसमज करून घेवू नये. कारण हा लेख एका पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आहे. ह्या पुस्तकाचं नाव आहे "God's Debris". आणि लेखक आहेत "Dilbert" चे निर्माते Scott Adams. ह्या पुस्तकाविषयी सविस्तर लिहले तर वाचण्यातील मज्जा निघून जाईल कारण हा एक विचार प्रयोग आहे.

जीवनमानसमीक्षा

काकासाहेबांची चड्डी - एक टिप्पणी

भृशुंडी's picture
भृशुंडी in जनातलं, मनातलं
9 Dec 2015 - 4:21 am

काही नाटकं अशी असतात की जी आपल्या मनात घर करून जातात. आणि नंतरही आपण त्यावर विचार करत रहातो.
असंच एक नाटक पाहण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला, त्याबद्दल हे काही थोडं लिहिलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१९९० सालानंतर समाजात जो एक चंगळवाद फोफावला आहे, त्यावर आडून आडून टिप्पणी करणारं आणि उपहासाने त्याकडे बघणारं हे नाटक म्हणजे "काकासाहेबांची चड्डी".

नाट्यसमीक्षा

उर्फी-मराठी चित्रपट

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 7:28 pm

लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू) आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील.

चित्रपटसमीक्षा

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 3:21 pm

प्रेरणास्थान-
इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी.
फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत?

इतिहासवाङ्मयसमाजजीवनमानअर्थकारणअर्थव्यवहारप्रकटनविचारसमीक्षालेखबातमीअनुभवमतमाहितीसंदर्भ

तमाशा

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
1 Dec 2015 - 10:47 pm

तमाशा

दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच.

चित्रपटसमीक्षा

बिहारचा प्रवास उलट ?

shawshanky's picture
shawshanky in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 8:30 am

बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

समाजराजकारणप्रकटनविचारसमीक्षालेख