देवाचं अज्ञान, कुतुहल आणि विज्ञान

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
12 Dec 2015 - 11:41 am

शीर्षक वाचून देव आणि वि़ज्ञान ह्यावर दंगा करून पॉपकॉर्न उधळायला मिळतील असा गोड गैरसमज करून घेवू नये. कारण हा लेख एका पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आहे. ह्या पुस्तकाचं नाव आहे "God's Debris". आणि लेखक आहेत "Dilbert" चे निर्माते Scott Adams. ह्या पुस्तकाविषयी सविस्तर लिहले तर वाचण्यातील मज्जा निघून जाईल कारण हा एक विचार प्रयोग आहे.
पुस्तकाची रचना दोन व्यक्तींमधील संवाद आणि तेही प्रश्न-उत्तर स्वरूपात आहे. एक व्यक्ती आहे ज्ञानी तर दुसरी आपल्यासारखी गोंधळलेली. पुस्तकात देव किती ज्ञानी असनं हे देवासाठी फायद्याचं आहे ह्या विषयावर थोडं चिंतन करण्यात आलं आहे. देवाला सर्व काही माहित असेल तर त्याच्या आयुष्यात काही थ्रील राहाणार नाही. काही तरी असं असायला हवं की ज्याचं उत्तर देवाला माहित नाही. जर देवाला एखादी गोष्ट माहित नसेल तर देव ती माहिती मिळवण्यासाठी काय करेल आणि ह्या गोष्टीचा जगाची उत्पत्ती, उत्क्रांती, वि़ज्ञान ह्याच्याशी काही संबंध असावा का ह्याविषयी कल्पना विलास केला आहे. व
लेखनाचं स्वरूप काहीसं प्रश्न उत्तर ह्या स्वरूपात असल्यामुळं वाचकाला ही विचार करण्याची चांगली संधी मिळते. समाजात सर्व क्षेत्रात दोन प्रकारच्या विचारसरणींचा तंटा कायम दिसून येतो. १. Simplest explanation tends to work best. आणि २. Every complex problem has a solution that is simple, clear and wrong. ह्या दोन्हीचा योग्य उपयोग कुठे करता येइल आणी दुरुपयोग कुठे टाळता येइल ह्यावर विचार करण्यास हे पुस्तक भाग पाडतं. आपल्या मनाचे भ्रम आणि विज्ञान ह्यांचा कसा संबध जोडता येइल ह्यावर एक विचार (पुन्हा सत्य नव्हे) प्रकट करून पुस्तकाची सांगता होते.

पुस्तक वाचताना जे सांगितलं जातय तो एक रोचक कल्पनाविलास आहे. कितीही आवडलं तरी ते सत्य नाही ह्याचं भान जरून ठेवा. पुस्तक फक्त १४४ पानांचं आहे आणि आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे. वेळ मि़ळाला तर अवश्य वाचा.

debris

जीवनमानसमीक्षा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

12 Dec 2015 - 9:07 pm | कवितानागेश

वाचायला हवे.
.Every complex problem has a solution that is simple, clear and wrong. हे वाक्य पूर्वी कुठेतरी वाचले होते... आठवत नाही.

पॉइंट ब्लँक's picture

13 Dec 2015 - 9:17 am | पॉइंट ब्लँक

गणित आणि संगणक क्षेत्रात बर्याच वेळा हे वापरले जाते. मी हे बहुदा सर्वात आधी R. J. Lipton ह्यांच्या P=NP ह्या ब्लॉगवर वाचल होत. कधीकाळी भक्तीभावे हा ब्लॉग वाचायचो. संगणक क्षेत्रातील सर्व नवीन घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी उत्तम ठिकाण होतं ते.

कविता१९७८'s picture

12 Dec 2015 - 9:55 pm | कविता१९७८

छान पुस्तक ओळख, वाचायला हवे

आतिवास's picture

12 Dec 2015 - 10:03 pm | आतिवास

वाचेन.
पुस्तकाचा दुवा लेखात मला सापडला नाही. शोधते.

पॉइंट ब्लँक's picture

13 Dec 2015 - 5:18 pm | पॉइंट ब्लँक
पैसा's picture

12 Dec 2015 - 10:21 pm | पैसा

इंटरेस्टिंग वाटतंय.